फार्म हाऊस की नुसतीच हौस???????

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Jul 2016 - 8:40 pm
गाभा: 

डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम.
============================================

शेती करण्यापुर्वी बर्‍याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्‍याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला.

पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच.

आमचा थोडक्यात संवाद असा.

तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे?

मी : हो.

तो : काय भावात पडले?

मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल.

तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले.

मी : कितीला?

तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत.

मी : अरे व्वा!!! मस्तच.

तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू.

मी : मस्त.

तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच.

मी : छान.

तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे.

मी : ओके. हे तर फारच उत्तम.

तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ.

मी : असे झाले तर फार उत्तम.

तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस.

मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय?

तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस.

मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी?

तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर.

मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या.

तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू.

मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत.

तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो.

मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन.

तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी.

मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे.

तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो.

मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की.

तो : हो ना.मग दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले.

अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच.

पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात.

कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके.

आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी.

आता तिसर्‍या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्‍यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्‍यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो.

आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो.

मी : का रे?

तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू.

मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते.

तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे?

मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती.

तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ.

आता पुढे मला काही बोलवेना.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 8:43 pm | टवाळ कार्टा

दिवसाला २ धागे? कट्टा मानवला =))
आणि हो...मी पयला :)

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 8:48 pm | मुक्त विहारि

टका, लेका नीट मोज.

चार धागे झाले की.

"कट्टा मानवला."

नाही रे बाबा, आज खूप दिवसांनी शेतीच्या भानगडी तून सुटका झाली.

अजून थोडा वेळ थांबलास तर, एका धाग्याला उत्तर पण द्यायचे होते, तेच लिहीत आहे. ते पण वाचता येईल.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 8:49 pm | टवाळ कार्टा

अरे हो...४ धागे =))

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 8:47 pm | टवाळ कार्टा

फार्म हाउससारखेच "वीकेंड होम" यावर पण लिहा...माझ्या घरच्यांच्या डोक्यात खूळ शिरले आहे...आयुष्यात पहिल्यांदाच ढीगभर पैसे नसल्याचा आनंद झाला

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 9:00 pm | मुक्त विहारि

सांगीतलीस तर उपाय पण सांगतो.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 9:04 pm | टवाळ कार्टा

लोणावळा/नेरळ्/कर्जत...काय हवे ते नाव टाका

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 9:46 pm | मुक्त विहारि

म्हणजे साधारण ४५ लाखाच्या आसपास.

तितकेच पैसे बँकेत टाका आणि त्या व्याजावर दरवर्षी एक महिना सहकुटुंब परदेशी सहल काढा.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:52 pm | टवाळ कार्टा

बँकेत टाकायला तितके पैसे असले पाहीजे ना? हे प्लान्स पीएफचे पैसे + लोन काढून...

संदीप डांगे's picture

4 Jul 2016 - 11:39 pm | संदीप डांगे

कॄपा करुन असं नका करू हे सांग घरच्यांना... त्यापेक्षा आसनगाव वैगरेंकडे एखादं घर घ्या. इन्वेस्टमेंट उत्तम होईल.

सेकंड होम हे लोन काढून घ्यायची गोष्ट नव्हे. तो ब्लॅकमनी लपवण्याची व्हाईट कॉलर मखलाशी आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:42 pm | टवाळ कार्टा

+१

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 6:50 am | कैलासवासी सोन्याबापु

+१

पुरेश्या वेळे अभावी लेख वाचला नाही.
पण एका दिवसात चार पाच लेख .!?
शेतकरी लोकांना शोभत नै..
(ह घ्याल अशी अपेक्शा)

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 9:47 pm | मुक्त विहारि

तसेच एका व्यवसायातून दुसर्‍या व्यवसायात शिरतांना मिळालेला फावला वेळ आहे.

