साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
==========================================================
स्ट्रॉबेरी डायक्युरी
या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "स्ट्रॉबेरी डायक्युरी" (Strawberry Diaquiri). पिडाकाकांनी केलेला कट्टा आणि तिथल्या स्ट्रॉबेरीज बघून मला आमच्या ४ एप्रिलला केलेल्या या कॉकटेलची पाककृती टाकण्याचा मोह आवरला नाही.
साहित्य:
- २ औंस व्हाईट रम
- ४-५ स्ट्रॉबेरीज
- १/२ औंस लिंबाचा रस
- १ चमचा साखर
- १/२ स्ट्रॉबेरी (सजावटी साठी)
- बर्फ
कृती:
मिक्सर मध्ये मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात स्ट्रॉबेरिज, साखर, लिंबाचा रस आणि रम टाका. मिक्सर चालू करून सगळ्या स्ट्रॉबेरीज द्रावणात एकजीव होई पर्यंत ग्राईंड करा. तयार झालेले द्रावण २-३ बर्फाचे खडे असलेल्या ग्लासमध्ये ओता. एक स्ट्रॉबेरी कापून कडेला सजावटी साठी लावा. (मी एक छोटी छत्री पण सजावटी करता वापरली होती. भारतात मिळते का हे ठावूक नाही.)
तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).
आणि हे कॉकटेल पिणारी मिपाकर मंडळी (डावीकडून एक, बेसनलाडू आणि बबलू)
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
वाचने
12648
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
छान
च्यायला तू पण
-----
In reply to ----- by विसोबा खेचर
+१
मिसिंग इन ऍक्शन
In reply to मिसिंग इन ऍक्शन by विकास
हेच म्हणतो
डायक्युरी मस्तच!!
In reply to डायक्युरी मस्तच!! by पिवळा डांबिस
>>अर्थात
अरे मस्त....
बाकी....
मार डाला,
मस्तच मिश्रसुरापान मालिका चालु आहे.
जय हो ! जय
मस्त आहे
मस्तच...
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फोटो बघीतले तर आता बनवावेच लागणार
In reply to फोटो बघीतले तर आता बनवावेच लागणार by वाहीदा
वाहीदा..
In reply to वाहीदा.. by नाटक्या
धन्यू ! धन्यू !!
खरोखर
नाटक्या तुम्ही दिसत कसे नाहीत ??
In reply to नाटक्या तुम्ही दिसत कसे नाहीत ?? by वाहीदा
मी कुठे दिसत नाही?
झकास
नीलकांता. तू कुठे आहेस?