"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!
'द केरला स्टोरी'
वास्तवाचे भान देणारी ही 'उत्तम कलाकृती'आणि तिचे निव्वळ चित्रपट रसिक या दृष्टिकोनातून केलेले रसाळ रसग्रहण मनापासून आवडले. चित्रपटाच्या निर्मात्यांपासून ते कलाकारांपर्यंत महत्त्वाच्या सर्वांची दखल घेतली गेली आहे हेही विशेष.
In reply to उत्तम परिचय! by चांदणे संदीप
In reply to संतुलित मांडणी by कपिलमुनी
बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..मुनिवर्य, आम्ही चौघे अनेक चित्रपट एकत्र बघतो. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यावर अशा एकत्र पाहिलेल्या चित्रपटांपैकी 'पुष्पा', 'KGF २', 'भूल भुलैया २', 'धर्मवीर - मु.पो. ठाणे' हि पटकन आठवलेली काही नावे! त्यामुळे 'द केरला स्टोरी' हा चित्रपटही एकत्र पाहणे ह्यात आमच्यासाठी तरी विशेष असे काही नव्हते! बाकी प्रोपगंडा तर काय तिन्ही त्रिकाळ आपल्या सभोवती चालुच असतो, त्या पासुन स्वतःचे संरक्षण करणारी 'इम्युनीटी' आमच्यात तयार झाल्याने त्याच्या सहीत जगण्या-वागण्याची आता सवय झाली आहे 😀
In reply to संतुलित मांडणी by कपिलमुनी
In reply to अच्छा.. म्हणजे सगळीकडे सुरू by मोदक
In reply to लव्ह जिहाद by कपिलमुनी
In reply to अच्छा.. म्हणजे सगळीकडे सुरू by मोदक
पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचात्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती? 'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे! परिक्षणाबद्दल धन्यवाद.मुस्लिम मित्र व त्याची बायकोअशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.
In reply to त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती? by Trump
त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती?ट्रंप साहेब चित्रपटाबद्दल त्यांची प्रतिक्रीया काय होती हे मी लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदात लिहिलेले आहे! तरी तुम्ही
'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे!असे जे लिहीले आहे त्यामागे त्यांचे धर्मविषयक विचार काय असतील हे जाणुन घ्यायची जिज्ञासा असावी असे वाटल्याने काही गोष्टी सांगतो... नाही, तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे अशी प्रतिक्रिया नव्हती 😀 आणि विचारांत क्लॅरीटी आणि जीवन शैली/पद्धती विषयी आपले स्वतःचे तत्वज्ञान अंगिकारणाऱ्या मित्रमंडळींच्या संभाषणात असल्या स्पष्टीकरणांची गरजही भासत नाही! आणि धार्मिकतेबद्दल म्हणाल तर त्याचे धर्माविषयक तत्वज्ञान त्याच्याच भाषेत सांगायचे तर "माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते तसेच अजिबात मिठ नसलेला पदार्थ जसा बेचव होतो त्याचप्रमाणे जिवनात धर्म अजिबात नसेल तर जिवनही बेचव होते." असे अगदी सरळ सोपे आहे. हे त्याच्या शब्दात सांगीतले असले तरी आम्हा खास किंवा जवळच्या मित्रपरिवारतील सर्वच मंडळींची विचारसरणी ही अशीच आहे. बाकी धर्मांध विचाराच्या लोकांना (मग ते कुठ्ल्याही धर्माचे असोत) नुसते मित्र म्हणुनही आम्ही स्विकारत नाही! असो.. प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
In reply to @ Trump by टर्मीनेटर
In reply to प्रतिसाद आवडला. by शाम भागवत
In reply to @ Trump by टर्मीनेटर
In reply to बहुतेक हिंदूंचेही हेच विचार आहेत by चौकस२१२
In reply to छान परिक्षण by यश राज
प्रत्येकाने पहिलाच पाहिजे असा चित्रपट.१०००% सहमत 👍
In reply to सिनेमा पाहिला नाही... by कर्नलतपस्वी
In reply to मेरा अब्दुल ऐसा नही है! by सुबोध खरे
In reply to मेरा अब्दुल ऐसा नही है! by सुबोध खरे
मेरा अब्दुल ऐसा नही है!@ सुबोध खरे चपखल! प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीला, तारुण्यसुलभ कल्पनांमध्ये तसे वाटणे स्वाभाविक असले तर तिचा अब्दुल 'तसा' निघाल्यास आयुष्याची राख-रांगोळी होणे अपरिहार्य! @ रंगीला रतन व्हिडीओ आवडला!
