शशक'२०२२ - आंबा

साहित्य संपादक स्पर्धा
तेजस सोसायटीच्या एका कोप-यात देशमुख कुटूंब गेली अनेक वर्ष रहात आहे. म्हणायला ते कुटूंब खरे , पण केवळ दोनच माणसे त्या घरात राहायची. सकाळचा मिक्सरचा आवाज सोडला , तर त्या कोण राहत आहे का नाही इतपत शंका येईल अशी शांतता असायची. या शांततेचा भंग व्हायचा तो उन्हाळ्यात. देशमुखांच्या अंगणात आंब्याचे झाड होते. मोहर लागताच सोसायटीचे पोरे आजूबाजुला दबा धरून असायची. जरा चाहूल लागली की काका आपली काठी घेऊन बाहेर धावत येत. बरेच दिवस हा प्रकार काकू बघत होत्या. शेवटी न राहावून त्यांनी काकांना आंबे द्यायला सांगितले तर काका फक्त हसले. त्यांच्या हुसकावण्यातच आंबे चोरायची गंमत लपली होती हे त्यांना पुरते ठाऊक होते.

14 टिप्पण्या 48,167 दृश्ये

Comments

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) नवीन

+१

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by विजुभाऊ

कळली नाही? शेवटी धक्कातंत्र वापरलंय, मला वाटलं एकटं कुटूंब, कोपर्यात, शांतता, म्हणजे काहीतरी भूताटकी असेल. काका लहान मूलांमागे लागायचे ना मिक्सरचा आवाज ह्याचा संबंध मी वेगळाच जोडला म्हणजे ती मूलं मिक्सरमध्ये…… पण तसं काही नसल्याने धक्का बसला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

छान -दिलीप बिरुटे