थोड्या दिवसांनी मुविकाकांच्या लेखनाला अशा टिपा असतील.
.
बाया खुरपायल्यात, तवर टाकला एक लेख.
पावसानं काय ओढ दिली नाही, तवर टाकला एक काकू.
ट्रॅक्टर काय आला नाय अजून, टाकतो एक भटकंती.
बागवान येतो म्हणाला बघायला, टाकतो एक कथामाला.
डीसीसी ला आलेलो पीक विमा न्यायला, टाकतो एक क्रमश:.
.
मुविकाका शेती सिरियसली करा पण माझा प्रतिसाद हलका घ्या बरका. ;)

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 12:05 pm | मुक्त विहारि

ह्या प्रतिसादा बद्दल एकदा जुन्या मठादिपती समवेत चर्चा करू.

मठाधिपती सध्या गादीवाफ्यावर वांगी लागवड करताहेत.

.
.
पळा पळा, बुवा आले झाऱ्या घेऊन ;)

चंपाबाई's picture

4 Jul 2016 - 11:05 pm | चंपाबाई

Farm / farm house and second home are 3 distinct catagories

खटपट्या's picture

5 Jul 2016 - 6:09 am | खटपट्या

खूप चांगला लेख.

सुबोध खरे's picture

5 Jul 2016 - 10:34 am | सुबोध खरे

फार्म हाऊस घेणाऱ्या लोकांना एकरी २-३ लाख रुपये महिना "करमुक्त" उत्पन्न येते. म्हणून लोक ते घेतात. मग त्या जागेत गवत किंवा तण माजलेले असेना का? सगळ्या सिने नटांची पनवेल कर्जत जवळ फार्म हाऊसेस आहेत. आणि तेथे उत्तम शेती होत असते आणि भरघोस उत्पन्न निघते असे आयकर विभागाच्या कागदपत्रांवरून समजते.

असेच लोक सर्वसामान्यपणे फार्म हाऊस वर पैसे खर्च करतांना मला दिसले.

किंबहूना, कोकणातील जमिनींचे भाव वाढवायला आणि ज्याला मनापासून शेती करायची इच्छा आहे, त्याला अनावश्यक भांडवली खर्च करायला हे फार्म हाऊस वाले भाग पाडतात.

मध्यंतरी एका जागेची टेलीफोन वरून चौकशी केली.

त्याने पहिल्याच फटक्यात सांगीतले, की, ते फक्त डॉक्टर, सी.ए., किंवा बिझनेसमन ह्यांनाच जमिन देतात. कारण एकरी भावच ८० लाख (होय गुंठ्याला २ लाख) रुपये आहे.कारण जागेत भरपूर झाडे आहेत आणि तुम्ही हवे तितके उत्पन्न दाखवू शकता.

असो,

मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर सरळ बँकेत ठेवीन आणि त्या व्याजावर जगीन.

कानडाऊ योगेशु's picture

7 Mar 2021 - 11:32 am | कानडाऊ योगेशु

मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर सरळ बँकेत ठेवीन आणि त्या व्याजावर जगीन.

आता बँकांचीही शाश्वती नाही राहीली हो काका!

मुक्त विहारि's picture

7 Mar 2021 - 11:36 am | मुक्त विहारि

एकाच टोपलीत सगळी अंडी ठेऊ नयेत ...

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2021 - 1:08 pm | प्रकाश घाटपांडे

हे तर गुंतवणूकीचे तत्वच आहे. वय, पिंड, कौटुंबिक जबाबदार्‍या यानुसार परत बदल होतात. वय वाढत गेल की रिस्की गुंतवणुक नको वाटते. सुरक्षित गुंतवणूकीकडे कल असतो.

हे साहजिक आहे ....

त्यात चुकीचे काहीही नाही....

मुली असतील तर, अजिबात रिस्क घेऊ नये...

मुले असतील तर, शेती तील गुंतवणूक उत्तम...

कोकणात कोणत्या गावात आहे ह्यांची जरा माहिती देता का.
हायवे किंवा शहराजवळ ची ठिकाण सोडून.
जिथे फक्त शेती होवू शकते अशी जमीन दोन लाख गुंठा आहे हे काही पटत नाही.
तुमच्या कडे सर्व ऐकीव माहिती असते.असे मला वाटत.