In reply to सिनेमा पाहिला नाही... by कर्नलतपस्वी
"पण मला एक समजत नाही समाजात अशा अनेक घटना घडत असताना या पासून कुणी धडा घेत का नाही!"कर्नल साहेब जेव्हा जेव्हा हा विषय ऐरणीवर येतो तेव्हा तेव्हा तो प्रकार कसा खोटा आहे हे समाजमनावर ठसवण्यासाठी सिनेसृष्टीतील नामवंत/पडेल कलाकारांपासून राजकारणी, वकील, प्राध्यापक, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार-संपादक, तथाकथित डावे विचारवंत आणि अशा प्रकाराला ज्यांचे उघड किंवा छुपे समर्थन आहे असे समाजातील विविध घटक हिरीरीने पुढे येतात. त्यावर गदारोळ माजवून विषयाचे गांभीर्य संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो ज्याच्या परिणामी हे प्रकार सुरूच राहतात आणि नवनवीन तरुणी त्याला बळी पडतच रहातात! वास्तविक आज 'लव्ह जिहाद' म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार तसा काही नवीन नाहीये, फार मागे जाण्याची आवश्यकता नाही पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण त्यावेळी समाजमाध्यमे अस्तित्वात नसल्याने ती प्रकरणे आजच्यासारखी प्रकाशात येत नव्हती. लोकलज्जेस्तव अशा पीडित स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेव्हाही पोलिसांत तक्रारी देखील केल्या जात नव्हत्या आणि आजही त्या तेवढ्या प्रमाणात केल्या जात नाहीयेत त्यामुळे अशा प्रकरणांची निश्चित आकडेवारी मिळणे हि अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही गोष्ट 'लव्ह जिहाद' हा कांगावा आहे, असे काही अस्तित्वातच नसते वगैरे वगैरे गळे काढणाऱ्यांना देखील माहीत असते, नाही अशातला भाग नाही. पण दांभिकता रक्तात भिनलेली हि मंडळी आपल्या अजेंड्याला मारक ठरू शकेल अशी कुठलीही गोष्ट पुढे आली कि क्षणाचाही विलंब न करता त्याचा विरोध करण्यासाठी त्वरित पुढे येऊन आकांडतांडव करायला सुरुवात करतात. सध्या 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटावरून उपरोल्लिखित मंडळी जो गदारोळ करत आहेत त्यातून आपल्या मराठी भाषेत प्रचलित असलेल्या "एकतर हागणाऱ्याला तरी लाज असते किंवा बघणाऱ्याला तरी" असा आशय असलेल्या एका जुन्या म्हणीच्या सत्यतेची प्रचिती येत आहे. इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल! (* वरील परिच्छेदाकडे केवळ उदाहरण म्हणून पाहावे तसे लिहिण्यात त्या पीडित माता/भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उपमर्द/अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही.) तत्कालीन चर्चा-बातम्यांमधून होणाऱ्या जनजागृतीपेक्षा चित्रपटाच्या माध्यमातून साधणारा परिणाम नक्कीच प्रभावी आणि दीर्घकालीन असल्याने ह्या चित्रपटाच्या निमित्ताने विषयाची दाहकता आणि गांभीर्य भारतीय समाजापुढे आणून एकप्रकारे जनजागृतीचे कार्य करणाऱ्या निर्माता,दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व चमूचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करावेसे वाटते आणि ह्या चित्रपटाविरोधात काहूर माजवणाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करून, त्यांच्या अजेंड्याला पूरक ठरतील अशा त्यांच्या फाजील प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात आपली ऊर्जा आणि वेळ खर्च न करता Keep Calm and Watch "The Kerala Story" एवढे लिहून माझा प्रतिसाद आवरता घेतो!
