मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तक्रार

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सखे मी शोधीतो तुझाच चंद्र कधीचा पाणावले नयन दर्शना तरसले का चांदणे सदा बरसले तुजवरी बरसताना कसे मलाच विसरले मोहरला देह ओलावली काया तुझी वाटेवरुन माझ्या मेघही परतले सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदु क्षितीजावरले माझ्या धृवही सरकले थांबली पुनव, सखे तुज स्वागता स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले विशाल

वाचने 1503 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अनंता Mon, 04/13/2009 - 17:52
तक्रार नोंदवून घेतलीये. बघेन कोणते कलम लावायचे ते. कृ. ह.घ्या. आपला- फुकट फौजदार , बिनपगारी , पुर्ण अधिकारी -अनंता. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

प्राजु Mon, 04/13/2009 - 18:22
खूप छान . का चांदणे सदा बरसले तुजवरी बरसताना कसे मलाच विसरले मोहरला देह ओलावली काया तुझी वाटेवरुन माझ्या मेघही परतले या ओळी विशेष आवडल्या. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/