"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
20 Jun 2021 - 12:22 pm

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_boras...

येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.

सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

सदर पुस्तक आपण विनामूल्य स्वरूपात "वैरी भेदला" विनोदी वगनाट्य येथून किंवा ई साहित्य प्रतिष्ठान- नाटक विभाग येथील नाटक विभागातून डाऊनलोड करून वाचावे.

"वैरी भेदला" या पुस्तकासाठी आपणास कोणतेही मूल्य देण्याची गरज नाही. हे पुस्तक विनामूल्य आहे. आपण ते वाचावे आणि आपल्या ओळखीच्या वाचकांत विनामूल्य वाचनास देण्याचे करावे ही विनंती.

हे ई पुस्तक वाचल्यानंतर आपण तीन मिनिटात तीन गोष्टी करू शकतात.

1. आपणास हे पुस्तक कसे वाटले ते फोन, व्हाटस अ‍ॅप मेसेज किंवा ईमेल करून लेखकाला कळवू शकतात.
2. ई साहित्य प्रतिष्ठानला ईमेल करून हे पुस्तक कसे वाटले ते सांगावे.
3. आपले मित्र तसेच सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्य प्रतिष्ठानबद्दल सांगा.

कळावे.

आपला,
पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे
982Three4O2554

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतवाङ्मयकथाकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजामाध्यमवेधलेखमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼


(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )


अतिशय उचित अर्पणपत्रिका !

पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक !

पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो.
मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल !
यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼


(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )


अतिशय उचित अर्पणपत्रिका !

पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक !

पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो.
मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल !
यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

नावातकायआहे's picture

20 Jun 2021 - 1:19 pm | नावातकायआहे

हार्दिक शुभेच्छा पाभे!

गॉडजिला's picture

20 Jun 2021 - 1:20 pm | गॉडजिला

पुस्तकाचे नाव फार आवडल्या आहे बाकी विचार पुस्तक वाचुन मांडावे म्हणतो...

मदनबाण's picture

20 Jun 2021 - 2:10 pm | मदनबाण

दफोराव तुमचे अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami

पाषाणभेद's picture

20 Jun 2021 - 2:40 pm | पाषाणभेद

@ चौथा कोनाडा,
सेलिब्रेटी संबोधून आपण मला लाजवलेले आहे. अहो, मी सामान्य आहे हो.
दुसरे असे की या नाट्याचे लेखन २०११ सालीच मिपावर टप्या टप्याने केले गेले होते. २०१६ नंतर त्यात लावण्या वगैरे लिहील्या अन मग २०१७ ला पुस्तक रुपाने प्रकाशीत केले गेले.
आता २०२१ मध्ये याची ईकॉपी, ईबुक हे ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केले आहे.

तशा अर्थाने हे ई बुक म्हणजे वगनाट्याची तिसरी आवृत्त्ती आहे.

आपण वर उल्लेखलेली अर्पणपत्रीका तशा अर्थाने पुस्तकातील अर्पण पत्रिका नाही. पुस्तकात आहेच वाद नाही पण त्याचा येथे केवळ उल्लेख केला आहे. तेथे मिपावरील अनेक दिग्गजांचा उल्लेख करून त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे.

आपले तसेच नावातकायआहे, गॉडजिला, मदनबाण तसेच हा धागावाचक, पुस्तकवाचक यांचे आभार.

https://www.misalpav.com/node/17161

https://www.misalpav.com/node/39223

http://www.misalpav.com/node/48940

प्रचेतस's picture

21 Jun 2021 - 8:10 am | प्रचेतस

मनःपूर्वक अभिनंदन पाभे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2021 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

मनपूर्वक अभिनंदन

पैजारबुवा,