दुसरे घर (सेकंड होम) घेताय ? तेही कर्ज काढून ? एकदा हे वाचाच !
प्रतिक्रिया
कर्ज काढून फ्लॅट घेऊन तो भाड्याने देऊन काही वर्षांनी तो ३ पट किमतीस विकून मालामाल होण्याचे अनेक किस्से मी कैक वर्षे ऐकत आलेलो होतो.ही पध्दत किमान पुण्यात २०१३ नंतर बाद झाली आहे. हे शक्य नाही. फ्लॅट पहावा घेउन हे प्रकरण मी स्वतः अनुभवले आहे. मी देखील तिन जाणकार लोकांचा सल्ला न जुमानता ते माझा चांगला व्यवहार उधळुन लावायचा प्रयत्न करत आहेत असा विचार केला होता. पण आज मागे वळुन बघितल्यास याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त मीच आहे अन्य कोणी दुरुनही नाही हे मी निक्षुन सांगु शकतो. माझे सर्वस्वी सुदैव इतकेच की वेळीच माझी विनाकर्ज असलेली गुंतवणुक मला एकुण गुंतवणूकीतील सर्व खर्च व व्यवहार खर्च पकडुन १ वर्षात रुपये २०,००० नेट फायदा घेउन मोकळी करता तर आलीच त्यात त्याच्या १/३ रक्कम अजुन टाकुन मी ताकही फुंकुन प्यायचे धोरण अनुसरुन योग्य ठीकाणी ती पुन्हा गुंतवली. ही गुंतवणूक अजुन डबल झाली नाहीये कारण तो काळ आता नाही पण ७+ वर्षांचा कालावधी बघता आजही मी चांगल्या प्रॉफिटमधेच आहे. आणी उशीरा पण पध्दतशीर सर्व गोष्टी नेटाने केल्या म्हणून अनुभवसंपन्न बनुन हे जमले. मी कोणालाच कर्ज काढुन घर घ्यायचा सल्ला देत नाही आणी स्वतः त्या फंदात पडत नाही. प्रसंगी तडजोड करुन २ ऐवजी १ बीएचके घ्या पण ७०%+ रक्क्म खिशातुन घालु शकत असाल तरच घ्या हाच सल्ला देतो. जागा घेताना ती किमान ८-१० लोकांना दाखवायला अजिबात कचरु नये, सरप्राइज हा विषय पुर्णपणे टाळावा :) माझा हा व्यवहार पार पाडताना प्रंसगी सेटींग करुन गोष्टी सुरळीत कशा करायच्या याचे ज्ञानच मला लाभलेली सर्वोच्च उपलब्ध्दता मी मानतो. आजही अनेक परिचीत कागदपत्रांची एक कॉपी वकीलाला व एक कॉपी मला बघायला देतात :) मी स्वतः नीयमीतीकरणाचा कायदेशीर दाखला असुनही त्याची पावती जोडली नसल्याने दोघांना फ्लॅट घेण्यापासुन परावृत्त केल्याबद्दल ते माझे आभार मानतात. ( जुन्या घरांबाबत हे सेटींग सहज करता येते त्यात अवघड काहीही नाही). शक्यतो नावाजलेला बिल्डर, कंप्लिशन सर्टीफिकेट, सर्च रिपोर्ट अथवा सरळ एस्बीआय सारख्या बँकेकडून २० ते ३० टक्के कर्ज मंजुर करुन घेणे ही बाब सर्वात उपयोगी म्हणता येइल. टोकन देताना लेखी ड्राफ्ट करुन द्यावे त्यात साधारण पुढील व्यवहार जर झाला नाही तर १०% रक्क्म कापुन उर्वरीत परत करायची हमी घ्यावी. काही हजारांची बाब असेल तर आपले मन व्यवहाराबाबत द्विधा झाले असल्यास शांतपणे रकमेवर पाणी सोडुन व्यवहार रद्द करुन मोकळे होणे जास्त हितकारक. आपली मानसिकता उत्तरोत्तर जास्त समतोल व मन खंबीर होत जाओ याच आपल्याला माझ्याकडुन मन:पुर्वक शुभेछ्चा.
