स्कीप इन्ट्रो
कोरोनाने काय दिले? लॉकडाउनात सक्तीने घरी बसायची सजा आणि त्या सजेला सुसह्य करण्यासाठी दिले ओटीटीचे सर्व प्रकारच्या मनोरंजनाने खच्चून भरलेले तास. अर्थात ओटीटी करोनाच्या आधीच घरात आलेला जरी असला तरी कोरोनापूर्व आणी कोरोनाच्या काळातील ओटीटीवर खर्च झालेला वेळ ह्याचे गुणोत्तर ह्याच कालावधीतल्या फरसाणच्या खपातही असणार असा एक प्राथमिक अंदाज आहे. ज्या गोष्टी बाहेर उंडगून साजर्या सॉरी...सेलिब्रेट केल्या जायच्या त्या घरच्या घरी कराव्या लागल्या ना. असो.. ते नाही का मराठी म्हण 'नमनाला घडाभर तेल' तसं न करता आता प्रचंड ओळखीचे झालेले स्कीप इन्ट्रो बटन घेऊ आणि मुद्द्याकडे वळू.
.
आता इन्ट्रो स्कीप करायचा तर का आणि काय टाळायचे? कसला इन्ट्रो? कुणाचा इन्ट्रो?...तर हा इन्ट्रो म्हणजे टायटल्स, जरा सॉफिस्टेकेटेड भाषेत क्रेडिट्स, क्रेडेन्शिअल्स किंवा आपल्या पिटातल्या प्रेक्षकांच्या भाषेत पाट्या. सांगली कोल्लापुरातल्या कुठल्या थेटरात...सॉरी टाकीत थोड्याफार वर्षापूर्वी ३ च्या शोला ४ वाजता जरी गेलात आणि बिडी शिलगावणार्या डोअरकीपराला "किती वेळ झाला सुरु होऊन?" असा प्रश्न केला की "पाट्या पडायल्यात" हे कॉमन उत्तर मिळायचे. आपल्याला उशीर झाला तरी पाट्यापासून चित्रपट पाहायचा हा नेम प्रत्येक रसिकाचा. काही गावात लोकल दुकानानी बनवलेल्या त्यांच्या स्टील स्लाईड्स दाखवत पण कॉमन असे ते सुरुवातीची तंदुरुस्ती की रक्षा लाईफबॉय आणि विको टर्मेरिकची दुल्हन बन्नो पाहू झाली की सेन्सॉरबोर्डचे सर्टिफिकेट. सेन्सॉर करणारा कुणी ठक्कर असो की मुखर्जी त्याचे नाव न पाहता आरोळी उठायची ती रीळसंख्येची. १२-१५ पासून वाढणारी ही संख्या शोले, मुगले आझमसाठी प्रेस्टीज इश्शु असायची.
.
सेन्सॉरचे सर्टिफिकेट थरथरत अदृश्य झाले की चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या लोगोने सुरुवात होई. काही मध्यमवर्गीय निर्माते त्यांच्य त्यांच्या कुलदैवतांचे सफोटोस्मरण करी. काहीजण मूर्तीला हार वगैरे वाहून हात जोडी. त्याखालीच ते नाव झळके. मोठ्या निर्मात्यांची गोष्ट और. अगदी लायटिंग वगैरे करुन फिरत्या पृथ्वीवरचे मूर्त्यांचे लोगो किंवा कमळात उभे राहून मागे झुकून पुढे फुले सोडणारी शांतारामाची राजकमल सारखी आयडीया अगदी कंपलसरी. त्यातले व्हेरिएशन म्हणजे आरकेचे व्हायलिन घेतलेले कपल. बरसात चित्रपटाच्या पोस्टरवरुन घेतलेले चित्र आरके फिल्म्सचा लोगोच बनले. विळा हातोडा आणि एम अक्शर असलेला मेहबूब स्टुडिओ, ब्रम्हा विष्णु महेशांचे हात असलेले त्रिमूर्ती फिल्म्स. अशा विविधरंगी लोगोने नटलेली बॉलीवूड इंडस्ट्री आता कार्पोरेट एक्सेल, इरॉस, युटीव्ही सारखे जायंट हाऊसेस ते धर्मा, यशराज, भन्साळी, टीसेरीज, टिप्स, आमीरखान, फॅन्टम सारखे वन मॅन इंडस्ट्री सारखे लोगो मिरवते.
