उशीराने आले ध्यानी
एकटे गर्दीत बसून
मला अनोळख्या देशी
आज्जी गेलीय सोडून
घरातून निघताना
का बोलली ती नाही?
तुला लेकरा घरात
जागा उरलीच नाही
आई बाबा गेल्यावर
आज्जी तूच उरलेली
कुणाकुणा पोसशील
तूही आता थकलेली
माझ्या इवल्या बहिणी
आणि भाऊ लहानगे
तुला आज्जी, म्हणतील
कुठे दादा आमुचा गे?
काय सांगशील त्यांना
मला सांगशील का ग?
आज्जी एवढ्याचसाठी
पुन्हा भेटशील का ग?
- संदीप चांदणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6234
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजी म्हणजे एक हळवा कोपरा.
सगळ्यात जवळचे
ओह !
का बॉ सोडले लैकराला एकट्यालाच
+१
In reply to का बॉ सोडले लैकराला एकट्यालाच by सस्नेह
आवडली.
मला
चुटपुट लावणारी कविता अतिशय आवडली.
हो की.. मान गये!!
In reply to चुटपुट लावणारी कविता अतिशय आवडली. by चित्रगुप्त
वा !
वा!!
हळवे लिखान..