In reply to अवघड आहे. by तुर्रमखान
दुसरं घर घ्यायचं असेल तर मोठ्या सोसायटीत दोन-तीन बिएचके शिवाय घेऊ नये.अगदी बरोबर. माझ्या पाहण्यातील एकदोन जणांनी या पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे (हिंजवडी आयटी पार्क जवळ) आयटीवाले लोक कॉम्पेक्स, त्यातल्या सोयी पाहून चांगलं भाडं देतात (आणि हे चढतं असतं, ते ही द्यायला तयार होतात) पण १ बीएचकेचा मात्र बाजार उठलेला आहे !
In reply to अवघड आहे. by तुर्रमखान
दुसरं घर भाड्याने देउन दरमहानक्की हेच आकडे लिहायचे होते का? माझ्यामते फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने दिल्यास गुंतवणूकीच्या केवळ पाव टक्के रक्कम इतकीच दरमहा भाडे म्हणून मिळू शकते. जसे की लेखातला फ्लॅट चाळीस लाखात घेतला गेला आहे तर त्याला जास्तीत जास्त दरमहा भाडे हे रुपये दहा हजार मिळू शकेल (धागालेखक तर सहा हजारच लिहित आहेत).७-८%
पेक्षा जास्त उत्पन्न कमावणे हे पुण्या-मुंबईत प्रचंड अवघड आहे.
In reply to दुसरं घर भाड्याने देउन दरमहा by चेतन सुभाष गुगळे
In reply to दुसरे घर घेऊन फायदा कमवायचे by अमर विश्वास
In reply to अमर जी जर आयकर सूटही घेता by चौकस२१२
In reply to काही महत्वाचे मुद्दे : जर by अमर विश्वास
In reply to @अमर विश्वास by उन्मेष दिक्षीत
In reply to नुकसान by चौकस२१२
हे असे होते जगभरात हे खरे आहे आणि म्हणणे अगदी १००% चुकीचे नसले तरी त्यावर उपाय काय? लोकशाही मध्ये खूप निर्बंध लादणे एवढे सोप्पे नाहीयेनिर्बंध लादायची फारशी आवश्यकता नाही. सरकारने फक्त काही गोष्टी कराव्यात १) उद्योगांचे केंद्रिकरण टाळावे जेणेकरुन काही मोजक्या शहरांची लोकसंख्या अनैसर्गिकपणे अतिरेकी वाढणार नाही २) सर्वच शहरे, गावे ई ठिकाणी योग्य त्या पायाभूत सुविधा - चांगले रस्ते , पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ई असावे. कायदा सुव्यवस्था असावी. यामुळे लोकांचा "अमूक एका" भागातच राहण्याकडचा कल कमी होईल. ३) कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत किंवा खास परवानगी घेतलेल्या संस्थात कंपन्या व्यावसायिक तत्वावर घरे खरेदी करुन भाड्याने देवू शकतात काय ? मला याबाबतचे कायदे माहित नाही पण अशा प्रकारचे व्यावसायिक कंपन्यानी भाड्याने दिलेले घर माझ्या बघण्यात / ऐकण्यात नाही. त्यामुळे ही सुविधा निर्माण होण्याकरिता कायद्यात आवश्यक ते बदल करावेत. ४) सरकारी शाळा वा आरोग्यसुविधा यांचा दर्जा व उपलब्धता सुधारावी. बाकी नियमन आणायचेच असेल तर पर्याय १) पती वा पत्नी यांच्यापेकी कुणाच्याही नावावर एक घर असेल तर दुसर्या घराकरिता स्टॅम्प ड्युटीचे दर हे बरेच जास्त असावेत
In reply to @अमर विश्वास by उन्मेष दिक्षीत
In reply to @अमर विश्वास by उन्मेष दिक्षीत
In reply to @ उन्मेष दीक्षित साहेब ... by अमर विश्वास
In reply to @चौकस by उन्मेष दिक्षीत
In reply to @सुबोध खरे by उन्मेष दिक्षीत
In reply to उन्मेष दिक्षीत आपलं मूळ by चौकस२१२