जुन्या जमान्यात मात्र त्यानंतर येई पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. पवित्र आत्मांना श्रध्दांजली वाहून झाली की झळके चित्रपटाचे नाव. कधी त्यावर निर्मात्याचे नावही. आठवा सलिम्स आग किंवा जिगर. चित्रपट कोणत्या रंगात रंगलाय त्यालाही महत्व असायचे. ओरवो कलर, इस्टमन कलर हेही खाली नमूद केले जायचे. त्यानंतर कलाकार, त्यातही मुख्य कलाकार मग सहाय्यक मग व्हीलन व नंतर फुटकळ अशी भाजणी. काही आणि... सारखे बिरुद मिरवणारी मंडळी शेवटी. अर्थसहाय्य, लोकेशन आणि सौजन्य अशा फोर्म्यालिटि पार पडल्या की लेखन, पटकथा, नेपथ्य, छायांकन, गीत, संगीत, गायन असे मुख्य कलाकार आणि त्यांचे असिस्टंट झाले की निर्माता आणि दिग्दर्शक (त्यातही सही ठोकायची फॅशन मराठीत जास्त) असे साधारण मानांकन असे. ह्यात नवलाई म्हणजे काहीजण क्लासिकल अॅनिमेशन वापरीत तर काहीजण मुख्य व्यक्तीरेखांची कॅरीकेचर्स. पण बोल्ड पिवळ्या फॉन्टातली टायटल्स आणि रंगीत पार्श्वभूमी हा पार्ट कॉमन प्रॅक्टीस असे.
.
चित्रनगरींचे बॉलीवुड झाले अन व्यवसाय कसा बिझिनेसप्रमाणे चालू झाला. क्रेडीटस मधली नावे वाढली, जबाबदार्या वाढल्या. सुरुवातीपासूनच झळकणार्या विविध रंगबिरंगी लोगोमधून सुजाण लोक बरोबर अर्थ काढू लागले. चित्र्पटाची जाहिरात एफेमवर वाजू लागली की ते एफएम चॅनल हे मिडीया पार्टनर असते, चित्रपटात काही बातम्या किंवा टेलिव्हीजन कार्यक्रमाची दृष्ये असली की ते चॅनल सुरुवातीला आपली जागा राखून ठेवते, स्ट्रीमींग पार्टनर हे थिएटरशिवाय कुठे चित्रपट दिसणार हे सांगते. म्युझिक पार्टनर्स संगीताचे हक्क राखून ठेवतात. काही युट्युब चॅनेलही प्रमोशनच्या नावाखाली झळकून घेतात. अर्थसहाय्य करणारी बँक चित्र्पटातल्या कुठल्या तरी दृष्यात दिसणार ह्याची खात्री असते. मुख्य कलाकार काही उत्पादनांचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर वगैरे असतात, ती उत्पादने घरचे कार्य असल्याप्रमाणे हजेरी लावतात. व्हीएफएक्स आणि पोस्ट प्रॉडक्शन करणारे मिडीया हाउसेस स्वतःला मिरवून घेतात. साउंड आणि डिस्प्लेचे प्रोसेसर्स त्यांचे लोगो घेऊन येतात. नंतर मात्र जुन्या परंपरेनुसार क्रम सुरु होतो. मात्र नव्यांची ही मांदीयाळी अगदी असिस्टंटस, युनिट, लोकेशन, केटरर्स, मेकप, कॉश्चुम, लोजिस्टिक्स, स्पॉटबॉय अशा विविध डिपार्ट्मेंटातील सर्व म्हणजे सर्व वर्हाडीसह श्रेयानुसार चित्रपट संपताना पुन्हा लहान अक्षरात काळ्या पार्श्वभूमीवर वर वर सरकत जात असते. अर्थात हेही बघायला थांबणारे रसिक असतात. त्यासाठी एखादे आयटम साँगही दान केले जाते ते एका बाजूला वाजत असते.