मुक्त विहारि's picture

7 Mar 2021 - 1:55 pm | मुक्त विहारि

तो वाचा आणि मग ठरवा....

उत्तम आणि सत्यदर्शक लेखाजोखा. जियो मुवि.. !!!
पुरत्या तयारीनिशी शेतीत उतरणारे तुम्ही पहिलेच दिसलात. उत्तम...!!!

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 11:55 am | मुक्त विहारि

अद्याप तरी तयारी परिपुर्ण नाही. पण निदान फार तोटा होणार नाही, इतपतच (कागदोपत्री) तयारी झाली आहे.

किंबहूना शेती ही फार विविध प्रकारे केली जात असल्याने, प्रत्येक वर्ष हे प्रयोगाचे आणि देवाचे.

पैसा's picture

5 Jul 2016 - 11:21 am | पैसा

तीस लाखाला घर आणि अर्धा एकर जागा? फारच आतबट्ट्याचा व्यवहार आहे. मात्र वर चंपाबाई लिहितात त्याप्रमाणे शेती, फार्महाऊस आणि गुंतवणूक म्हणून दुसरे घर घेणे हे तीन वेगवेगळे प्रकार आहेत नक्कीच.

सुबोध खरे's picture

5 Jul 2016 - 11:29 am | सुबोध खरे

पैसा ताई
सरकारी वरकड उत्पन्न असते त्यात अशी फार्म हाऊस विकत घेतली जातात सुरुवातीचा व्यवहार आतबट्टयाचा वाटतो( मध्यम वर्गीयाला) पण हेच फार्म हाऊस नंतरचे वरकड उत्पन्न पांढरे करायला उपयोगी पडते. आमच्या शेजारील इमारतीतील फ्लॅट २.५ कोटी रुपयाला आहेत तेथे राहणारे "महापालिके"तील सर्व लोक पगार ६०-७०,०००/- वाले आहेत. आयुष्यभराचा पगार टाकला तरी ते घर त्यांना विकत घेणे परवडणार नाही. पण घर जाऊन पाहिले तर इटालियन मार्बलची फरशी दिसते.
तुम्ही आपले ग्राहक पेठेतून स्वस्त धान्य कुठे मिळेल याची चिंता करता.
असेच आहे.

मार्मिक गोडसे's picture

5 Jul 2016 - 11:31 am | मार्मिक गोडसे

तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत.

लेख जरी काल्पनिक असाला तरी, निदान महाराष्ट्रात कायदेशीरपणे अर्धा एकर जागेत फार्महाऊस बांधता येत नाही. कमीतकमी १ एकर शेतजमिनीची अट आहे व त्यावर जास्तीतजास्त १००० स्क्वे.फू. बांधकाम करता येते, शेतकरी असण्याची अट आहेच. शेतकरी नसलेंल्यांसाठी गुंठेवारी प्लॉट पाडून तेथे बंगले बांधून 'फार्महाऊस' म्हणून विकणारे व घेणारे भरपूर आहे. अशा जमिनीतून घेतलेले कोणतेही उत्पन्न हे करमुक्त नसते.

damn's picture

8 Jul 2016 - 8:37 am | damn

परंतु,
फुकटच्या पैशांनी सूज चढलेल्यांना या तथ्याशी काही घेणेदेणे नसते.
सिस्टिम कुठे कशी किती वाकवता येते, याच्या स्वानुभवाने अशी मंडळी तरबेज झालेली असतात.