In reply to अमेरिकेतही आहे by फारएन्ड
In reply to गुंतवणुकीच्या घराना प्रोहत्साहास दिल्याने by चौकस२१२
In reply to बंगल्यांची सोसायटी by फारएन्ड
In reply to भाडे तत्वावर स्थापन झालेल्या by शाम भागवत
In reply to @ उन्मेष दीक्षित साहेब ... by अमर विश्वास
समजा जर तुमच्या थेअरी प्रमाणे जर कोणीच दुसरे घर घेतले नाही .... याचा अर्थ कोणालाही भाड्याने घर मिळणार नाही .. आता एखादा कोल्हापूरला (कुठल्याही शहरात) कामानिमित्त आला ... त्याला लगेच स्वतः चे घर घेणे शक्य नाही ... आणि कोणाकडे भाड्याने द्यायला घर नाही ... (कारण घराच्या किमती वाढू नयेत म्हणून कोणी दुसरे घर घेतले नाही आणि स्वतःचे रहाते घर कोणी भाड्याने देत नाही) मग अशा वेळी काय करायचे ? स्थलांतर बंद करायचे?असे होणार नाही. थोडा त्रास पडेल पण घर मिळेल. जर मी पुण्याहून कोल्हापूरला थोडा काळ स्थलांतरित होत असेल तर मला अशाच कोणत्यातरी स्थलांतरामुळे वापरात नसलेले घर भाड्याने मिळू शकेल किंवा जर माझे स्थलांतर दीर्घकाळाकरिता असेल तर तेथील घरांच्या किमती आवाक्यात असल्याने (कारण अनेक लोकांनी सेकंड होम घेवून त्या वाढविल्या नाहीत) मला तिथे नवीन घर घेणेही परवडू शकेल.
In reply to @अमर विश्वास by उन्मेष दिक्षीत
दुसरे घर इन्वेस्ट्मेंट म्हणुन घेतल्यास कारण नसताना घरांच्या किंमती वाढत राहतात. त्यामुळं ज्यांना फक्त राहण्यासाठी घर घ्यायचे आहे त्यांना जास्त प्राइस मोजावी लागते. सॅच्युरेशन येत जाऊन तुम्ही म्हणता तसं कारण नसताना आपण राहत नाही तिथल्या प्राइस वाढवल्या जातात, आणि जे तिथं प्रत्यक्ष राहण्यासाठी घर शोधतायत त्यांना अॅफोर्डेबल घर चांगल्या भागात मिळत नाही कारण तिथे न राहाणार्यांनी इन्वेस्ट्मेंट म्हणून एक्स्ट्रा घर घेउन प्राइजेस वाढवलेल्या असतात.आपल्या मताशी मी सहमत आहे.
In reply to सेकंड होम by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सेकंड होम by राजेंद्र मेहेंदळे
In reply to प्रतिसाद आवडला by तर्कवादी
बिल्डर अधिकाधिक श्रीमंत होत जातात.प्रखर सत्य.
In reply to प्रतिसाद आवडला by तर्कवादी
In reply to कर्जाच्या व्याजदरापेक्षा by चौकस२१२
आपण कोणता परतावा म्हणताय ?हे मी नमूद केले आहेच.. या केसमध्ये फ्लॅटच्या किमती दरवर्षी जर १०-११ टक्क्यांनी वाढत असतील आणि कर्जाचे व्याजदर ८-९ टक्के असेल तर आपली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. भाडे फारसे नसतेच.. म्हणून घराची वाढती किंमत हाच खरा परतावा.
In reply to प्रतिसाद आवडला by तर्कवादी
In reply to म्हणजे काय? by चौकस२१२
गरज नसताना उगाच दुसरे घर घेवू नये म्हणजे काय?निवारा ही एक मुलभूत गरज आहे. जर पुढची ५-१० वर्षेही तेथे रहायचेच नसेल तर घर घेवू नये हे माझे मत आहे.
In reply to प्रतिसाद आवडला by तर्कवादी
In reply to गरज नसताना दुसरे घर घेऊ नये . by अमर विश्वास
In reply to गरज नसताना दुसरे घर घेऊ नये . by अमर विश्वास
कुणाला गरज नसताना?अर्थात स्वतःला गरज नसताना..
