मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पी एच डी

सन्जोप राव · · काथ्याकूट
व्यावसायिक गरज म्हणून सहा वर्षांपूर्वी मी व्यवस्थापन या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी केली. त्या वेळी पण आवडत्या विषयावर अभ्यास करण्याचे समाधान मिळाले, नाही असे नाही, पण त्याच वेळी आपल्या अधिक आवडत्या विषयावर मराठीतून पीएच.डी करायला मिळाली तर काय बहार येईल असेही मनात येऊन गेले. माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला. सहा वर्षे काम केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मला 'जी.ए.कुलकर्णी यांचे साहित्य : कन्नड मराठी सांस्कृतिक अनुबंध' या प्रबंधासाठी 'विद्यावाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली. या वयात हे काम करता आले, हे समाधान अपार आहे. मला बळ आणि सदिच्छा देऊ केलेल्या असंख्य शुभचिंतकांचा मी आभारी आहे. या प्रबंधाचे पुस्तक करता आले तर अधिक समाधान वाटेल.

वाचने 6186 वाचनखूण प्रतिक्रिया 25

सौंदाळा गुरुवार, 08/18/2022 - 14:20
अभिनंदन रावसाहेब. तुम्ही वाचकांच्या मनात उत्तम लेखक म्हणून आहातच त्यावर विद्यापीठाची मोहोर लागली. मिपावर तुमचे लेख वाचण्यास उत्सुक आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 08/18/2022 - 14:52
नशीबवान आहात, शिक्षणाची आवड आणी संधी आपल्या कडे आहे आणी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहात.प्रशंसनीय. उपलब्धी बद्दल अभिनंदन पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.

Bhakti गुरुवार, 08/18/2022 - 15:25
माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला.
वाह! उल्लेखनीय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/18/2022 - 15:38
मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा....! प्रबंधांचे पुस्तक व्हावे यासाठीही शुभेच्छा...! आमच्या विद्यापीठात प्रबंधाचे पुस्तक करण्यासाठी विद्यापीठा ग्रँटही देते. केवळ माहितीस्तव. -दिलीप बिरुटे

खेडूत गुरुवार, 08/18/2022 - 16:20
अभिनंदन आणि शुभेच्छा!! पी हेच डीला एकलव्य मोडमध्ये काम करायला लागतं असे ऐकले आहे. आता इकडेही लिहायला आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा.

चिन्मना गुरुवार, 08/18/2022 - 16:24
डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुमच्या मनात प्रबळ इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याची चिकाटी पण होती त्यामुळेच हे साध्य होवू शकले.

प्रदीप गुरुवार, 08/18/2022 - 16:35
जी. ए. तुमच्या जुन्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या विषयांत अगदी प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवल्याबद्दल कौतुक व हार्दिक अभिनंदन. हा प्रबंध कुठे वाचता आला तर आनंद होईल.

सोत्रि गुरुवार, 08/18/2022 - 20:05
संजोपराव, डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! - (संजोपरावांच्या लेखनाचा पंखा) सोकाजी

कंजूस Fri, 08/19/2022 - 08:22
हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव. ------------- पुस्तकासाठी बरेच पर्याय आहेत. विकायचे असेल A/नसेल Bतर दोन्हीही. ओडिओ बुकही. A - फ्री डाउनलोड साठी google driveवर टाकणे. A1चित्रं नसतील तर टेक्स्ट फाईल A2पीडीएफ फाईल A3ओडीओ फाईल AT - blogger / WordPress B -विकणे B1 प्रकाशक बघणे B2 - KDP Kindle Direct Publishing. Kindle help pageवर माहिती दिली आहे.

गामा पैलवान Fri, 08/19/2022 - 18:08
डॉक्टर संजोप रावांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान केल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे अभिनंदन. -गा.पै.