मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२००२ - टेडी बेअर

साहित्य संपादक · · स्पर्धा
गेली बारा वर्षे मी इथेच आहे. रोज तिला मी या शो केसेमधून पाहतोय. ती मोठी झाली आणि मी बेडवरून शो केसमध्ये आलो. आता तिच्या एका कटाक्षाची वाट बघत असतो. आज तिने मला बाहेर काढले. सगळी धूळ स्वच्छ केली. मागची चेन काढली आणि नवीन कापूस भरून मला आधीसारखे गुबगुबीत केले. नंतर बाजूच्या गिफ्ट बॉक्समध्ये पॅकही करुन टाकले. आमची ती शेवटची भेट. आता कदाचित मला नवीन मैत्रिण मिळणार होती. मी वाट बघत राहिलो. अखेरीस तो बॉक्स कोणतरी उघडला आणि बॉम्बसारखा धडाम आवाज माझ्या कानात घूमला. . . "घाबरलीस का ग ? अग राजेश खाली बॉम्ब फोडतोय. काढ तो टेडी बेअर आणि सगळ्यांनी मिळून खेळा त्यासोबत !"

वाचने 11425 वाचनखूण प्रतिक्रिया 17

वामन देशमुख 22/05/2022 - 14:03
+1

अमरेंद्र बाहुबली 23/05/2022 - 13:52
ह्या कथेत “ति”ला अतिरेकी जमातीतील महीलेचे नाव दिले असते तर खूप ईफेक्ट पडला असता. एनीवे +१

श्वेता व्यास 23/05/2022 - 14:31
+१

सुजित जाधव 23/05/2022 - 16:22
+१

ब़जरबट्टू 23/05/2022 - 23:14
मस्त !

असा मी असामी 27/05/2022 - 12:16
+१

प्रसाद_१९८२ 30/05/2022 - 16:07
+१