रिअल इस्टेट हा एक असेट क्लास आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट का करू नये ?मी माझा विचार सांगितला प्रत्येकाला तो पटेलच असे नाही. कुणाला त्यात साम्यवाद दिसेल कुणाला आणखी काही.. ज्याचा त्याचा दृष्टीकोन .. पण माझे काही मुद्दे आहेत..जे बहुधा विचारात घेता येतील १) एखादे घर बांधले जाते तेव्हा त्याच्या बांधकामाचे काही ठराविक आयुष्य असते (अगदी ५०-१०० वर्षे ही असेल पण तरी मर्यादितच) . घर बांधण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वाळू ,विटा, सिमेंट, पाणी ईत्यादींचा वापर झालेला असतो. म्हणजे एका अर्थाने पर्यावरणाची हानी झालेली असते. पर्यावरणाची हानी होवू नये म्हणून जंगलात रहावे असे मी म्हणत नाही पण निदान अशी हानी होवून , नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन घर बांधले तर ते निदान वर्षानु वर्षे रिकामे तरी राहू नये. २) भाड्याने देण्याचा मार्ग आहेच पण याकरिता नेहमी चांगले भाडेकरु मिळणे, भाडे करार करणे, पोलीस पडताळणी ई ई करिता वेळ देण्याची तयारी असावी लागेल) ३) एखाद्या सोसायटीत बहुतांशी (५०% वा आसपास) भाडेकरु रहात असतील तर सोसायटी चालवण्यासही अडचणी येवू शकतात कारण भाडेकरु कमिटीचे सदस्य होवू शकत नाही तर जे मालक तिथे रहात नाहीत असे लोक कमिटीचे सदस्य होण्यात अर्थ नसतो वा बहुधा ते शक्यही नसते (बहूधा ते जवळपास रहात नसल्याने). असे मालक वार्षिक वा विशेष सर्वसाधारण सभेसही हजेरी लावत नाहीत. ४) तरी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावयाची झाल्यास निवासी जमिन विकत घ्यावी असे मी सुचवेन. अर्थात त्याकरिता त्या भागाची नीट माहीती, भविष्यात मिळणारा परताव्याचा योग्य अंदाज, कागदपत्रांची पुर्ण पडताळणी इ गोष्टी गरजेच्या आहेत ५) फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर नवीन (अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये) अगदी सुरवातीस गुंतवणूक करावी जेणेकरुन चांगले डील मिळेल. या काळात बिल्डरला खेळते भांडवल हवे असते म्हणून जास्त घासाघीस होवू शकते. आणि फ्लॅट बनल्यावर वा जवळपास बनत आल्यावर विकून टाकावे. तरी यातल्या जोखमी म्हणजे बिल्डरकडून बांधकामाला होणारी दिरंगाई, फ्लॅट दुसर्याला विकून हस्तांतरित करताना बिल्डरकडून काही अडवणूक वगैरे गोष्टी ध्यानात घ्याव्या. तसेच कर्जाचे पुर्ण वितरण होई पर्यंत ई एम आय चालू होत नाही तर प्री इ एम आय म्हणजे केवळ व्याज चालू होते. याचा बहूधा टॅक्समाफीलाही उपयोग नसावा (नक्की माहित नाही) .. हे टाळायचे असेल तर फक्त स्वतःकडील पैशांनी (सेल्फ मनी) होवू शकणारी गुंतवणूक केली तर जास्त बरे. असो.. हे माझे विचार आहेत.. इतरांच्या विचारांचाही आदर करतो... ...धन्यवाद.
In reply to कुणाला गरज नसताना? by तर्कवादी
In reply to म्हणजे एका अर्थाने by चौकस२१२
अशी गुंतवणूक करणे म्हणजे परिवारणाची हानी जर असेल तर ती बांधकामाच्या आधी करणे काय आणि नंतर काय?बहुधा तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नसावा. "आणि फ्लॅट बनल्यावर वा जवळपास बनत आल्यावर विकून टाकावे" असे मी लिहिले होते.. घर वर्षानुवर्षे बंद राहणे आणि त्याचा कुणासही राहण्यास उपयोग होवू नये ही खरी पर्यावरणाची हानी. ते विकून टाकले आणि बहुधा कुणीतरी तिथे राहील तर ही हानी टाळली जाईल.
पण मुळात हा गुंतवणुकीचा एक मार्ग / क्लास आहे हेच समजून का घेत नाहीमी माझा विचार सांगितला. प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. अशी गुंतवणूक करण्यावर बंदी घालावी असे मी म्हणत नाहीये.. ज्याला आहे खात्री त्याने करावी गुंतवणूक...
