चहा घेणार?
लेखनविषय:
आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा.
जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार?
तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार?
नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही,
खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार?
फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते,
उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार?
कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे ,
तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार?
चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी,
निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार?
कामामध्ये व्यग्र असू दे हरेक माणूस घरातला,
कान तरी आतुर ऐकण्या एक पुकारा, चहा घेणार?
महत्त्व आता ह्या प्रश्नाचे तुम्हास आहे कळले म्हणता?,
मित्र बनूया, हसून पाहूया, या बसा, चहा घेणार?
-आगाऊ म्हाद्या
जागतिक चहा दिवस २१ मे २१
वाचने
7215
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मी चहा घेणार ? द्या की, का नाही घेणार ?
☕
In reply to मी चहा घेणार? by चौथा कोनाडा

In reply to धन्यवाद by आगाऊ म्हादया......
आम्हा साहेब,
फर्मास तरतरीत कविता!
आता तुम्ही आगाऊ म्हटल्यावर थोडा आगाऊपणा करावा !
- आगाऊ चौको
In reply to आम्हा साहेब,फर्मास तरतरीत by चौथा कोनाडा
धन्यवाद चौको
छानच.
चहा आवडतोच केंव्हाही.
In reply to छानच. चहा आवडतोच केंव्हाही. by सुरिया

पुरूषांनी चहाला नाही म्हणू नये
In reply to नक्कीच ... by मुक्त विहारि

In reply to नक्कीच ... by मुक्त विहारि
ऑ ?
पण वेळेला चहा लागतोच... लागतो.

आणि चहा gifs पण छान !
In reply to मस्त कविता by कॉमी
:-)
कडक ताजी तरतरीत कविता!
In reply to कडक ताजी तरतरीत कविता! by प्राची अश्विनी
आपले प्रतिसाद पाहून परत काहीतरी लिहावसं वाटू लागलंय, शिवाय काहीतरी वाचण्याजोगं लिहितोय असंही वाटू लागलं आहे.
मी चहा घेणार?