(किती काळ तुडवायचे)
लेखनविषय:
पेरणा किती काळ झुलवायचे
http://misalpav.com/node/50291
किती काळ तुडवायचे
खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला हाणताना उसवायचे खुर्चीवर मी आडवे व्हावे जरासे तोच तु काही खोटे बरळायचे खोट्या खायच्या तू शपथा गळ्याच्या आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे खोट्या आसवांची सवय झाली आम्हाला नाटक दुसरी कडे हे करायचे नार्को टेस्टलाही फेल तुम्ही करायाचे अन आम्हाला साहेबांनी झोडपायचे पैजारबुवा
वाचने
6013
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हा .... हा .... हा .... हा .... हा .... !
😂
एक नंबर जमलीय !मस्तच.
छान आहे
कल्पना चांगली पैजारबुवा! थोडे मीटर आणखी सांभाळले तर लज्जत तिप्पट होईल! :-)
पैजारबुवांची कथा अन फोलिसांची व्यथा.
कहर आहे माऊली. =))
पैजारबुवा, भारीच!
सं - दी - प
=))
असल्या विषयावरही काव्य स्फुरतं, याला पराकोटीची प्रतिभा हवी :))
लिहिते राव्हा...!
-दिलीप बिरुटे
मूळ प्रेरणाकवींनी 'गुन्हा कबूल' अशि प्रतिक्रिया दिली असेल
अगदी वेगळ्याच विषयावर विडंबन!! छान आहे.
(कोठडीची तुम्हाला एकदम बारकाईने माहिती कशी? काही अनुभव आहे वाटते!)
हा .... हा .... हा .... !