‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन
याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते.
मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला (व्हिसावर तसे वाक्य बॉलपेनने लिहून त्यावर सेलोटेप लावला होता ते आठवते). आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले.
हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘मेहरान’ नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून ३ दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो.
जेव्हा आपण भारतातून श्रीमंत देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते.
माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते).
विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी -श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते.
परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली,
“जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”.
ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली.
परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”.
पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडेफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणे दिसतो. तिथून भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही.
अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला.
आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले.
त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता.
मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.(यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागून मी त्या परीक्षेत ८० पर्सेंटाइल गुणांनी उत्तीर्ण झालो).
जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले.
दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच.
असो.
लेखातील घटनेनंतर पुढील आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी बाद करून टाकलेला आहे. परदेश पर्यटन करायचे ठरल्यास कुटुंबाकडून अर्थातच अन्य देशांना पसंती मिळेल. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील.
........................................................................................................................................................
ऑफ बीट भटकंती म्हटली पाहीजे.>> होय, म्हणूनच फोटो, प्रेक्षणीय .... असे काहीही नाही. तेव्हा स्वतःकडे कॅमेराच नव्हता तर कसले काय !
In reply to पाकिस्तान by कपिलमुनी
In reply to मला बांगलादेश ही फिरायला by चौथा कोनाडा
In reply to मला बांगलादेश ही फिरायला by चौथा कोनाडा
सध्या तिथं जायला काय परिस्थिती आहे, माहित नाही.>> गेली अनेक वर्षे तिकडचा पर्यटन-व्हिसा मिळत नाही असे काही दर्दी लोकांनी सांगितले. (मला माहित नाही). वाघा सीमेवर पूर्वी रोज इकडच्या व तिकडच्या १० लोकांना पलीकडच्या हद्दीत २० पावले चालू देत. सध्या माहित नाही.
In reply to ... by हेमंतकुमार
In reply to 1980 च्या दशकातील पासपोर्टवरील ते दक्षिण आफ्रिकेसंबंधीचे वाक्य by तुषार काळभोर
In reply to तु का , by हेमंतकुमार
In reply to तु का , by हेमंतकुमार
In reply to ... by हेमंतकुमार
In reply to सुंदर लेख. by सौन्दर्य
In reply to सुंदर लेख. by सौन्दर्य
In reply to इंटरेस्टिंग by जेम्स वांड
In reply to लेख आवडला by मुक्त विहारि
मला भेटलेले सगळेच पाकिस्तानी, एक नंबरचे हरामखोर होते ...तुम्ही अखिल डोंबोलीकर हिंदू हृदयसम्राट आहात हे त्यांना अगोदरच कळाले असेल त्यामुळे ते तुमच्याशी असे वागले असतील :)
In reply to तुम्ही हिंदू हृदयसम्राट आहात हे त्यांना अगोदरच कळाले असेल by धर्मराजमुटके

In reply to रोचक अनुभव!! by तुषार काळभोर
आपले दोन रुपये तिकडच्या अर्थव्यवस्थेत सामील होऊ नयेत असं वाटतं.भारत पाकिस्तानकडून बर्याच गोष्टी आयात करतो. यात खाद्यतेल, कपडे, प्लास्टीक, सिमेंट, खेळाचे सामान अशा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत. https://tradingeconomics.com/pakistan/exports/india त्यामुळे इनडायरेक्टली आपले काही पैसे त्यांच्या अर्थव्यवस्थेत सामील होतातच. डिकॅथलाॅन मधे मेड इन पाकिस्तान सामान बरेच असते विक्रीस.
In reply to रोचक अनुभव!! by तुषार काळभोर
In reply to नकोशा शेजाऱ्यांशी आयात निर्यात by सर टोबी
In reply to ! by हेमंतकुमार
In reply to कुमार सर by सर टोबी
भारत व पाक हे भविष्यात कधी ना कधी एकत्र येऊन विलीन होतील(च)” अशी त्यांना आशा होती आणि त्यांची इच्छाही होती.हे वाचल्यावर मला आश्चर्यही वाटले आणि काहीसा धक्काही बसला. परंतु हे म्हणणारी व्यक्ती खूप आदरणीय असल्यामुळे मी शांतपणे त्यावर फक्त विचार केला. जगाच्या इतिहासात जर्मनीचे एकीकरण ही ठळक घटना माझ्या नजरेसमोर आली. अर्थात त्यांची संस्कृती वेगळी आहे व आपली वेगळी. खूप विचार करता मला माणेकशांचा विचार काही झेपला नाही. असो. इतरांना काय वाटते याबद्दल ?
