मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिस सरतो असा...

Deepak Pawar · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला. दिस मेघापरी झरुन चालले दिस वाळूपरी सुटून चालले दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला. दिस गंधापरी विरून चालले दिस रंगापरी पुसून चालले दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला. दिस आले कधी सोबती घेउनी दिस गेले कधी एकटा सोडुनी दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला. दीपक पवार.

वाचने 2733 वाचनखूण प्रतिक्रिया 6
वा वा वा. अतिशय सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना. आपल्या आयुष्यातून काहीतरी कायमचे सरून चालले आहे, ही अस्वस्थ करणारी जाणीव ओळीओळीतून झिरपते आहे. सुबह होती है शाम होती है .. उम्र यूंही तमाम होती है.... (मुन्शी अमीरुल्लाह तस्लीम) हे आठवले.

कर्नलतपस्वी 26/12/2022 - 14:11
दिस चार झाले मन पाखरू होऊन. कविवर्य सौमित्र यांची कवीता आठवली.

भागो 26/12/2022 - 20:04
चित्रगुप्त +१ मला चित्रगुप्त ह्यांच्या प्रमाणे लिहिता येत नाही. पण त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत. मनातले भाव शब्दात व्यक्त करण्याची दैवी देणगी मिळाली आहे तुम्हाला.