पाऊस: १
ग्रीष्म भाजून काढत होता, काळ्याभोर मातीवर पडलेल्या भेगा जशा काही तृषार्त झाल्या होत्या, पिवळेजर्द वाळलेले गवत नव्या हिरवाईची आतुरतेने वाट पाहात होते, काळाकभिन्न राकट सह्याद्री अंगावर जलधारा झेलण्यासाठी जणू व्याकुळ झाला होता, अल्लड, अवखळ नद्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या.
मात्र त्याचे आगमन तसे उशिराच झाले. हळूहळू काळे मेघ नैऋत्येकडून त्याचा सांगावा घेऊन येऊ लागले.
अवकाशात काळेकभिन्न मेघ दाटू लागले, भरलेल्या जलाने त्यांना जणू जडत्वच आले होते.
तृषाकुलैश्चातकपक्षिणाम् कुलैः प्रयाचितास् तोयभरावलम्बिनः।
प्रयान्ति मन्दम् बहुधारवर्षिणो बलाहकाः श्रोत्रमनोहरस्वनाः ।।
मेघ इकडून तिकडे भ्रमण करु लागले, पाण्याने भरलेल्या ह्या प्रचंड जलधींना पाहून तहानलेले चातक चोची वासून आ करु लागले, सुरुवातीला वेगाने पळणारे मेघ मात्र जलाने संपृक्त झाल्याने आता मंदावले होते. नवधारांचा वर्षाव सुरु झालेल्या आनंदित झालेले बलाहक अतिशय मनोहर दिसू लागले.
प्रभिन्नवैदूर्यनिभैस् तृणाङ्कुरैः समाचिताप्रोत्थितकन्दलीदलैः।
विभाति शुक्लेतररत्नभूषिता वाराङ्गनेव क्षितिर् इन्द्रगोपकैः॥
ह्या भिजलेल्या पृथ्वीलाच पाहा, तिच्या तृणांवर असलेल्या दवातून नवे अंकुर फुटायला लागले आहेत, त्याने ही धरणी भरुन गेली आहे, कर्दळीला धुमारे फुटले आहेत, रक्तवर्णी इंद्रगोप बाहेर पडले आहेत, जणू रंगरुपी रत्नांनी रंगलेली ही भूमी दागदागिन्यांनी नटलेल्या एखाद्या सुंदरीसम दिसत आहे.
आमेखलं संचरता घनानां छायामधः सानुगता निषेव्य ।
उद्वेजिता वृष्टिभिराश्रयन्ते शृंगाणि यस्यात्पवन्ति सिद्धा ।।
ह्याच्या कटीभागावर संचार करणार्या मेघांची खालच्या टेकड्यांवर राहणार्या सिद्धांना सावली मिळत आहे, तिचे ते आनंदाने सेवन करतात मात्र त्यांचीच भयंकर वृष्टी सुरु झाल्याने की ते उद्वैगाने स्वच्छ उन्हात न्याहलेल्या त्यांच्या शिखरांचा आश्रय घेत आहेत.
अभीक्ष्णमुच्चैर्ध्वनता पयोमुचाघनान्धकारीकृतशर्वरीष्व् अपि।
तडित्प्रभादर्शितमार्गभूमयः प्रयान्ति रागाद् अभिसारिकाः स्तिर्यः ॥
सतत गरजत, वर्षत असलेल्या ह्या मेघांनी घनघोर अंधार निर्माण केला आहे मात्र त्याही परिस्थितित आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या अभिसारिकेला चमचमती विद्युल्लता जणू वाट दाखवत आहे.
विपाण्डुरं कीटरजस्तृणान्वितम्भु जङ्गवद् वक्रगतिप्रसर्पितम्।
ससाध्वसैर् भेककुलैर् निरीक्षितम्प्र याति निम्नाभिमुखम् नवोदकम्॥
हे जे नवीन जल आहे ते वेगाने खाली खाली जाऊ लागले आहे, ह्याचा रंग धुळकटलेला, किड्यांनी भरलेला आहे आणि जणू हे भुजंगासारखी वक्राकार चाल चालत आहे.