In reply to @ कर्नलतपस्वी "पण मला एक समजत नाही by टर्मीनेटर
In reply to @ कर्नलतपस्वी "पण मला एक समजत नाही by टर्मीनेटर
In reply to @ कर्नलतपस्वी "पण मला एक समजत नाही by टर्मीनेटर
In reply to @ कर्नलतपस्वी "पण मला एक समजत नाही by टर्मीनेटर
इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल!
लै जोरशात मारली आहे :=)In reply to मस्तच लिहिलंय! by Bhakti
"मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया."हुशार आहेच की ती, संस्कृतमध्ये पदवी मिळवुन नक्कीच तुमची इच्छा पुर्ण करेल!
In reply to या धाग्याच्या निमित्ताने. by आनन्दा
In reply to आपलं परीक्षण चित्रपट by चौकस२१२
"आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले "प्रत्यक्ष चित्रपट पाहताना ज्या घटनांच्या पार्शवभूमीवर आधारित असा तो संवाद आहे त्या पाहिल्यावर हसू येणार नाही!
In reply to संतुलित आणि समतोल परीक्षण by प्रचेतस
"असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच."मलाही आवडत नाहीत, पण विषयाची योग्य हाताळणी आणि वेगवान, प्रभावी सादरीकरणामुळे हा चित्रपट मात्र आवडला!
"बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)"कोकण-गोवा मालिकेचे २-३ भाग अजून लिहायचे बाकी आहेत, ते झाल्यावर बॉंड पंचविशीला हात घालतो 😀
आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यातकाही वर्षांपूर्वी बंगरूळात असताना शेजारी एक मुस्लीम कुटुंब राहायला आहे. पती पत्नी व एक लहान मुलगा व त्याची साधारण ८-९ वर्षांची मोठी बहिण असे. माझी कन्या ही साधारण त्याच वयाची असल्याने मुलीसोबत तिची गट्टी जमली. मुलगा ३-४ वर्षांचा होता व बालसुलभ ओढीने माझी कन्याही त्याच्या सोबत खेळत असे. काही दिवसंनंतर जाणवले कि मुलीच्या बोलण्यात उर्दू शब्द यायला लागले होते आधी कौतुक वाटले. काही दिवसांनी माझी कन्या रडत रडत घरी आली कारण विचारले तर मुलाने मारले आम्ही बाहेर आलो. परिवारातील मुस्लीम स्त्री मुलाला रागवत होती पण तिने हात काही उचलला नाही. वो मस्सूम है ना असे म्हणुन प्रकरण मिटवले. नंतर एकदा बाहेर अजान चालु असताना मुलगी एकाएक स्तब्ध झाली तिला विचारले असे का केले तर म्हणाली कि अल्ला जहन्नुम मे डालेगा नही तो .तेव्हा जाणीव झाली कि आता काही केले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ लागेल.मी ही आस्तिक आहे व रोजच्या दिनचर्येत देवासमोर बसुन स्तोत्र वगैरे म्हणत असतो पण तो पावेतो कन्येला त्यात समाविष्ट केले नव्हते. आणि विशेष म्हणजे त्या परिवारीत्ल मुलीसाठी रोज संध्याकाळी कुराण पठणासाठी एक मौलवी येत असे तेव्हा ती मुलगी अगदी हिजाब वगैरे घालुन तयार राह्त असे. त्या दिवसांपासुन कन्येला देवासमोर प्रार्थना म्हणणे आरती म्हणणे ह्यात अगदी आग्रहाने घेऊ लागलो. आणि तिला आश्वस्त ही केले कि त्या मुलाने पुन्हा हात उचलला तर दोन ठेवुन दे आम्हीही बोलु कि ये भी मस्सूम है वगैरे. पण ती वेळ न्म्तर आली नाही.