मुविंच्या शेतीची जाहिरात जोरदार झालीये ४ धाग्यांनी

प्रकाश घाटपांडे's picture

7 Jul 2016 - 10:52 am | प्रकाश घाटपांडे

नुकतच पुंजी पणाला लावून फार्म हाउस घेण्याच्या बायकोच्या प्रयत्नाला अपयश आणण्यात यशस्वी झालो. तिला लेख वाचायला दिला.
आम्ही आमच्या वडिलोपार्जित शेत्या विकल्या व गावकी आणि भावकी पासून दूर झालो. पुनर्वसनाच्या बोजा मुळे अजून ही नाव माझेच आहे शेतीवर. म्हणजे मी अजूनही शेतकरीच आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2021 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे

या लेखाची लिंक मी अनेकांना फॉर्वर्ड केली. एकदा का हौसेला मोल नसते हे मान्य केले की उत्साहापोटी त्यात किती पैसे घालावे याचे तारतम्य रहात नाही. इतरांनी फॉर्म हाउस बांधावीत व आपण त्यात चार दिवस जाउन एंजॉय करावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्यांनी जरुर ती घ्यावीत. म्हणजे इतरांचाही फायदा. एकदम विन विन सिच्युएशन. मग कधी घेताय फॉर्महाउस? :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Feb 2021 - 12:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

फार्म हाउसच नव्हे तर सगळ्या मालमत्तांबाबत हीच तर्‍हा आहे. पहीले कर्ज काढुन मालमत्ता घ्यायची, मग अजुन पैसे घालत राहुन कधी विहिर, कधी कुंपण, कधी वीज्,रखवालदाराचा पगार, वावर नसल्याने अधेमधे होणार्‍या चोर्‍या किवा अतिक्रमणे,झाडे तोडणे हे नुकसान सहन करायचे आणि परतावा काय? तर वर्षात कधीतरी ४ दिवस तेथे जाउन राहायचे.फ्लॅट जरी घेतला तरी सोसायटीच्या कटकटी, मेन्टेनन्स, भाडेकरुच्या कटकटी, एजंट्चे ताप हे आहेच. थोडक्यात तुन्ही स्वतः रहाणार असाल तर कुठलीही मालमत्ता खरेदी करावी नपेक्षा मुविकाकांनी वर म्हटल्याप्रमाणे एफडीत नाहीतर म्युचुअल फंडात पैसे टाकुन सुखी असावे आणि वर्षाला एक परदेश दौरा करुन हौस भागवावी.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2021 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे

तो किडा असतो. उत्साहाच्या भरात सर्वसामान्य लोक तिथे आकर्षित होतात. नंतर तोटा लक्षात आला तरी कॉग्निटिव्ह डिझोनन्स असतोच स्वतःची समजूत घालायला. शिवाय हौसेला मोल नसते याचा अर्थ हौस ही अमूल्य गोष्ट आहे तिची किंमत फायदा तोटा मधे करता येत नाही.

मुक्त विहारि's picture

26 Feb 2021 - 12:05 pm | मुक्त विहारि

अर्थात, कुणी किती मोल त्यासाठी खर्च करावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे,

माझ्या ओळखीतील एकाने, 60-70 लाख, एके ठिकाणी गुंतवले आहेत. बंगला आणि 2-4 गुंठे जागा आहे ... गेल्या 7-8 वर्षांत, तो जेमतेम 15-20 वेळाच तिथे जाऊ शकला ...

बंगला अशा ठिकाणी आहे की, तो भाडेकरू पण ठेऊ शकत नाही आणि देखभालीचा खर्च, दरमहा करावा लागतो, तो वेगळाच...

मोठ्या लोकांच्या मोठया गोष्टी. सर्व सामान्य माणसाने, हे पांढरे हत्ती पोसू नयेत.... हे माझे वैयक्तिक मत आहे...