. अहो तुम्ही आम्ही प्रत्यक्ष नाही केली तरी आपले जे म्युच्युअल फंड असतात किंवा रिटायरमेंट फंड ते करतात ...फंड बद्दल माहित नाही, पण वैयक्तीकरित्या गुंतवणूकदारांनी अपुर्या माहितीच्या आधारे , पुरेसा अभ्यास नसताना केवळ बिल्डरच्या सांगण्याला भुलून कर्ज काढून मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. त्यापेक्षा अशी जर कंपनी असेल की जी काही एखाद्या शहराचा व्यवस्थित अभ्यास करुन काही फ्लॅट विकत घेते, त्यांची देखभाल करते, काही वर्षे भाड्याने देते व योग्य वेळी विकते तर मला अशा कंपनीचे शेअर्स वा एफ डी रुपाने पैसे गुंतवण्याचा विचार मी करु शकतो. अशी कंपनी जोखमीचा , परताव्याचा नीट अभ्यास करु शकते, बिल्डरशी योग्य प्रकारे घासघीस करुन चांगला सौदा करु शकते. व्यक्तिशः मला हे सर्व करणे जमेलच असे नाही. शिवाय ही कंपनी एखाद्या भागात वा शहरात किती घरे घ्यायचीत , कधी थांबायचं कधी घर विकायची याबद्दलचे निर्णय अधिक योग्यप्रकारे घेईल त्यामुळे घरांच्या किमतीही आवाक्यात राहू शकतील.
In reply to गरज नसताना दुसरे घर घेऊ नये . by अमर विश्वास
In reply to यात काही मुद्दे राहून गेलेले by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब .. by अमर विश्वास
५) समभाग किंवा म्युच्युअल फंडाचे "अधिवक्ते" सध्या बाजार उच्चीत आहे म्हणून त्याचे गोडवे गात आहेत. परंतु ज्यांना मार्च २०२० मध्ये पैशाची गरज पडली त्यांना आपले समभाग किंवा म्युच्युअल फंड हे केवळ व्याज बुडाले असे नव्हे तर भांडवली नुकसानीत विकायला लागलेले आहेत.इथे सुबोध खरे यांनी "सदा सर्व काळ समभाग गुंतवणूक हि आतबट्टयाची असते" असे कुठेच विधान केलेले नाही. फक्त उच्चरव "अधिवक्ते" आणि "मार्च २०२० " ची स्थिती नमुद केलेली आहे.
सर्व पंटर आज गेल्या ३-४-५ वर्षात किती परतावा मिळाला म्हणत आहेत, त्यांना त्याच समभाग किंवा म्युच्युअल फंडा चा परतावा मार्च २०२० मध्ये किती टक्के होता हे विचारून पहा.याचे उत्तर मिळाले तर नक्कीच शंका निरसन होईल. बाकी मला तरी सुबोध खरे यांचा प्रतिसाद "गुंतवणुकी" संदर्भात सतर्क रहाण्याविषयी वाटला.
In reply to ५) समभाग किंवा म्युच्युअल by चौथा कोनाडा
In reply to यात काही मुद्दे राहून गेलेले by सुबोध खरे
कधीही घराचे भाडे हे साधारणपुण्याकरिता तरी हे आकडे सपशेल चूक आहेत. माझ्यामते फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने दिल्यास गुंतवणूकीच्या केवळ पाव टक्के रक्कम इतकीच दरमहा भाडे म्हणून मिळू शकते. जसे की लेखातला फ्लॅट चाळीस लाखात घेतला गेला आहे तर त्याला जास्तीत जास्त दरमहा भाडे हे रुपये दहा हजार मिळू शकेल (धागालेखक तर सहा हजारच लिहित आहेत). यात दरवर्षी ५ टक्के वाढ झाली तरी दहा हजारचे पुढील वर्षी दहा पाचशे होतील, पण या दराने चाळीस हजार व्हायला कित्येक वर्षे लागतील. म्हणजे गुंतवणूकीच्या एक टक्का देखील दरमहा भाडे स्वरुपात मिळणार नाहीतच. दोन ते तीन टक्के फारच दूरची गोष्ट. फ्लॅटच्या वाढणार्या किंमती हेच काय ते आकर्षण. तेही चलन बदलानंतर जवळपास संपुष्टात आले आहे. (म्हणजे किंमती वाढतात, नाही असे नाही पण त्या प्रमाणात महागाई देखील वाढतच असते त्यामुळे फ्लॅटच्या किंमती वाढणे हा काही गुंतवणू़कीवरील फायदा म्हणता येणार नाही. २०१६ पेट्रोलची किंमत काय होती? आता ती ज्या प्रमाणात वाढली आहे, त्या प्रमाणात २०१६ साली खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत वाढली असेल काय?) लोकांनी फ्लॅटकडे गुंतवणूक / आर्थिक लाभ म्हणून पाहू नये व फक्त स्वतःची राहण्याची गरज याच दृष्टीने पाहावे. तरच घरांच्या किंमती आवाक्यात राहतील आणि प्रत्येक बेघर स्वतःचे घर विकत घेऊ शकेल. अन्यथा काही लोकांकडे पाच पाच फ्लॅट आहेत आणि उरलेले इतर आयुष्यभर भाड्याच्या घरातच जीवन व्यतीत (आणि व्यथित देखील) करीत आहेत हेच चित्र दिसेल.२-३ %
च्या वर जात नाही.
