मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माज

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती स्वैर वारा मंद झाला , परतली लाल माती ================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचने 1796 वाचनखूण प्रतिक्रिया 2

सौन्दर्य 25/06/2021 - 22:51
बैलगाडीच्या छायेत चालणाऱ्या कुत्र्याला वाटते की बैलगाडी आपणच ओढत आहोत, ह्या गोष्टीची आठवण झाली.

पाषाणभेद 25/06/2021 - 23:54
वा! अगदी छान काव्य! धूलीकणांना त्यांची जागा अंतीमतः मिळालीच. >>स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले वारा स्वैर आहे, नंतर तो मंदही झाला आहे. अशा स्थितीत तो स्थितप्रज्ञ कसा?