जल-आशय!
लेखनविषय:
काव्यरस
जलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
मनात माझ्या काही का ही?, म्हणता आतच बसते आहे.
खोल तळाशी मोठे कासव, वा अथवा मगरीचा जबडा.
भय कारक हे चित्र मनाशी, का येते हा - जुनाच झगडा!
असे जलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती.
केवळ चित्र तसे पाहता,हात लावण्या जवळी येती.
अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो.
आता झाला आरंभ म्हणता ,अवचित पूर्णविरामी होतो.
–-------–------–-----–------------------------
अतृप्त..
वाचने
15249
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
जलाशय संकल्पना मध्यवर्ती धरुन केलेला कल्पनेचा खेळ आवडला.
फोटो दिसत आहेत का?
In reply to फोटो दिसत आहेत का? by अत्रुप्त आत्मा
भारतातून आत्ता तरी चित्रं दिसत नाहीयेत.
(ग्रहण संपलं की पुन्हा प्रयत्न करतो)
ज्यांना फोटो दिसत नाहित त्यांनी त्वरीत आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी
पैजारबुवा,
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
====)))))))))))
दुष्ट दुष्ट
=)))))
गणेशा
In reply to गणेशा by प्रचेतस
आपले 2011 च्या किकली,मेणचवली ट्रिप वेळेसचे जलाशय आणि तो मोठे कासव वाला , तसे फोटो आहेत.
In reply to गणेशा by प्रचेतस
तुम्ही साईनाउट असणार
.
गणेशा झालाय सगळा.
बाकी गणेशा झाला असल्याने कविता गूढ झालीय.
गॅस शेगडी चा नॉब आठवणीने बंद केला आहे.
छान!
हात लावण्या जवळी येती.
>>
हात ' लावण्या'साठी जवळ येतात.
की
'हात लावण्यासाठी' जवळ येतात?
ण वर जोर द्यायचा किंवा कसे.
In reply to अवांतर शंका by तुषार काळभोर
अर्थ लावताना काही चुकल्यास चूक भूल देणे, घेणे, वाटणे, मिरवणे, फाट्यावर मारणे.
आशय समजला.
मला फोटू दिसत नाहीत.
बाकी, कविता समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
जलाशय संकल्पना सुंदर !
सुंदर कविता !
फोटो देखील अप्रतिम !
(जे कोव्हिड पोझिटिव्ह नाहीत त्यांना फोटो दिसतात !)
सर्व वाचक प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.


मस्त कविता गुर्जी! आवडली.
सं - दी - प
In reply to अरे वा! by चांदणे संदीप
मनःपूर्वक धन्यवाद.
आवडला