शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...
लेखनविषय:
काव्यरस
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.
बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.
रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.
तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने........
वाचने
2729
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
लिहिते राहा. ( प्रतिसादांचा विचार न करता)
-दिलीप बिरुटे
तेच म्हणतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, विजुभाऊ सर आपले मनःपूर्वक आभार.
आवडली.
In reply to आवडली. by प्राची अश्विनी
प्राची मॅडम मनःपूर्वक धन्यवाद.
देवाला, देशाला, प्रिय व्यक्तीला वगैरे उद्देशून तूच अमूक, तूच तमूक वगैरे कविमंडळींचे आवडते टेंप्लेट आहेसे दिसते, उदाहरणार्थः
मेरी आरजू मेरा ख्वाब तू
मेरी रातों का महताब तू
मेरा इश्क तू है करार तू
मेरी जिंदगी की बहार तू
तू ही तो है रूह का सुकून
तू ही तो है मेरा जुनून ..... वगैरे.
छान.