वेल्हे तालुक्यात कमलिनी कुटीर च्या जवळ एक शेतजमीन आपण दोन तीन जणात घ्यायची अस म्हणतीये. २० लाख तरी घालावे लागतील त्यासाठी पीपीएफ काढू, सोन काढू, एफडी मोडू, नातेवाईकांकडून व्याजाने/उसने घेउ असे बायको म्हणू लागली आहे. एकच मुलगी आहे व जावई आर्मीत आहे. ते त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. एक रो हाउस आहे . त्याचे भाडे येते. माझी पेन्शन आहे.माझे मते आता आयुष्याच्या उत्तरार्थात कोणती रिस्क न घेता. आवरते घ्यावे. पुंजी वा संचिताचा लाभ घ्यावा. स्थैर्य महत्वाचे आहे. माझे अल्पसंतुष्टत्व हे तिला आता डिप्रेशन वाटू लागले आहे. मरायची वाट बघत जगायचे याला काय अर्थ आहे ? असे ती म्हणू लागली आहे.
मी हे गांभीर्याने लिहितो आहे. मला खरच चिंता वाटू लागली आहे. कृपया उपाय सुचवा.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2021 - 1:19 pm | प्रकाश घाटपांडे

सध्या माझ्यावर कुठलेही कर्ज नाही.देणे नाही, सरकार वेळेवर पेन्शन देत आहे. वाचन, लिखाण, व्याखान , करमणूकीचे कार्यक्रम, वादसंवाद, संगीत, पुस्तके,नेट मुशाफिरी यात मला आनंद वाटतो. ते मी करतोच आहे. विनाश काले विपरित बुद्धी या सुभाषिताचे मला भय वाटते. या टप्प्यात कमी ताण घेउन आयुष्य आनंदात जगावे या मताचा मी आहे. ये जीना भी कोई जीना है लल्लू असे कुणीतरी अतिउत्साही मला म्हणतोय अस वाटतोय. असो विस्कळीत वाटल तसच मिपा आपल वाटल म्हणून लिहिल

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2021 - 1:53 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्या जालीय प्रवासाचे इथे अनेक साक्षीदार आहेत. काही ठिकाणी मतभिन्नता असली तरी मिपाकर माझे हितचिंतक आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी इथे हे लिहितो आहे.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 2:18 pm | मुक्त विहारि

भाड्याने शेती करायची....

पण,

इथेही फसवणूक खूप होते...

शिवाय, भाड्याने शेती करायची असेल तर, 5 महत्वाच्या गोष्टी आहेत.

1. किमान 30 ते 40 वर्षांसाठी हवी

2. एकरी 1-2 लाख रूपये खर्च करायची तयारी हवी

3. एकलकोंडे पणाची सवय हवी, गावकरी जवळ करत नाहीत

4. मजूर वर्ग लुबाडतोच

5. स्वतःकडे चारचाकी हवी, मेडिकल, शेतीचे सामान आणि इतर गोष्टींसाठी

१. निवृत्तीनंतर शेतजमीन घेऊन त्यातून उत्पन्न कसे मिळवणार हे नक्की केले आहे का? जमीन कसण्याबाबत कोणा इतरावर पूर्ण अवलंबून रहण्यात अर्थ नसतो.

२. केवळ गुंतवणूक म्हणून जमीन घेऊन ठेवायची असेल तर दोघातिघांत मिळून घेण्याने पुढे अनेक पातळ्यांवर अडचणी येऊ शकतात. विक्री करुन आपला वाटा घेऊन एक्झिट करणे गुंतागुन्तीचे ठरू शकते. न होवोत, पण वाद होऊ शकतात (मी प्रत्यक्ष कष्ट केले, तुम्ही फक्त वाटा घेतला इ इ ). तुमचे मतभेद जरी झाले नाहीत तरी पुढच्या पिढ्यांचे काय? पुढे पिढ्या वाढल्या की वाटेकरी वाढतात. ते जगभर विखुरले जाऊ शकतात. विक्रीसाठी पुढाकार घेणारा मिळणे अवघड़ होते. असंख्य वाटे निर्माण झाल्याने प्रत्येकाला येणारा वाटा लहान होत होत कुणालाच पुरेसा इंटरेस्टिंग न वाटल्याने देश विदेशातून सर्वांना एकत्र आणणे दुरापास्त होऊ शकते. जमीन भिजत घोंगडे प्रकरण होऊ शकते.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 2:23 pm | मुक्त विहारि

मुळांत, प्रत्येक जमिनीची प्रतवारी वेगळी असते, हवामान वेगळे असते,

एकच गोष्ट काॅमन असते आणि ती म्हणजे फसवणूक....