In reply to +१ by हेमंतकुमार
इतरांना काय वाटते याबद्दल ?विचारलेच आहे आणि विषय निघाला म्हणून लिहितो. माझे मत खरं तर तिकडची जमीन पाहिजे पण लोकं नकोत असे आहे. कोणाला त्या घाणीबरोबर राहायची इच्छा आहे? पण तसे करता येणे शक्य नसल्याने भारत-पाकिस्तान विलीनीकरण वगैरे व्हायला नको असे मला वाटते.
In reply to रोचक अनुभव!! by तुषार काळभोर
साधारण १९८० पर्यंत पाकिस्तान हा आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा अधिक पुढे होता. दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अधिक होतं.हो. पाकिस्तानची जमीन सुपीक आहे. ब्रिटिश काळातच पश्चिम पंजाबमध्ये कालव्यांचे जाळे निर्माण केले गेले होते. सिंधमध्येही सिंधू नदीमुळे जमीन बर्यापैकी सुपीक आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला भरपूर मदत मिळाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून १९८० पर्यंतच नाही तर अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त होते. जागतिक बँकेच्या वेबसाईटवर पुढील विदा मिळाला
यदाकदाचित जर कधी ते सुधारले तर जरूर एक भेट द्यायची इच्छा आहे.हे या जन्मी तरी शक्य होईल असे वाटत नाही.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा by तुषार काळभोर
In reply to वरील दोन्ही प्रतिसाद उत्तम ! by हेमंतकुमार
तर पाकिस्तानात लोक गरीब आहेत आणि सरकारकडे पैसा बर्यापैकी आहे"किती साली हे म्हटले होते?
In reply to किती साली हे म्हटले होते? by Trump
In reply to आभार ! by हेमंतकुमार
लाहोरच्या भारतीय संगीत विद्यालयाबद्दल काही वाचनात आले होते. बहुतेक पंडित पलुस्कर किंवा पंडित भीमसेन यांच्यापैकी कोणाचा तरी तिथे बऱ्यापैकी संबंध होता, असे अंधुकसे आठवते.हो. लाहोरमध्ये पंडित दि. वि. पलुसकर यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
- द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्थंभलेखनातून भारतीय संघाच्या क्रिकेट दौर्यांच्यावेळच्या पाकिस्तान भेटींबाबत काही वेळा वाचले होते.
- पवन जेसवानी या पाकिस्तानी युवकाच्या युट्युब चॅनेलवर काही व्हिडिओज पाहिले होते.
- लोकमाध्यम या हिंदी ब्लॉगवर असग़र वजाहत - पाकिस्तान का मतलब क्या ही लेखमालिका सध्या सुरु आहे.
- पाकिस्तानातल्या देवळांबाबत युट्युबवर काही व्हिडिओज मी गेल्या वर्षी पाहिले होते.
In reply to रोचक अनुभवकथन by श्रीरंग_जोशी
१९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा.......... 1960 मध्ये माझ्या एका नातेवाइकांनी ही परीक्षा मुंबईत दिली होती. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. ज्या दिवशी या परीक्षेचा निकाल लागे, तेव्हा अमेरिकेचे एजंट इथल्या उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांशी स्वतःहून संपर्क करून त्यांना अक्षरशः 'उचलून' नेत !