.
आता इतक्या सगळ्या माहितीजंजाळात कलात्मकता कुठे? आठवा तो चंद्रा बारोटचा डॉन. टायटलच्या पार्श्वभूमीवर पूर्ण चित्रपटातील निवडक प्रसंग निगेटिव्ह फिल्मच्या रुपात दिसतात, शोले च्या सुरुवातीचा घोड्यांचा प्रवास, अंगूर मधील संजीव कुमारासहीत सगळे द्राक्षाच्या घडात कार्टून रुपात, किंबहुना हृषिकेश मुकर्जींच्या टायटलात कार्टून्स हमखास डोकवयाचेच. हिच पध्दत सचिन पिळगावकरांनी मराठी चित्रपटात वापरली. कमल हसनच्या मेयरसाब मध्ये पूर्ण पडद्यावर एका माणसाचे रेखाचित्र दिसते. तशीच माणसांची रेखाचित्रातली गर्दी वाढत वाढत एका बाजाराचे चित्र साकारले जाते आणि त्याचे रुपांतर प्रत्यक्ष बाजाराच्या सीन मध्ये होऊन चित्रपट सुरु होतो. एका खेड्यातील बदकावर स्थिरावणारा कॅमेरा हळूहळू गावात फिरणार्या बदकाच्या थव्याचा पाठलाग करत राहतो आणि त्याला उधळत एका गुंडाची कार आणि त्यापाठोपाठ बुलेटवर इन्स्पेक्टर कमल हसन. ही शीर्षक सुरुवात आहे विचित्र सहोदरगल अर्थात अप्पूराजाची. रोजाच्या शीर्षकात कश्मीरी दहशतवाद्यासोबतच्या भारतीय जवानांची चकमक, धूमच्या शीर्षक सुरुवातीत रेसर बाईक्स आणि पिस्तुले दिसतात. देवडी सारख्या चित्रपटात अनुराग कश्यप पात्रांची ओळख पाट्या देऊन करतो तर मै हूं ना मध्ये शीर्षकासाठी स्वतंत्र गीत तयार करुन एका जत्रेत सर्वानाच आपला चेहरा दाखवायची संधी दिली जाते. पात्रांची थ्रीडी स्कल्प्चर्स तयार करुन घेऊन त्यावर शीर्षक रचले गेले बाहुबलीमध्ये. अर्थात हॉलिवूडचा प्रभाव इथेही होता. अॅव्हेंजर्स मध्ये ही स्टाइल वापरली गेली होती. हॉलीवूड टायटल्सच्या बाबतीत सुरुवात पटकन करतात पण शेवटाची लांबण संपता न संपणारी. त्यातल्या त्यात डिस्ने किंवा वॉर्नरचे पट असतील तर कमीत कमी १५ मिनिटे ग्राफिक्स, अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स, कलर्स, आणि साउंड ट्रॅकचे स्वतंत्र क्रेडीट्स घेतातच. आजकाल अॅनिमेशन आणि पोस्ट प्रॉड्क्शनमध्ये भारतीय नावेही दिसू लागली आहेत मात्र फक्त ह्याच डिपार्टमेंटात. बॉन्डपटातील शीर्षक आणि त्यासाठी खास तयार केलेले शीर्षकगीत हाही एक बॉन्डच्या ललनाइतकाच आकर्षक विषय. डिस्नेच्या कथातील चित्रे, पात्रे किंवा प्रसंग घेऊन केलेली शीर्षके हा चित्रपटाइतकाच आकर्षक भाग असतो. डिस्नेच्या मोआनाच्या शीर्षकात चित्रपटात वापरल्या गेलेल्या सार्या प्रॉपर्टीज कलात्मकरीत्या वापरल्या गेल्या होत्या. ३०० आणि राइज ऑफ एम्पायरची रक्तरंजीत शीर्षके ग्राफीक्सची वेगलीच ओळख करुन देतात.
