आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620
मागवतो चकणा जरा
नेक्स्ट पेग आधी
घाल पाणी, घाल सोडा
"कच्ची" पोटास बाधी ||
चालते व्हिस्की किंवा
रम माँन्कच्या वतीने
टाळतो आता बीयर
ढेरी सुटायच्या भीतीने ||
संपवला चकणा पुन्हा
न पिणार्या हातांनी
अन पिणारे केव्हाच गेले
उंच आकाशी विमानी ||
रंगते रात्र पुन्हा अन
पडे गफ्फांचा सडा,
किचन बंद होण्याआधी
मागवु चकणा जरा ||
- टल्ली
* वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे. जास्त चकणा खाल्ल्याने फक्त आठव्या पेग नंतर आपला "वकार युनुस" होतो अन नंतर अतिषय हुच्च दर्जाची बिर्याणी खाण्याच्या आनंदास आपण मुकतो.
वाचने
5491
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो ही कविता तर पूर्ण कळणारी आहे, सबब....
हे हे =)
In reply to अहो ही कविता तर पूर्ण कळणारी आहे, सबब.... by चित्रगुप्त
भारी आहे
_/\_माऊली
रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा ||हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!चिअर्स
विडंबन जमले आहे.
" जाम", भारी.....
मुक्त मनाने विहार करू
In reply to " जाम", भारी..... by कर्नलतपस्वी
अरे वा भारी...