In reply to आपल्या मुलांवर असे संस्कार by कानडाऊ योगेशु
In reply to आपल्या मुलांवर असे संस्कार by कानडाऊ योगेशु
In reply to आपल्या मुलांवर असे संस्कार by कानडाऊ योगेशु
In reply to एक अरब स्टोरी ही बनविण्याची by विवेकपटाईत
In reply to चित्रपट उत्तम आहे. by धर्मराजमुटके
In reply to चित्रपट उत्तम आहे. by धर्मराजमुटके
In reply to चित्रपट उत्तम आहे. by धर्मराजमुटके
"हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे. "नाही, तसे काही नाही. प्रतिसादातून भावना व्यवस्थित पोचल्या!
In reply to बायकोची इच्छा होती म्हणून OTT by सतिश पाटील
"मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही."आपल्या वाचनातुन निसटले असावे काय 😀 असो.. वरील प्रश्न विचारण्यामागील आपल्या हेतु विषयी शंका घेण्यास वाव असला तरी उत्तरे देतो. १)
मग तुम्हाला आवडला का चित्रपट ?ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच अधोरेखीत केलेल्या माझ्या "बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता" ह्या वाक्यातील 'तिलाही' ह्या शब्दात दडलेले आहे 😀 २)
बायकोचे मत तेच तुमचे मत का ?माझे मत काय असावे हे वरती दिलेल्या पहिल्या वाक्यातील 'ती माझी आवडच नाही.' ह्या शब्दांतुन लक्षात येणे तसे अजिबात अवघड नाही. पण तरीही तुम्हाला अपेक्षित असा तुम्ही काढलेला अर्थही मान्य करण्यासही माझी काहीच हरकत नाही, तसेही म्हणतातच ना "Wife is always right" इथेही तसंच समजा हवंतर 😂

In reply to धडे. by कंजूस
In reply to अथांग आकाश | ज्ञानोबाचे पैजार | कंजूस by टर्मीनेटर
In reply to आज आमच्या एका कौटुंबीक by शाम भागवत
In reply to आज आमच्या एका कौटुंबीक by शाम भागवत
In reply to आज आमच्या एका कौटुंबीक by शाम भागवत
एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे.सदर लेखात लेखकाने विचारलेले प्रश्न अजिबात गैरलागू नसले तरी ह्या लेखातला आशय विचारात न घेता तो केवळ एका 'मुसलमान' व्यक्तीने लिहिला आहे म्हणून आपलेच (सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे तथाकथित हिंदू धर्माभिमानी) लोकं एकतर त्याकडे दुर्लक्ष तरी करतील किंवा त्यावर टिका तरी करतील!
"कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात."ह्या विधानाची सत्यता मी स्वानुभावावरुन मान्य करतो! सौदी अरेबिया ह्या कट्टर इस्लामी देशाकडून जगभरातील मुस्लिमांनी त्यांच्या कट्टर 'वहाबी' पंथाची धार्मिकमुल्ये अनुसरावी ह्यासाठी अब्जावधी 'पेट्रोडॉलर्सची' खिरापत वाटली जाते हि गोष्ट आता लपून राहिलेली नाही! भारतातही ह्या 'कार्यासाठी' त्त्यांच्याकडून प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. मदरसे आणि मशिदींना त्यासाठी अर्थपुरवठा केला गेला/जातो आहेच, तसेच अनेक लहानशा खेडेगावांमध्येही टोलेजंग नवीन मशिदिंच्या उभारणीसाठी तुफान खर्च करण्यात आला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत शहरांत/निमशहरी भागांत आणि लहान-सहान खेडेगावांमध्ये कितीतरी अशा नवीन/चकाचक मशिदिंची उभारणी झालेली आपल्यापैकी अनेक डोळस लोकांच्या दृष्टीस पडली असेल. मशिदींच्या घुमटावरील किंवा मिनारांवरील चंद्रकोरीच्या विशिष्ट कोनावरून अशा सौदी 'फंडिंग' मधून उभारलेल्या नविन मशिदी ओळखणे आधी तसे सोपे होते, पण आता हळू हळू अनेक जुन्या मशिदींवरील चंद्रकोरींचा कोनही बदलण्यात येत असल्याने पुढे अशी ओळख पटवणे अवघड होत जाईल. तर सांगायचा मुद्दा काय तर, जगभरातील सर्व मुस्लिमांची वेशभूषा अरबी पद्धतीची आणि बोली भाषा अरबी असावी ह्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. 