मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनोळखी काळ

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नि:शब्द होते मी तेंव्हा, कवयत्रीही नव्हतें, प्रतिसादाला तुझे उत्तरही नव्हतें ! भावनांचे थवे मनी दाटले होते, प्रेमाचे काव्य तेंव्हा पटलेच नव्हतें ! अनोळखी धुक्यातून वाट शोधत होते, काळाच्या लहरींवर आशेची साथ देत होते ! प्रेम मिळत होते तुझे पण माझेच म्हणून खासही नव्हतें, चार चौघांचे प्रेम पाहून माझे मन जळत होते ! पण धुके आता सरले आहे आशेने साथ निभावली आहे भावनांनी दाटलेल्या थव्यांनी भरारी घेतली आहे शब्द सारे कविता गुंफत आहेत प्रेम काव्य मिच आता रचत आहे कवितेला माझ्या तुझा प्रतिसाद मिळत आहे मी तुझ्यासाठी आता खासच आहे माझे प्रेम चारचौघांपेक्षा हटकेच आहे अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे !

वाचने 2761 वाचनखूण प्रतिक्रिया 9

क्रान्ति Tue, 04/21/2009 - 19:15
अनोळखी काळाच्या गैरसमजुतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे! खूप खूप खास! कविता आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

मदनबाण Tue, 04/21/2009 - 19:29
भावनांचे थवे मनी दाटले होते, प्रेमाचे काव्य तेंव्हा पटलेच नव्हतें ! छान कविता... :) (हे जागुराव झोपत केव्हा असतील ? :? ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

सूहास Tue, 04/21/2009 - 19:32
सुहास सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.

काजुकतली Wed, 04/22/2009 - 12:59
जागु तु अगदी एकापेक्षा एक सरस कविता लिहितेस.. अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे ! खुप छान.. साधना

काजुकतली Wed, 04/22/2009 - 13:01
(हे जागुराव झोपत केव्हा असतील ? ) अहो बाण, हे राव नाहीत बाई आहेत...

जागु Wed, 04/22/2009 - 13:43
काजुकतली, अग काल झोपण्याच्या आधीच मी त्यांना जागूताई आहे आणि मी किती जागी असते ते सांगितलं आणि ते माझ्या आधीच झोपायला गेले.