सतोयनम्राम्बुदचुम्बितपलः समाचिताः प्रस्रवणैः समन्ततः।
प्रवृत्तनृत्यैः शिखिभिः समाकुलाः समुत्सुकत्वम् जनयन्ति भूधराः॥
ह्या महान पर्वताच्या चित्तामध्ये विलक्षण उत्कंठा निर्माण झाली आहे, त्याच्या कातळांवर हे जलमेघ विसावले आहेत. चहूवार वाहत असलेल्या ह्या जलौघांचा नाद ऐकून नृत्यमग्न झालेल्या मयुरांनी ही धरणी भरुन गेलेली आहे.
सम्प्रवृत्तमहावर्षं लम्बमानमहाम्बुदम्।
भात्यगाधमपर्यन्तं ससागरमिवाम्बरम्।।
धारानिर्मलनाराचं विद्युत्कवचवर्मिणम्।
शक्रचापायुधधरं युद्धसज्जमिवाम्बरम्।।
घनघोर पावसाला आरंभ झाला आहे, हे मेघांनी झुकलेले आकाश जणू एखाद्या महासागरासारखेच अनंत दिसत आहे. जलधारांरुपी नाराच धारण करुन, विद्युलत्तेरुपी कवच धारण करुन इंद्रधनुष्यरुपी आयुध धारण केलेले हे आकाश जणू युद्धासाठी सज्ज राहिले आहे.
शैलानां च वनानां च द्रुमाणां च वरानन । प्रतिच्छन्नानि भासन्ते शिखराणि घनैर्घनै:।।
गजानीकैरिवाकीर्णं सलिलोद्गारिभिर्घनै:। वर्णसारूप्यतां याति गगनं सागरस्य च।।
बघा ही शैलशिखरे, ही वनराजी ह्या काळ्या ढगांनी आच्छादित होऊन कशी शोभा पावत आहे, आपल्या सोंडांवाटे पाणी सोडणार्या ह्या गजसमूहांसारखे हे आकाश आपल्या रंगररूपाने समुद्रासमान होऊन गेले आहे.
चेतनं पुष्करं कोशै: क्षुधाध्मातै: समन्तत:।
न घृणीनां न रम्याणां विवेकं यान्ति कृष्टय:।।
घर्मदोषपरित्यक्तं मेघतोयविभूषितम्।
पश्य वृन्दावनं कृष्ण वनं चैत्ररथं यथा।।
मेघ आप्ले जल रिते करु लागले आहेत, सगळीकडे चैतन्य फुलले आहे, कुठलेही दोष नसलेले हे मेघांनी विभूषित झालेले वृंदावन कुबेराच्या चैत्ररथ नगरीसारखे मनोरम्य दिसत आहे.
नवजलकणसङ्गाच् चीतताम् आददानः कुसुमभरनतानाम् लासकः पादपानाम्।
जनितरुचिरगन्धः केतकीनाम् रजोभिः परिहरति नभस्वान् प्रोषितानाम् मनांसि॥
जलबिंदंनी भरलेल्या ह्या नवजलाच्या साहाय्याने वृ़क्ष स्वतःला पाण्यांनी भरुन घेत आहेत, तृषार्त जनांना ह्या केतकीच्या वनांतून वाहणारा वारा सुगंधाने भारून टाकत आहे.
वर्ष प्रवेगा: विपुलाः पतन्ति प्रवान्ति वाता: समुदीर्णवेगा:।
प्रनष्टकूला: प्रवहन्ति शीघ्रं नद्यो जलं विप्रतिपन्नमार्गाः।।
घनघोर वर्षेने हा वेगवान प्रवाह निघाला आहे, मरुत वाहू लागला आहे, किनारे नष्ट करत जाणारा हा प्रवाह नद्यांचे जल भरुन टाकू लागला आहे.