'उर्दू' ह्या एतद्देशीय भाषेला मूठमाती मिळून भारतीय मुस्लिमांची बोली भाषाही अरबी करण्यासाठी आणि कुराण पठणासाठी मदरसे आणि मशिदींमधून अरबी भाषेचे वर्ग चालवले जातात तसेच भरघोस पारितोषिकांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. लेखात मी उल्लेख केलेल्या माझ्या मुस्लिम मित्राची 'कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल'मध्ये शिकणारी (आता) १२ वर्षाची झालेली मुलगी लॉकडाऊन संपल्यानंतरही शाळा उघडल्या नव्हत्या त्या काळात मशिदीमध्ये चालणाऱ्या अशा 'अरबी' भाषा वर्गासाठी जात होती. अरबी भाषेचा गंधही नसलेल्या पण जात्याच हुशार असलेल्या ह्या मुलीने अवघ्या सहा महिन्यांत त्या भाषेवर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यातील प्राविण्य जोखण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिकही पटकावले. भारतात उर्दू भाषेतील बातम्या/कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिन्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत पण येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले. आता हे त्या लहान मुलांनी अरबी भाषा शिकावी म्हणून दाखवलेले प्रलोभन होते/आहे कि खरंच त्यादृष्टीने तयारी सुरु आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच. एकीकडे 'अल जझीरा' वाहिनीवरील वृत्तनिवेदिकांसारखा पोशाख आणि अगदी हुबेहूब त्यांच्याच लकबीत वार्तांकन करण्याच्या तिच्या सरावाचे व्हिडीओ जेव्हा हि मुलगी मला पाठवते तेव्हा तिची प्रगती बघून फार कौतुकही वाटते तर दुसरीकडे ह्या 'वहाबीकरणातून' भारतीय मुस्लिमांमध्ये वाढत जाणाऱ्या धार्मिक कट्टरतेची चिंताही वाटते. हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!
In reply to एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप by टर्मीनेटर
येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले.म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!
In reply to येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार by अथांग आकाश
म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!होय! आधी जास्तीतजास्त भारतीय मुस्लिमांना अरबी भाषा शिकवायची. मग स्थानिक अरबी वाहिन्या सुरु करायच्या. शहरांपासून गावखेड्यांपर्यंतच्या सुशिक्षित/अशिक्षित, गरीब/श्रीमंत अशा सर्व स्तरांतल्या सुमारे वीस कोटी मुस्लिमांना प्रभावित करू शकणारे हे माध्यम हाताशी आले कि मग त्यावरील कार्यक्रमांतुन कट्टर वहाबी पंथाची शिकवण/चालीरीती ह्यांचा रतीब घालायचा असे काहीसे नियोजन असावे असा अंदाज लावता येईल.
In reply to म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!! by टर्मीनेटर
In reply to हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक by मुक्त विहारि
हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!असे ते एकसंध वाक्य आहे, त्यातले अर्धे वाक्य तुम्ही वेगळे काढुन अधोरेखीत केल्याने संपुर्ण वाक्याच्या मुळ अर्थाचा विपर्यास होतोय आणि त्यामुळे पुढचा तुमचा सगळा प्रतिसादच भरकटल्यासारखा वाटतोय 😀 मुळ वाक्यांची मोडतोड करुन त्यांच्या अर्थाचा विपर्यास करुन सादर करण्याची पत्रकार आणि न्युज चॅनल्सच्या अॅंकर्सची सवय आता त्यांच्या वाचक्/प्रेक्षकांमध्येही उतरत चालली आहे असे वाटते. असो.........
In reply to हे प्रकार वेळीच रोखले गेले by टर्मीनेटर
In reply to बरीच किंमत दिली पण वाचली by श्रीगुरुजी
In reply to काही कच्चे दुवे by सर टोबी
In reply to शहामृगी प्रवृत्तीचे ढळढळीत by श्रीगुरुजी
वा, मस्त !