शशक'२०२२ - मु. पो. वाटंब्रे

साहित्य संपादक स्पर्धा
ओढ्याला पाणी असं, की गाडी घालावी की न घालावी? अशावेळी काठावर बसलेले गावकरीच आधार. “पावणं आमी सांगतो तशी घाला गाडी बिनघोर!” धीर करून गाडी घातली, की काठावरून आरडा सुरू. हांहां, तिकडं नगं, हिकडं मारा, करत गाडी मधे जायची अन नेमकी रूतायची! “तुमाला सांगत हुतो, तरी घोळ केलाच. आता गाडी वडावी लागंल, ६० रुपये हुतील बघा.” हे ऐकल्यावर गाडीवानाचा कपाळावर हात! अखेर काकुळतीला आलेला गाडीवान मुकाट पैसे काढत असे अन् पाचच मिनिटात गाडी पार! पिढ्यानपिढ्या ही वाटमारी गाव करतंच राहिलं. सरकारने पूल बांधायला माल टाकला, की सकाळी गायब! म्हणून लोकांनीच गावाला नाव दिलं वाटंब्रे! आजही ते मिरज पंढरपूर रस्त्यावर सांगोल्याजवळ आहे.

23 टिप्पण्या 55,732 दृश्ये

Comments

सर टोबी नवीन

शशकच्या बाबतीत हे वर्ष खासच आहे. काहीतरी अगम्य कारणामुळे शशक म्हटलं की धक्का तंत्र अशी समजूत आणि त्यासाठी कल्पिलेल्या अगम्य गोष्टी ते हा साधा सोपा किस्सा. या वर्षी लेखकांनी खूपच विविध आकारबंध हाताळले आहेत. मजा आली.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) नवीन

+१

अमरेंद्र बाहुबली नवीन

+१ कथा आवडली पण ऊलट क्रम हवा होता. सरकारने पूल बांधायला माल टाकला, की सकाळी गायब! म्हणून लोकांनीच गावाला नाव दिलं वाटंब्रे! आजही ते मिरज पंढरपूर रस्त्यावर सांगोल्याजवळ आहे. ओढ्याला पाणी असं, की गाडी घालावी की न घालावी? अशावेळी काठावर बसलेले गावकरीच आधार. “पावणं आमी सांगतो तशी घाला गाडी बिनघोर!” धीर करून गाडी घातली, की काठावरून आरडा सुरू. हांहां, तिकडं नगं, हिकडं मारा, करत गाडी मधे जायची अन नेमकी रूतायची! “तुमाला सांगत हुतो, तरी घोळ केलाच. आता गाडी वडावी लागंल, ६० रुपये हुतील बघा.”

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

अरे वाह...! खासच विषय आवडला. लै भारी हं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि नवीन

+१ . मस्त कथा . वाटंब्रे गावाबद्दलची हि कथेतील माहिती वाचुन "एक डाव भुताचा" मधील टगेवाडी गाव आठवले . मिरज - सांगोला रस्त्यावरील शिरढोण , नाझरे , कवठे महांकाळ , वाटंब्रे , नागज , जुनोनी , कोळे हि गावे या कथेमुळे आठवली .

श्रीराम बिडीकर नवीन

मी सांगोल्याचा असून पण मला ह्या गावाच्याबद्दल अशी काही माहिती नव्हती.. माहितीबद्दल धन्यवाद!! माझे वडील सांगोल्यात ७० च्या दशकापासून किराणा दुकान चालवत आहेत.. त्यांनी एकदा आठवण सांगितली.. ७० च्या दशकात सांगोला ते सांगली (अंतर सुमारे १०० किमी) साठी एसटी चे तिकीट जवळपास १५/- रू होते. पावसाळ्यात ह्याच वाटंबरे गावच्या जवळून वाहत जाणाऱ्या माण नदीला पूर आल्यावर ह्या गावातील नावाडी नदी पार करून पैलतीरावर नेण्यासाठी त्याकाळी १०/- रु घ्यायचे, कारण तेव्हा नदीवर पुल बांधून झाला नव्हता. त्याकाळी वडील सांगलीला जाताना नेरो

चौथा कोनाडा नवीन

In reply to by श्रीराम बिडीकर

उरलेला प्रतिसाद वेगळा टंकून पोस्टावा. स्पेशल अक्षरे, इमोजी, ग्राफिक्स त्यात येऊ नये.. त्यामुळेच फक्त मथळा येतो.. प्रतिसादातील अक्षरे येत नाहीत.

श्रीराम बिडीकर नवीन

In reply to by श्रीराम बिडीकर

ह्या अनुभवावरून, त्या काळात पावसाळ्याच्या दिवसात माझे वडील मिरज सांगलीला जाताना एसटी ऐवजी रेल्वेने जात होते कारण पूर परिस्थिती आली तर नदी ओलांडून जाताना अडचण येईल म्हणून..

स्वधर्म नवीन

कृपया अपूर्ण प्रतिसाद पूर्ण करावा. आणखी नवी माहिती असेल तर वाचायला आवडेल.

सिरुसेरि नवीन

अलीकडेच मिरज - सांगोला - सोलापुर असा बायपास हाय वे झाल्यामुळे बहुतेक गाड्या या गावांच्या बाजुने जातात . ( शिरढोण , नाझरे , कवठे महांकाळ , वाटंब्रे , नागज , जुनोनी , कोळे , मंगळवेढा इत्यादी ) .