.
आणि आता आपण काय करतो तर स्कीप इन्ट्रो. ह्या बटनासाठी नेटफ्लिक्साने फारच पैसे खर्च केलेले म्हणे. ओटीटी वरील वेबसिरिजा आणि त्यांचे बिंज वॉचिंग करताना प्रत्येक एपिसोडला येणारे शीर्षक भलेही बघण्याची लिंक तोडत असेल आणि त्यावेळी स्कीप इंट्रो दाबलेच जात असेल तरीही आता स्मार्ट टेलिव्हीजनावरील प्रत्येक चित्रपटालाही स्कीप इंट्रो उपलब्ध केले जातेय आणि ही कलाकृती तुमच्या समोर येताना त्यांचे पडद्यामागचे कलाकार स्कीप करताना आपण एक खूप मोठी आणि कलात्मक वारसा लाभलेली परंपरा स्कीप करतोय असे नाही वाटत तुम्हाला?
.
.
(लिहिण्याच्या कंटाळ्यामुळे आणि अर्थातच विषय प्रचंड मोठा, अभ्यास करुनच प्रकटण्याइतका असलेने बराचसा स्कीप करत लिहिला आहे हे वेगळे सांगणे नलगे. तुम्हाला आवडलेले आणि कायम स्मरणात राहिलेले इन्ट्रो देऊन तुम्ही ही कमी पूर्ण करणार इतकी माझी खात्री आहे. धन्यवाद)
याद्या
17056
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
मला पटकन वाटलं फारएन्ड नि
मस्त लेख!
धन्यवाद फारएन्ड सर
In reply to मस्त लेख! by फारएन्ड
आणखी
सिम्सन ही कार्टून बघीतली तर
छान लेख आणी आठवणी . अनेक
काही नाटकांमधे , नाटक
काही नाटकांमधे , नाटक
In reply to काही नाटकांमधे , नाटक by सिरुसेरि
उत्तम निरीक्षण
गेले काही वर्षे जुने चित्रपट
सध्या जापनीज मंत्राने भुललो आहे.
काही आवडलेले इंट्रो
मुवि आणखी घ्या.....
In reply to काही आवडलेले इंट्रो by मुक्त विहारि
कॅच मी इफ यू कॅन
In reply to मुवि आणखी घ्या..... by चौकटराजा
इनट्रो अन् क्रेडिट्स
स्किप इंट्रो...कंट्रोल अल्ट डेल नंतरचा फार मोठा क्रातिंकारी शोध.
रोचक विषय..
इन्ट्रोची कथा .
कलात्मक वारसा लाभलेली परंपरा स्कीप करतोय असे नाही वाटत तुम्हाला?
श्रेयनामावली म्हटलं कि
आयला अजून, गेम ऑफ थ्रोन बद्दल
अगदी खरे!!
In reply to आयला अजून, गेम ऑफ थ्रोन बद्दल by आंद्रे वडापाव
लेख मस्त. माझे आवडते इंट्रो-
हॅरी पॉटरचे इंट्रो लैच खतरनाक
In reply to लेख मस्त. माझे आवडते इंट्रो- by कॉमी
देऊळ ची सँड आर्ट्स मस्तच होते
In reply to लेख मस्त. माझे आवडते इंट्रो- by कॉमी
छान निरीक्षण.चित्रपट कोणत्या
रंग ..
In reply to छान निरीक्षण.चित्रपट कोणत्या by आग्या१९९०
नारबाची वाडी
नारबाची वाडी आणि शाळा
In reply to नारबाची वाडी by बबन ताम्बे
जबरदस्त निरीक्षण आणि उत्तम लेख
ते टायटल साँग Stivie Wonder
In reply to जबरदस्त निरीक्षण आणि उत्तम लेख by सरनौबत
दो और दो पाँच
आणि शेवटची श्रेयनामावली
हं.
धन्यवाद
व्वाम सुंदर लेख !
जसपाल भट्टी च्या फ्लॉप शो चा
खूपच छान लेख!