शशक'२०२२ - नथिंग न्यू अंडर द सन
“मुळ्याची भाजी, वेळ पाहुन खावी” अशी म्हण का बरं नाहीये ? चौथी ब मधल्या त्याने तळमळत विचार केला. डोळे मिटलेले होते.
पाच मिनीटं “मौन”मध्ये काढणे अशक्यप्राय. काहीतरी करायलाच पाहीजे.
त्याने डोळे किलकीले केले, आणि टिचर मोबाईल मध्ये डोकं खुपसून आहेत पाहुन त्याला हायसे वाटले.
डेस्कवर सेलोची स्टीलची बाटली होती. ती स्टीलच्या बाकावर पाडायची आणि होणार्या आवाजासोबत आपला कार्यभाग उरकून घ्यायचा. दुसरा पर्यायच नाही,
बाटली डेस्कच्या उजव्या कोपर्यात होती. हात थेट पोहोचत नव्हता.
तो थोडासा वाकला आणि...
विस्फोट.
विस्फोट आणि हास्यकल्लोळामधल्या पाच सेकंदाच्या स्तब्धतेमध्ये त्याला “वर्गात उमगले मजला, संपले बालपण माझे...” अश्या ओळी सुचल्या. “हम्म, कवितेत छान वाटतील ना या ओळी...?”
वाचने
4992
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
+१
-१
In reply to -१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ. ना +१. :-)
यात काय आहे? विनोद की कथा तेच
In reply to यात काय आहे? विनोद की कथा तेच by विजुभाऊ
-१
हा .... हा .... हा .... !
अजिबात आवडली नाही, नो मार्क्स