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2021 - 4:19 pm | प्रकाश घाटपांडे

१) उत्पन्न हा हेतुच नाही. केवळ हौस म्हणून घ्यायची असे बायकोचे म्हणणे आहे. मला त्यात काहीही रस नाही हे वर लिहिले आहेच
२) हौसे परी हौस हाच मुद्दा. जमीनेचे भाव वाढतच असतात. त्यामुळे गुंतवणूक म्हणूनही त्याचा उपयोग होईल हा बायकोचा मुद्दा

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 2:25 pm | मुक्त विहारि

फोन नंबर पाठवला आहे

सन्जोप राव's picture

14 Mar 2021 - 6:56 pm | सन्जोप राव

माझे फार्म हाऊस नाही, पण माझी शेती आहे. त्यातील माझा अनुभव असा:
पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या जमिनीला उत्तम किंमत येते. कितीही उत्तम उत्पन्न आले तरी (ऊसासारख्या पिकाची शेती करणार्‍या आमच्यासारख्या आळशी शेतकर्‍यांसाठी) वर्षाकाठी पाच टक्के देखील परतावा येत नाही.
हे सगळे वंशपरंपरागत चालत आलेली शेती असताना. नवीन शेती विकत घेतली तर हे सगळेच हिशेब बदलतील.
लहानपणापासून शेतीची माहिती असूनही माझी शेती अजिबात फायद्यात नाही. त्यावर माझे पोट अवलंबून नाही म्हणून ती मी आजवर विकली नाही, इतकेच.
आनि शेवटी, पन्नाशीनंतर, साठी जवळ येऊ लागलेली असताना, मानसिक शांततेइतके दुसरे काहीच महत्त्वाचे नाही असे मला वाटते. फार्म हाऊसची उदाहरणे वर दिलेली आहेतच. शेवटी हे सगळे ज्याच्या त्याच्या 'कंफर्ट झोन' वर अवलंबून आहे. आपल्याला ज्यात आनंद वाटतो ते आपण करावे.
या वयात सगळी पुंजी मोडून असे काही करावे असे मला अजिबात वाटत नाही, मग भले त्याला कुणी डिप्रेशन का म्हणो.
पण हे माझे मत आणि प्रकाशराव, मीही तुमच्याच गोत्राचा माणूस. आपले विचार कुणाला अजिबात पटले नाहीत, तर मला नवल वाटणार नाही.
असो.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 7:03 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

कपिलमुनी's picture

15 Mar 2021 - 2:17 am | कपिलमुनी

मग पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सधन कसे काय गणले जातात

मला शेतीचा वैयक्तिक 6 वर्षे अनुभव आहे. ( लहानपणीपासून मोजला नाही कारण तेव्हा निर्णय मी घेत नव्हतो , फक्त काम करत होतो)

आजवर माझी ऊस शेती कधीही तोट्यात नाही. पावसाने एक लागण गेली पण नंतर खोडव्यात लेव्हल झालीच.

सांगलीत आमच्या पंचक्रोशीत कोणीही शेती विकत नाही. योग्य पद्धतीने केली तर शेतीत फायदा नक्कीच आहे.
लागण, लागवड , भांगलन , 3 -5 वर्षामागे ड्रीप चा खर्च, स्वतःची मजुरी पकडून सांगत आहे.

कर्नलतपस्वी's picture

12 Dec 2021 - 5:14 pm | कर्नलतपस्वी

घाटपाडें साहेब तुमचा विचार बरोबर आहे. आता स्वताःसाठी जगा. आजच सुचलीय बघा पटतय का?
मी तर सगळी खाती बंद केली आहेत. सल्ला विचारला म्हणून देतोय.......

