वाट्या..
लेखनविषय:
सगळं कसं थोडं थोडंसंच उरून बसलेलं..
गिळवतही नसलेलं अन फेकवतही नसलेलं..
बळंच सात आठ घास जास्त खाऊन संपवायला हवं..
नाहीतर मग वाट्यांमधे भरून फ्रीजमध्ये ठेवायला हवं..
फ्रीजमध्ये खूप वाट्या आहेत पूर्वीच उरून बसलेल्या..
उद्या फोडणी देऊ म्हणत परवा तेरवाच नासलेल्या..
पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या..
आतल्या शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या..
मोकळ्या होऊन क्षणभरच दवबिंदूनी डवरणाऱ्या..
पुन्हा स्वतःत जळकी ताजी उरलेली अर्धी कच्ची स्वप्नं कोंबून..
त्यांना बायोडिग्रेडेबल शिळी निर्माल्यं करणाऱ्या..
पुन्हा पुन्हा फ्रीजमध्ये ठासलेल्या ठरीव आकाराच्या थंड वाट्या..
कर्कश आवाजात ओरखडून तारखा नावं घातलेल्या षंढ वाट्या..
वाचने
8510
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
काही बोलायाचे आहे पण
बऱ्याच दिवसांनी खास गविटच
In reply to बऱ्याच दिवसांनी खास गविटच by प्रचेतस
रसग्रहण
गविभौ...
अरे वा .. कर्नलभौ.... एकदम
ऑ...
'षंढ' या शब्दावरून फार पूर्वी
हे असं उरणं बऱ्याच ठिकाणी लागू पडतं
In reply to हे असं उरणं बऱ्याच ठिकाणी लागू पडतं by सर टोबी
<<वडील गेल्यानंतर हे असं
सहजच
गूढ कविता!!
वाट्या...
वाट्या साठवुनी अती मी दमले
वाट्या द्यायच्या असतात.
भारी आहे ! काय लिहावं कळत
शेवटाला दुर्बोध होत गेलेली
द्येवा!
खाण्याची खुप आवड असुनही घरात
In reply to खाण्याची खुप आवड असुनही घरात by शानबा५१२
ओशट म्हणजे तुपकट थर, तेलकट थर
In reply to ओशट म्हणजे तुपकट थर, तेलकट थर by गवि
वशट-ओशट
In reply to वशट-ओशट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो ते ओशट वायलं आणि वशाट
In reply to अहो ते ओशट वायलं आणि वशाट by प्रचेतस
ओह