श्रद्धा
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जिकडे तिकडे अंधश्रद्धेचे थैमान,
कुणा अशुभ कुणा शुभाचे वरदान !
जळी स्थळी भिन्न त्याचे माप,
श्रद्धेवर अश्रद्धेने केलेला घात,
दुबळ्या मनावर घडलेला अपघात !
मांजर आडवे जाता कर्म बिघाड,
वाट पाहतात पिल्ले तिची रस्त्या पार !
घुबडाचे तोंड का असे अपशकून ?
पाहून नये का जग तिने जन्म घेऊन ?
टिटवीचे ओरडणे मारते कुणा,
तिलाही होतच असतील मरण यातना !
पापणीची फडफड धरी स्वतःवरच रोष,
देहाच्या त्रीदोषांपैकीच हा एक दोष !
आहे ना थोडी श्रद्धा विधात्यानेच सृष्टी निर्मिल्याची ?
जे घडते ते त्याच्याच इशार्यांनी
सारेच असे शुभ नसे कुणी अपशकूनी
श्रद्धेला नेऊन ठेवा उच्च स्थानी .
वाचने
2697
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
खरंय.
व्वा !!!!!!!
क्या बात है!
धन्यवाद.
जागु.....
छान कविता...