कंदहार....
आत्ताच्या अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहून राहून राहून आठवतोय 2001 साली प्रदर्शित झालेला मोहसीन मखबलाफचा कंदहार हा चित्रपट. हा खरंतर 9/11च्या आधीचा आहे. तालिबान तेव्हाही तिथं होतंच.
नफस आपल्या कुटुंबासोबत लहानपणीच अफगाणिस्तान मधून कनडामध्ये पळून आलेली आहे. त्या सगळ्या पळापळीत तिची एक बहीण अफगाणिस्तानमध्येच राहिलीय. नफस सुरक्षित आयुष्य जगतेय खरी पण बहीणीच्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाविषयी तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. कधीतरी येणारं एखादं पत्र एवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क.
एक दिवस नफसला बहिणीचं पत्र येतं की ती येत्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्महत्या करतेय. पत्र पोचायला खूप दिवस गेलेत. आणि सूर्यग्रहणाला फक्त तीन दिवस उरलेत. आणि मग सुरू होतो नफसचा बहिणीपर्यंत पोचण्याचा frantic, determined प्रवास..
नफसला अफगाणिस्तानात वैध मार्गाने प्रवेश मिळणं अशक्य. पुढे कंदहारपर्यंत एकट्या स्त्रीनं प्रवास करणं अजून कठीण. पण नफस हार मानणारी नाही.
सुरवातीच्या एका प्रसंगात एक मोडकी शाळा दिसते. ती बंद करायचा हुकूम आलेला आहे. एक साधा म्हातारा शिक्षक त्याच्याकडे शिकणा-या लहान मुलींना शाळेच्या शेवटच्या दिवशी सांगतो ,"तुमच्या बाजूला या भिंती आहेत खरंय, पण लक्षात ठेवा त्याच्याही वरती मोकळं आकाश आहे. आणि हे कधीही विसरू नका." मनात हा प्रसंग कोरला जातो.
नफसला वाटेत अनेक जण भेटतात. मदरशातून काढून टाकलेला परिस्थितीने बेरकेपण आलेला लहान मुलगा, आपली आफ्रिकन ओळख लपवून, वैद्यकीय शिक्षण नसतानाही तिथे दवाखाना चालवणारा डॉक्टर, रेडक्रॉस ची माणसं. जागोजागी landmines आहेत. त्यावर पाय पडून असंख्य जणांनी आपला जीव किंवा अवयव घालवलाय. असाच पाय गमवलेल्या आपल्या आईसाठी, खोटंनाटं बोलून रेडक्रॉस कडून artificial पाय मिळवणारा चोर...
कुणी तिला फसवतं कुणी मदत करतं. प्रवासभर एका छोट्या वॉकमनवर ती आपले अनुभव, विचार रेकॉर्ड करत रहाते.तिच्या प्रवासाच्या backdropवर तिथलं समाजजीवन दिसत रहातं. पार्श्वसंगीतावर भारतीय लोकसंगीताची छाप आहे.
ती कंदहारला वेळेत पोचते का? तिच्या पुढे आता नवीन काय संकटं आहेत?? प्रत्यक्ष पहाणंच चांगलं.
आवर्जून पहाण्यासारखा चित्रपट.
(मी हा चित्रपट world movies वर पाहिला होता. त्याला आता अनेक वर्ष झाली. त्यामुळे तपशीलात काही चुका असू शकतील. त्याबद्दल माफी. पण चित्रपट एकदा पाहिल्यावर विसरणं अशक्य.)
वाचने
9997
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप सुंदर ओळख. ही प्रस्तावना
धन्यवाद. नाटक नाही पाहिल पण
In reply to खुप सुंदर ओळख. ही प्रस्तावना by चौथा कोनाडा
सुरेख ओळख
धन्यवाद.
In reply to सुरेख ओळख by गॉडजिला
छान ओळख
धन्यवाद.
In reply to छान ओळख by तुषार काळभोर
VPN ?
In reply to छान ओळख by तुषार काळभोर
चित्रपटाची ओळख करुन दिल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapellaधन्यवाद
याचीच भ्रष्ट नक्कल म्हणजे
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
पण एकंदरीत बर्यापैकी जमून
In reply to याचीच भ्रष्ट नक्कल म्हणजे by गॉडजिला
उत्तम परिचय. आणि तुम्ही
शोधावा लागेल.
उत्तम परिचय.
उत्तम चित्रपट ओळख.
प्रवासभर एका छोट्या वॉकमनवर
प्रवासभर एका छोट्या वॉकमनवर ती आपले अनुभव, विचार रेकॉर्ड करत रहाते.तिच्या प्रवासाच्या backdropवर तिथलं समाजजीवन दिसत रहातं.असे स्वतः शोधायचे सिनेमा मला आवडतात. मस्त ओळख!सर्वांना धन्यवाद!:)
आज कंदहार [२००१ ] पाहिला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ganpati Bappa Lavkar Ya | New Ganpati Song 2021| Pranjal Mandlikकुठे बघितला?
In reply to आज कंदहार [२००१ ] पाहिला. by मदनबाण
चित्रपट कुठे बघितला हे सांगता
In reply to कुठे बघितला? by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Musicधन्यवाद. मलाही पुन्हा पहाता
In reply to चित्रपट कुठे बघितला हे सांगता by मदनबाण