In reply to हे काही समजले नाही, असे का? by मनो
In reply to हे काही समजले नाही, असे का? by मनो
In reply to @ कुमार१, by अनिंद्य
In reply to अनींद्य, आभार ! by हेमंतकुमार
In reply to पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला by सुबोध खरे
पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला असेल तर इस्रायल किंवा अन्य काही देशात जाण्यासाठी तुम्हाला अजिबात व्हिसा मिळत नाही.आपला देश जगात कसा कुख्यात आहे हे बहुदा पाकिस्तान्यांनाही माहित आहे. बहुदा त्यामुळे कर्तारपूर कॉरीडॉरला जाताना भारतीयांचा पासपोर्ट स्टॅम्प होत नाही. आपल्या पासपोर्ट नंबरशी संलग्न असा त्यांचा एन्ट्री पास मिळतो आणि त्या पासवर पाकिस्तानात गेल्याची एन्ट्री होते. पण पासपोर्टवर शिक्का येत नाही. तसा शिक्का पासपोर्टवर आला असता तर कदाचित तिथे जाणार्या भारतीयांची संख्या बरीच कमी झाली असती. तिथे दररोज ५ हजार भारतीयांना पास दिले जातात. समजा तितके लोक तिथे दररोज गेले तर प्रत्येकाकडून २० डॉलर असे दररोज १ लाख डॉलर म्हणजे वर्षाला ३६.५ मिलिअन डॉलरचे परकीय चलन पाकिस्तानला मिळू शकते. https://tradingeconomics.com/pakistan/foreign-exchange-reserves वर दिलेल्या आलेखावरून समजते की ही रक्कम पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दरवर्षी भर पडते त्याच्या एक-दीड टक्का आहे. चार किलोमीटरच्या कॉरीडॉरमधून इतके उत्पन्न त्यामानाने बरेच आहे त्यामुळे अशी भारतीयांची संख्या कमी होणे त्यांनाही परवडायचे नाही. कर्तारपूर कॉरीडॉरवर बरेच युट्यूब व्हिडिओ आहेत. त्यातील एक--
In reply to पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला by सुबोध खरे
In reply to अगोदर इस्राईलला जाऊन यायचे मग by अभिजीत अवलिया
In reply to अवलिया भाऊ का अवलिया इलाज by जेम्स वांड
In reply to पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला by सुबोध खरे
In reply to "पाकिस्तानचा व्हिसा एकदा by चौकस२१२
In reply to शंका by हेमंतकुमार
In reply to सरसकट असे करत नसावेत by श्रीरंग_जोशी
कुठलाही देश असे सरसकटीकरण करत असेल असे वाटत नाही.८-१० वर्षांपूर्वी मला उगीच वेगवेगळ्या देशांचा व्हिजा मिळवायची काय पध्दत आहे, त्याचे नियम काय आहेत हे बघायची सवय लागली होती. मी आयुष्यात कधीही जायची सुतराम शक्यता नाही अशा देशांचे (मंगोलिया, बुर्किना फासो वगैरे) पण नियम मी त्यावेळी बघितले होते. त्यावेळी कळले होते की पासपोर्टवर इस्राएलचा शिक्का दिसला तर काही देशांमध्ये प्रवेश नाकारला जातो. आता इस्राएल आणि युएई-सौदीमधील संबंध सुधारत आहेत तेव्हा नियम कदाचित बदलले असतील. कल्पना नाही. मागच्या वर्षी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये नागोरनो-काराबाख या प्रांतांवरून युध्द झाले होते. नागोरनो-काराबाख हे आर्मेनियन बहुसंख्येचा अझरबैजानमध्ये असलेले बेट आहे. हा प्रदेश अधिकृतपणे अझरबैजानचा भाग होता पण १९९४ मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतरच्या अस्थिर परिस्थितीत आर्मेनियाने आपल्या अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणला होता. आर्मेनियाला या भागाशी जोडणारा प्रदेशही आर्मेनियाच्या ताब्यात होता. मागच्या वर्षीपर्यंत ही परिस्थिती होती. मागच्या वर्षी अझरबैजानने युध्द करून हा भाग ताब्यात घेतला. त्यापूर्वी नागोरनो-काराबाखला भेट देऊन मग अझरबैजानमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करणार्या परदेशी नागरीकांना थेट तुरूंगात टाकायचे प्रकार अझरबैजानने केले होते. https://www.france24.com/en/20170720-azerbaijan-jails-russian-israeli-blogger-three-years नागोरनो-काराबाखला भेट दिलेल्या लोकांना अझरबैजानने आपल्या देशात प्रवेश मिळणार नाही असे जाहीर केले होते (पर्सोना-नॉन-ग्राटा). अशा लोकांच्या यादीत अमेरिकन हाऊसची सदस्या तुलसी गॅबार्डच्या नावाचाही समावेश आहे. मी नोमॅडिक इंडिअन हा व्ही-लॉग नेहमी बघतो. दिपांशू सांगवान या भारतीय युवकाचा हा व्ही-लॉग आहे. त्याने धोका पत्करून नागोरनो-काराबाखला भेट दिल्यानंतरही अझरबैजानमध्ये प्रवेश केला. तो तिथे गेला होता हे त्याने खूप खटपटी करून लपवले. हे पुढील व्हिडिओत बघायला मिळेल. आजही त्याचे नाव अझरबैजनाच्या पर्सोना-नॉन-ग्राटा या यादीत आहे. https://mfa.gov.az/files/shares/illegally_visited.pdf तेव्हा असे सरसकटीकरण होत नाही हे सरसकटीकरण करता येईल असे वाटत नाही. :)
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to आभार ! by हेमंतकुमार
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
- Drew Binsky : On October 29, 2021, Binsky visited Saudi Arabia, completing his feat of visiting every United Nations recognized country on Earth.
