शहरातले गाव

पाषाणभेद जे न देखे रवी...
रस्त्याने जातांना अचानक उंच इमारती डोंगर होतात त्यावरील काचेची तावदाने डोंगरावरील हिरवळ होते रस्त्यांच्या नद्या होतात त्यातून रहदारीचे पाणी वाहते जाणारी वाहने होड्या होतात बाजूची घरे शेतातली झाडे होतात त्यावेळी मात्र मी शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो - पाभे २१/१०/२०२२
वर्गीकरण

8 टिप्पण्या 3,605 दृश्ये

Comments

चित्रगुप्त नवीन

कोणताही अनुभव टोकाला गेला की कधीकधी असे काहीतरी झाल्याचे अनुभवाला येते, असे अनुभवी लोक सांगतात, तसे मलाही काही अनुभव आलेले आहेत, ते इथे लिहीण्याचा अनुभवही घ्यायला हवा, पण सध्या टंकाळा अनुभवत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

मस्त. आवडली कविता. ही जरा वेगळी आहे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

हेमंतकुमार नवीन

मस्त कल्पना आणि रचना.

श्वेता२४ नवीन

भारी विरुद्ध कल्पना केली आहे! आवडली

शानबा५१२ नवीन

आपण वेगात चालणा-या गाडीत होतात का? ही कल्पना अशा सिनारियोमध्ये खुप सुट होते. जेव्हा आपण खुप दीवसांनी गावाला जातो. :-)