पुरूष एक वाल्या कोळी
आयुष्यभर विणतो जाळी
पापाचा घडा मात्र
शेवटी त्याच्याच भाळी

जाळ्यात शिकार फसेल
म्हणून वाट बघत बसतो
कर्तव्य पुर्तीचा भ्रम
उगाच जपत आसतो
पुरूष एक वाल्या कोळी.....

तहान नाही भूक नही.
बसला होता नाक्यावर
डोक आलं जाग्यावर
आप्तानी जेव्हा मारलं फाट्यावर
पुरूष एक वाल्या कोळी......

नारायण नारायण जाप करी
नारदाची आली स्वारी
ऐकुन विनंती वाल्याची
म्हणती,त्रेता मधे एकच होता
पुरूष एक वाल्या कोळी......

कलीयुगी सारेच वाल्या
एवढे राम कोठून आणू
नाही केवट नाही राम
ज्याचे ओझे त्यालाच घाम

कलियुग आहे बाबा,
खुळ्या भ्रमात नको राहू
दुसऱ्याच ओझं नको वाहू
पुरूष एक वाल्या कोळी......

नारायण नारायण म्हणत गेले
वाल्याचे डोके ठिकाणावर आले
पण आता काय उपयोग
जेव्हां सारे पोपट गेले उडुन

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 5:22 pm | मुक्त विहारि

मस्तच

कर्नलतपस्वी's picture

19 Mar 2021 - 11:51 pm | कर्नलतपस्वी

कविवर्य बा भ बोरकर यांच्या कवीतेप्रमाणे. आता विसाव्याच्या क्षणी मस्त जगायचं
कुणी कुणासाठी थाबंत नाही
कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही
आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही
असेल तोवर मस्त रहायचं
नंतर फक्त आठवणींत जगायचं

मुक्त विहारि's picture

20 Mar 2021 - 6:03 am | मुक्त विहारि

आर्थिक, शारीरिक, मानसिक ताकद असेल आणि कौटुंबिक मान्यता असेल तर, सामाजिक कामे पण करू शकतो...

सामाजिक कार्य करण्यासाठी, ह्या चारही गोष्टी हव्यातच...

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2021 - 7:02 pm | प्रकाश घाटपांडे

'यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।।"
असा अर्थ बोरकरांना अभिप्रेत आहे का?

रोजचा खर्च चालण्यासाठी तुमच्या कडे पेन्शन आहे,औषध किंवा बाकी extra खर्च निघाला तर रो हाऊसेस चे भाडे आहे .
म्हणजे खर्च कसा चालणार,आजारी पडलो तर उपचार साठी पैसे कोठून येणारं ही समस्या तुम्हाला नाही.
एक महत्वाची समस्या वर कायम स्वरुपी उपाय तुमच्या कडे.
आता काही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवायचे नाहीत.
तुम्हाला तुमचे छंद जपता आले पाहिजेत कोणत्यातरी कामात गुंतून राहिले तर विरंगुळा सुद्धा मिळतो आणि समाधान सुद्धा मिळते.
शेती तुम्ही छंद म्हणून घ्या गुंतवणूक म्हणून नाही.
पण कर्ज काढून नको आणि जास्त पण नको.
तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ ,कोणतीच समस्या नसलेली आणि पाणी उपलब्ध असलेली १० गुंठे जमीन पण खूप झाली.
त्या जमिनीत तुम्ही विविध प्रयोग करू शकता.
कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या,फळे पिकवू शकता आणि उत्तम दर्जा चे अन्न निर्माण करू शकता.
झाडांच्या सानिध्यात दिवस कसा छान जातो.
त्यांना वाढताना बघून खूप आनंद आणि समाधान मिळते.
पण तुम्हाला त्या ची आवडा असेल तरच.
आता फक्त आपले छंद जपायचे आणि त्या मधून पैसे मिळाले तर बोनस.