- Cassandra De Pecol: n 2017, she had officially set Guinness World Records in two categories: "Fastest time to visit all sovereign countries" and "Fastest time to visit all sovereign countries - Female".[1] Both records have since been broken.
In reply to अनींद्य, आभार ! by हेमंतकुमार
In reply to अनींद्य, आभार ! by हेमंतकुमार
पाकिस्तानको जाना मुश्किलही नही बल्की नामुमकीन है‘ !
काहीही. समजा भारताने पाकिस्तान वर हल्ला केला ( जे ईंद्रा गांधींनी केलं होतं.) तर सैन्यामागे आपणही जाऊ शकतो की.पानिपतवेळी नाही का ऊत्तरेत लाखाचं लटांबर गेलं होतं? :) किंवा सैन्यात भरती होऊन पाकिस्तानात जाता येईल, किंवा अतिरेकी बनून बोर्डर क्राॅस करून ही घूसता येईल/ किंवा गुप्तहेर बनून ही जाता येईलच की. किंवा ईसीस मध्ये भरती होऊन सिरीया मग तिथून प्रमोशन घेऊन पाकिस्तान :) किंवा भारतात मोठा धमाका केला तर ऊदार अंतकरनाने पाकिस्तान आपल्याला आपल्या आत सामावून घेईल. :)
त्यामुळे पाकिस्तानात जाणा मूश्किल ही नही भऊत आसान हय. :)In reply to @ कुमार१, by अनिंद्य
In reply to रवी प्रभू by चंद्रसूर्यकुमार
In reply to @ कुमार१, by अनिंद्य
In reply to माझे १०-१२ वर्गमित्र जे सध्या by सुबोध खरे
In reply to इस्राएलला by जेम्स वांड
In reply to ऐतिहासिक वारसा by चंद्रसूर्यकुमार
In reply to अहो तसे नाही चंसुकू दादा by जेम्स वांड
चॉइसेसपैकी एक करायचा असेल तर मी कधीही तक्षशिला, हडप्पा, मोहेंजोदरो, हिंगलाज माता मंदिर, पेशावर (आमच्यालेखी पुरुषपूर) इत्यादी पाहण्याचाच करेन.मलाही ही ठिकाणे बघायला तिथे जायला आवडेलच. पण तिथे जाऊन आपण जो खर्च करू तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याविरोधातच वापरला जाईल ही शक्यता बरीच जास्त त्यामुळे तिथे जायला आवडले तरी जावेसे वाटायचे नाही. तसा त्रास इस्राएलला* जाऊन आपल्याला होणार नाही त्यामुळे तिथे जायला मला तरी काही वाटणार नाही. *: इस्राएलने पॅलेस्टिनींना ठोक ठोक ठोकले म्हणून उजव्या गटातील अनेकांना इस्राएलविषयी ममत्व असते. सध्या आपले आणि त्यांचे हितसंबंध एकमेकांविरोधात नाहीत आणि त्यांनी आपल्याला (कारगील युध्द वगैरे वेळेस) मदतही केली आहे. ठीक आहे. पण इस्राएल हे आपले 'नॅचरल' मित्रराष्ट्र वगैरे आहे का याविषयी साशंक आहे. किंबहुना ज्यू लोक असे कोणाचेही मित्र होऊ शकतात का याविषयीही साशंक आहे. त्यांच्या देवाने अॅब्रॅहॅमला पॅलेस्टाईनमधील जमिन दिली म्हणून त्यांनी त्या जमिनीवर हक्क सांगितला. समजा त्यांच्या देवाने हिंदी महासागर ते हिमालय यामधील जमिन तुमची म्हणून अॅब्रॅहॅमला दिली असती तर त्या परिस्थितीत ज्यू लोक भारतात घुसले नसते आणि आपल्यालाच आपल्या घरातून हाकलून लावले नसते असे म्हणता येईल असे वाटत नाही. ते लोक सुध्दा तितकेच कट्टर असतात. फक्त आपले आणि त्यांचे वाकडे व्हायचा कधी प्रसंग आला नाही म्हणून ते आपले शत्रू नाहीत इतकेच. पण ते आपले 'नॅचरल' मित्र वगैरे नसावेत. असो.
In reply to मलाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to मलाही by चंद्रसूर्यकुमार
लेख आवडला.