एक होतं ढोर
लेखनविषय:
एक होता परा आदी कवितांमधून प्रेरणा घेऊन ही बालकविता रचण्याचा प्रयत्न.
एक होतं ढोर
एक होतं ढोर
त्यानं पाहिला चोर
ढोर लागले चोराच्या मागे
चोर पळाला वेगे वेगे
"वाचवा ! वाचवा !!"
चोर ओरडला
लोकं धावली
ढोरालाच पकडायला
अखेर लोकांनी
ढोराला पकडून
खुंट्याला बांधून
ठेवला करकचून
चोराला आनंद झाला फार
म्हणे , ढोरांपेक्षा माणसेच हुशार
मुक्या प्राण्याची मुकी वेदना
ढोराला काहीच सांगता येईना !!
वाचने
1376
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
खूप छान