महान्ति कूटानि महीधराणां धाराविधौतान्यधिकं विभान्ति।
महाप्रमाणैर्विपुलैः प्रपातैर्मुक्ताकलापैरिव लम्बमानैः।।
हा पर्वताची शिखरे त्याच्या अंगाखांद्यावरुन वाहू लागलेल्या प्रपातांमुळे जणू मोत्यांच्या रत्नहारासारखी विभूषित दिसत आहेत. सगळीकडे चैतन्य खळाळले आहे, ही सृष्टी हिरवाकंच शेलू पांघरुन तजेलदार झाली आहे, अवघे अवघे जन सुखावले गेले आहेत.
वाचने
21937
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वल्ली. माहोल बना दिया..!
वाह !
+१०००
In reply to वाह ! by प्रसाद गोडबोले
जबरी फोटोज... कुठले म्हणायचे?
धन्यवाद. पहिले दोन फोटो
In reply to जबरी फोटोज... कुठले म्हणायचे? by टर्मीनेटर
तत्परता!
पाऊस...
नौबहार सावन....
भारी लेख
पहिले दोन फोटो नक्कीच
In reply to भारी लेख by तुषार काळभोर
अगदी अगदी.
धन्यवाद
In reply to अगदी अगदी. by प्राची अश्विनी
सुंदर,
धन्यवाद
In reply to सुंदर, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
क्लासिक!
अजुन काही गाणी
In reply to क्लासिक! by Bhakti
आणखी
In reply to अजुन काही गाणी by राजेंद्र मेहेंदळे
अजुन दोन!
In reply to अजुन काही गाणी by राजेंद्र मेहेंदळे
ती गेली तेव्हा रिमझिम(निवडुंग)
In reply to अजुन काही गाणी by राजेंद्र मेहेंदळे
गुरू ठाकूरचे शब्द आणि सुंदर
In reply to क्लासिक! by Bhakti
शेखरचा कातिल आवाज लागलाय या
In reply to क्लासिक! by Bhakti
वाह !
इतक्या सुंदर छायाचित्रांवर
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वीरजन पडले
In reply to इतक्या सुंदर छायाचित्रांवर by चौकस२१२
वीरजन पडले किती जण पडले?
In reply to वीरजन पडले by सुबोध खरे
आभार.
In reply to वीरजन पडले by सुबोध खरे
प्रचेतस यांचा धागा गाण्याच्या
धागा पावसा सारख्या रोमॅंटीक विषयावर असला कि हे चालायचंच :)
In reply to प्रचेतस यांचा धागा गाण्याच्या by Bhakti
=))
In reply to धागा पावसा सारख्या रोमॅंटीक विषयावर असला कि हे चालायचंच :) by टर्मीनेटर
आणि हो... सर्व मिपाकरांना गटारी मोहोत्सवाच्या शुभेच्छा!
लगे रहो मुन्नाभाई
In reply to आणि हो... सर्व मिपाकरांना गटारी मोहोत्सवाच्या शुभेच्छा! by टर्मीनेटर
डोळे निवले. निसर्गाचा आस्वाद
In reply to आणि हो... सर्व मिपाकरांना गटारी मोहोत्सवाच्या शुभेच्छा! by टर्मीनेटर
तुमचा अंदाज बऱ्यापैकी बरोबर आहे!
In reply to डोळे निवले. निसर्गाचा आस्वाद by प्रचेतस
पेठ शहापूर तर अगदी माहितीतला
In reply to तुमचा अंदाज बऱ्यापैकी बरोबर आहे! by टर्मीनेटर
कोरीगडला कित्येकदा गेलोय तिथून
In reply to पेठ शहापूर तर अगदी माहितीतला by प्रचेतस
एक प्रश्न
In reply to पेठ शहापूर तर अगदी माहितीतला by प्रचेतस
अहाहा!
काय ती भटकंती...
माझी दोन आवडती गाणी.....
संस्कृत काव्यपंक्ती आणि फोटो
वाह! सुंदर पावसाळी फोटो.
धन्यवाद
In reply to वाह! सुंदर पावसाळी फोटो. by गोरगावलेकर
वाह
पाऊस
सुंदर! मन प्रसन्न झाले लेख