In reply to सदा सर्व काळ समभाग गुंतवणूक by सुबोध खरे
In reply to बाकी 2/3 गोष्टी. by आनन्दा
भाडे आहे महिना 15000 ते जाणार बायकोच्या नावावरभाडे बायकोच्या नावावर जात असले तरी त्यावर टॅक्स तुम्हालाच भरायचा असतो. 30% टॅक्स असेल तर ते 5000 वजा करा.
In reply to भाडे आहे महिना 15000 ते जाणार by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to असे का बरे होत असावे? by आनन्दा
In reply to असे का बरे होत असावे? by आनन्दा
In reply to लपवणे by चौकस२१२
In reply to म्हणूनच म्हणालो मी, by आनन्दा
In reply to म्हणूनच म्हणालो मी, by आनन्दा
In reply to या लेखनासाठी धन्यवाद by श्रीरंग_जोशी
भारतातले घर अथवा प्लॉट विकून आर्थिक लाभ मिळवल्यास लाभाची रक्कम वजा भारतात त्यावर भरलेला कर, या रकमेवर अमेरिकेतही प्राप्तिकर भरावा लागतो.हे एक प्रकारे डबल टॅक्सेशनच झाले की.
In reply to भारतातले घर अथवा प्लॉट विकून by अभिजीत अवलिया
In reply to भारतातले घर अथवा प्लॉट विकून by अभिजीत अवलिया
In reply to भारतातले घर अथवा प्लॉट विकून by अभिजीत अवलिया
In reply to या लेखनासाठी धन्यवाद by श्रीरंग_जोशी
In reply to स्विस!!! by चौकस२१२
In reply to बहुसंख्य लोकांची कर्जाच्या by सुबोध खरे
In reply to Dsk by तनमयी
In reply to जर फ्लॅट ताब्यात आला नसेल तर by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to 2 bhk hota by तनमयी
In reply to अहो, पण मला म्हणायचंय की by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to जर फ्लॅट ताब्यात आला नसेल तर by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to चांगली चर्चा आहे. by कंजूस
समजा ते घर रेल्वे स्टेशनलगत असेल, चालण्याच्या अंतरात तर भाव आहे. गरजू लोक भाड्याने राहायला येतात.
साधारणपणे अश्या जागा आधीच गेलेल्या असतात ! आणि तिथले दर पण तसे चढेच असतात.
मी बोललो ते सेकंड होम बद्दल जे बजेट मध्ये बसते (हो, प्रॉफिट हवे असेल तर गुंतवणुक कमी आणि परतावा जास्त असा) आणि मध्यवस्तीपासून (साधारणपणे) दुर असते, त्या बद्दल ! In reply to बाकी सगळे ठीक आहे, पण तुमच्या by आनन्दा
In reply to बाकी सगळे ठीक आहे, पण तुमच्या by आनन्दा
मला हा व्हाट्सअप्प विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी लिहिलेला धडा वाटत आहे.तुम्हाला आता कोणितरी डबा खायला बोलवणार. ;)
In reply to बाकी सगळे ठीक आहे, पण तुमच्या by आनन्दा
In reply to हा खरा अनुभव वाटत नाही, by kvponkshe
In reply to कायमचे भाड्याचं घरात राहावे by सुबोध खरे
खरंय.