श्री गणेश लेखमाला २०२३

1

Loreak...एक स्पॅनिश चित्रपट.

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
30 Aug 2021 - 10:14 am

Loreak - flowers.
Directors: Jon Garaño, José María Goenaga

दोन स्त्रिया, ऍन आणि lourdes (मनी हाईस्टची राकेल). एकमेकांना न ओळखणा-या. दोघीही चाळीशीच्या आसपास. फुलांच्या एका निनावी बुकेमुळं त्यांच्या मनोविश्वात काय काय स्थित्यंतरं होतात हे तरलपणे दाखवणारा हा स्पॅनिश/ बास्क चित्रपट. दोघींच्या कथा इथं simultaneously उलगडत जातात.
पहिलं कपल ऍन आणि तिचा नवरा. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात येणारं साचलेपण, संवादाचा अभाव इथंही आहे. तिची मेनॉपॉज जवळ आलीय. त्यामुळे काही ना काही शारिरीक तक्रारी आहेतच. एक दिवस तिची डॉक्टर तिला सांगते, एक छोटी सर्जरी करावी लागेल.ऍन घरी येते. थोड्या वेळाने नवरा आल्यावर सर्जरी बद्दल सांगते. दोघांमध्ये मोजकं संभाषण होतं. ती झोपायला जाते नवरा मॅच बघत रहातो. नेहमीचाच दिनक्रम. दुसऱ्या दिवशी ती ऑफीसमधून घरी पोचल्यावर तिच्या पत्त्यावर एक फुलांचा गुच्छ येतो. त्यावर नाव वगैरे काहीही लिहिलेलं नसतं. ऍनचा चेहरा खुलतो. नवरा आल्या आल्या ती उत्साहाने त्याला म्हणते. "तू पाठवलास ना बुके?? Thank you."
"बुके?? मी का बरं पाठवेन??" तिचा चेहरा किंचित बदलतो. पण तिलाही पटतं की वाढदिवस वगैरे कसंलही कारण नसताना मधेच कोण बरं पाठवेल असं काही? चुकून कुणी पाठवला असावा या निष्कर्षापर्यंत ते येतात. दोघांचं रुटीन चालू रहातं.
बरोबर एका आठवड्याने गुरुवारी संध्याकाळी परत एक बुके येतो. आता मात्र ती गोंधळते. नवरा आल्यावर सहाजिकच संशयाचं वातावरण तयार होतं. थोडी वादावादी होते पण तिला खरंच काही माहीत नसतं. दोघं जवळपासच्या सगळ्या florist कडे जातात चौकशी करतात पण कुणीच तो बुके ओळखत नाही. एक मात्र होतं, रोजचं रुटीन निरसपणे ओढून नेणारी ॲन आरशासमोर थोssडा अधिक वेळ घालवायला लागते. तिच्या डोळ्यांमध्ये एक हलsकी चमक येते. बसमध्ये स्टोअरमध्ये तिच्या नेहमीच्या ठिकाणी, आजूबाजूला नव्या उत्सुकतेने पाहू लागते. ( क्षणभर श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश आठवतो.)
कोण असेल तो????
इकडे Lourdes आपला नवरा आणि सासूबरोबर रहात असते. इथल्या मालिकांमध्ये शोभेल अशी सासू सुनेची रोज भांडणं होत असतात. नवरा तरी यात कुणाची बाजू घेणार. त्याची घुसमट वेगळीच. त्यामुळे पती पत्नीचं नातं प्रचंड ताणलेलं असतं. Lourdeusच्या ऑफीसमधल्या सहका-याने तिला लग्नाचं विचारलेलं असतं. पण नव-याला सोडण्याचा तिचा पक्का निर्णय होत नसतो. अशावेळी अचानक एका रस्त्यावरच्या अपघातात नवरा मरतो. अपराधीपणा, सुटका, दु:ख अशा संमिश्र भावना आता तिच्या मनात आहेत. अर्थातच ती आता सासूपासून वेगळी तिच्या सहका-याबरोबर रहातेय. पण मनातला अपराधीपणा काही जात नाही. म्हणून funeral नंतर काही दिवसांनी जिथे accident होतो त्या जागी भेट द्यायला ती जाते. आश्चर्य म्हणजे तिथे कुणीतरी फुलांचा ताजा बुके ठेवलेला असतो. तिचं एक मन म्हणतं सहज कुणी ठेवला असेल. पण तिचा संशय काही जात नाही. काही दिवसांनी ती पुन्हा येते तर पुन्हा एक ताजा गुच्छ. मग मात्र ती alert होते. सासूला विचारते तर नकारार्थी उत्तर येतं. असा बुके ठेवणारा मित्र तर नाही. नक्कीच कुणी खास स्त्री. आता मात्र अपराधीपणा जाऊन राग, मत्सर, माझ्यात काय कमी अशा अनेक भावना तिच्या मनात येतात.
कोण असेल ती????

पुढे काय होतं? दोघींना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतात का? त्यांचा एकमेकांशी काय संबंध? दोघीही आपल्या मनातल्या, नात्यातल्या वादळांवर मात करतात का?
अतिशय वेगळा विषय समजुतदारपणे मांडणारा Loreak.
पूर्वी नेटफ्लिक्स वर होता. हे लिहिताना पुन्हा बघायचं ठरवलं तर नाही सापडला.
नक्की पहावा असा.

चित्रपटप्रकटनआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

30 Aug 2021 - 6:28 pm | गॉडजिला

कथानक आहे...

सनईचौघडा's picture

31 Aug 2021 - 6:12 pm | सनईचौघडा

अगदी असाच एक बंगाली चित्रपट मी परवा पाहिला अर्थात हिंदीत त्या मधे पण बायकोला अचानक एक दिवस भेटवस्तु येते. कुरियरवलाअ म्हणतो आम्हाला माहित नाही कोण आणतं ते आणि ते दिवसें दिवस वाढत जातं. तो आणि ती दोघेही आधीच संसारातुन मन उडालेले, फक्त एक मुलगी त्यामुळे गाडा रेटत असतात.
अशात मुलीच्या आग्रहाखातर थोडाबदल म्हणुन गावी जातात आणि तिथे ही भेटवस्तु येते पण …..

शेवट तुम्ही स्वतः च बघा.

सुसदा's picture

1 Sep 2021 - 2:22 am | सुसदा

सनईचौघडा कृपया त्या चित्रपटाचे नांव सांगाल का?

तर्कवादी's picture

2 Sep 2021 - 11:31 pm | तर्कवादी

शेवट तुम्ही स्वतः च बघा.

पण चित्रपटाचे नाव तर सांगाल ? हिंदीत उपलब्ध आहे का ? कुठे मिळेल ?

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:03 am | प्राची अश्विनी

नाव???

तर्कवादी's picture

2 Sep 2021 - 11:32 pm | तर्कवादी

हा चित्रपट हिंदीत उपलब्ध आहे का ?

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:02 am | प्राची अश्विनी

Netflix वर हिंदी सबटायटल्स असावेत.

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2021 - 5:54 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक ओळख !
उत्सुकता ताणली गेलीय !

कपिलमुनी's picture

4 Sep 2021 - 11:01 am | कपिलमुनी

असे वेगळे धागे मिपावर आले पाहिजेत.

त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:02 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सगळ्यांना.