आवाज बंद सोसायटी
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'.
ध्वनी प्रदूषण
तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.
माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता. शेजारी एखादा जण गायन करत असेल त्यात अन दररोज आठ, नऊ तास अनेक विद्यार्थ्यांनी गायन, वादन करणे यात फार फरक आहे. एकतर रहिवासी भागात गायन क्लास, तो सुद्धा ध्वनीरोधक - साऊंडप्रूफ नसलेल्या घरात चालू असल्याने माझ्या उद्वेगात भर पडत गेली. तेथील वाद्य, गायन आदींचा केवळ मलाच त्रास होत होता असे नाही, तर आजूबाजूच्या रहिवाशांनादेखील तो त्रास होत होता पण कुणीही त्याबद्दल संकोचाने आक्षेप घेतला नाही. त्यांचा हा एकप्रकारे निष्काळजीपणाच होता. क्लासच्या संचालक आणि घरमालक यांना या आवाजाच्या प्रदूषणाचे, त्याच्या परिणामांचे काहीच सोयर सुतक नव्हते. त्यांच्या मते त्यांनी चालविलेला हा क्लास त्यांच्या उच्च अभिरूचीचे लक्षण होते.
मला ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि कायदे माहित होते, त्यात आपले मिपाकर सदस्य श्री. वकील साहेब यांनी भर घातली. सरतेशेवटी, श्री. वकील साहेब यांच्या सल्याने मी पोलीसांत तक्रार दाखल करण्याची कल्पना गायन क्लासच्या संचालक, त्यांच्या घरमालकाला दिली. अर्थातच पोलीसस्टेशनमध्ये जाण्याची गरज पडली नाही आणि गायन क्लासच्या संचालकाशी, त्याच्या घरमालकाशी बोलल्यानंतर त्यांनी ती जागा रिकामी केली आणि कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली.
आजकाल आपल्याकडे जल आणि वायू प्रदूषणाबद्दल बरीचशी जागरूकता झालेली आहे. कमीतकमी त्याची चर्चा तरी होते. पण आपल्या समाजात ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता कमी आहे. मोबाईलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.
सततच्या आवाजाच्या गोंधळाने आपली चिडचिड होते. आजूबाजूचे आवाज नकोसे होतात. शांततेची आवश्यकता भासते. अवाजवी, गरजेचा नसलेला आवाज हा देखील प्रदूषणात मोडतो आणि मानवी स्वास्थ्यावर त्याचे परिणाम होतात.
ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे सादरीकरण बनवले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
(क्रमश:)
वाचने
17689
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
योग्य विषय मांडलात
In reply to योग्य विषय मांडलात by मुक्त विहारि
जरा आश्चर्य वाटले. श्री
In reply to जरा आश्चर्य वाटले. श्री by श्रीगुरुजी
गेली कित्येक वर्षे हा त्रास आहे
In reply to जरा आश्चर्य वाटले. श्री by श्रीगुरुजी
जरा लाॅकडाऊन उठले की
सल्ला .. मुवि यांना
In reply to सल्ला .. मुवि यांना by चौकटराजा
मेलेले कोंबडे आगीला भीत नाही ...
In reply to मेलेले कोंबडे आगीला भीत नाही ... by मुक्त विहारि
नाही ..
In reply to नाही .. by चौकटराजा
हे उदाहरण डोंबिवली येथे झाले आहे ....
In reply to सल्ला .. मुवि यांना by चौकटराजा
एक मित्रत्वाचा सल्ला
In reply to सल्ला .. मुवि यांना by चौकटराजा
+१
प्रभूच्या द्वारी
In reply to प्रभूच्या द्वारी by चौकस२१२
मी तर म्हणतो की ....
In reply to मी तर म्हणतो की .... by मुक्त विहारि
मुवि...
In reply to मुवि... by चौकटराजा
खरं आहे ...
In reply to खरं आहे ... by मुक्त विहारि
भारताला सुखाचे दिवस येणार
In reply to भारताला सुखाचे दिवस येणार by Rajesh188
अरे व्वा ....
In reply to अरे व्वा .... by मुक्त विहारि
पळपुटे पणा करू नका ....
सोसायटी आणि तक्रारी
माझे मत वाचा
मशिदींवरील भोंगे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
In reply to महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ by प्रकाश घाटपांडे
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ by प्रकाश घाटपांडे
प्र.घा. या बेडेकरांनी
In reply to प्र.घा. या बेडेकरांनी by सुरसंगम
डोंबोलीत पण हीच परिस्थिति आहे .....
In reply to प्र.घा. या बेडेकरांनी by सुरसंगम
घारा बोका
In reply to प्र.घा. या बेडेकरांनी by सुरसंगम
याचिकेमुळे ध्वनीप्रदूषण
फायर ऑडिट असते तसे आता
ध्वनी प्रदूषण हे अत्यंत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- SaathiyaIn reply to ध्वनी प्रदूषण हे अत्यंत by मदनबाण
ध्वनी प्रदूषण हे अत्यंत तापदायक आहे.....
बुलेटला ब्लास्टर लावून