रोजचा खर्च चालण्यासाठी तुमच्या कडे पेन्शन आहे,औषध किंवा बाकी extra खर्च निघाला तर रो हाऊसेस चे भाडे आहे .
म्हणजे खर्च कसा चालणार,आजारी पडलो तर उपचार साठी पैसे कोठून येणारं ही समस्या तुम्हाला नाही.
एक महत्वाची समस्या वर कायम स्वरुपी उपाय तुमच्या कडे.
आता काही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवायचे नाहीत.
तुम्हाला तुमचे छंद जपता आले पाहिजेत कोणत्यातरी कामात गुंतून राहिले तर विरंगुळा सुद्धा मिळतो आणि समाधान सुद्धा मिळते.
शेती तुम्ही छंद म्हणून घ्या गुंतवणूक म्हणून नाही.
पण कर्ज काढून नको आणि जास्त पण नको.
तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ ,कोणतीच समस्या नसलेली आणि पाणी उपलब्ध असलेली १० गुंठे जमीन पण खूप झाली.
त्या जमिनीत तुम्ही विविध प्रयोग करू शकता.
कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या,फळे पिकवू शकता आणि उत्तम दर्जा चे अन्न निर्माण करू शकता.
झाडांच्या सानिध्यात दिवस कसा छान जातो.
त्यांना वाढताना बघून खूप आनंद आणि समाधान मिळते.
पण तुम्हाला त्या ची आवडा असेल तरच.
आता फक्त आपले छंद जपायचे आणि त्या मधून पैसे मिळाले तर बोनस.

टर्मीनेटर's picture

6 Mar 2021 - 3:24 pm | टर्मीनेटर

१००% सहमत.

शाम भागवत's picture

6 Mar 2021 - 3:33 pm | शाम भागवत

२० लाख ही काही छोटी रक्कम नाही.त्यात मातीशिवाय शेती करता येऊ शकेल काय? म्हणजे एखाद्याकडे रिकामा प्लॅट असेल तर त्यात अशी शेती २० लाखात करता येऊ शकेल काय? त्यात निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या पिकवणे वगैरे उद्योग करता येऊ शकतील काय?

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2021 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

या पर्यायाचाही विचार झाला आहे.तिला हवे ते करायचे स्वातंत्र्य आहेच. मी लिजवर शेती ची हौस भागवण्याचा पर्याय सुचवला तरी तसा तो मिळत नाही. व मिळाला तरी स्वत:चे अशी भावना तिथे राहत नाही. माझ्या तीन पिढ्या शेतात व गावी गेल्या. माझे शिक्शण लहानपण गावी व शेतीततच गेले. शहरात आल्यावर शेत्या झेपेना म्हणुन विकल्या.. मला त्याचे नावीन्य नाही. पण बायको पुण्यात आयुष्य गेलेली. तिचे आईवडिल प्राथमिक शिक्षक होते.

मुक्त विहारि's picture

7 Mar 2021 - 11:02 am | मुक्त विहारि

लीज वर जमीन देणारा, योग्य तो माणूस शोधतो...

नो प्राॅफीट, नो लाॅस, हे मिनिमम बघायला लागेल...

फक्त शेतजमीन घेउन त्यावर हौसेपोटी फार्महाउस बांधणे एवढेच अपेक्षित. त्यापासून कुठलेही उत्पन्न अपेक्षित नाही. हौसेला मोल नसतेचा मुद्दा
सध्या
१) मी18 लाख गुंतवणुक करुन मी 2003 मधे कर्वेनगर मधे एक रो हाउस घेतले . त्याची आज 2021 मधे त्याची बाजारभावाने किंमत 1.5 कोटी आहे. त्याचेच भाड्याचे उत्पन्न 23 हजार मिळते. एरिया डेव्हलपिंग आहे. ज्या बिल्डर कडून घेतले त्याचेच समोर 14 मजली कॉम्प्लेक्स होतो आहे. राहत्या घरापासुन २ किमी वर स्वतंत्र रो हाउस असे लिगल स्टेटस असलेले रो हाउस आहे. एरिया डेव्हलपिंग स्टेजला आहे. सोसायटीमधे नसल्याने कमर्शियल वापरासाठी उपयुक्त व लिगल असे स्टेटस आहे.. सध्या मुलांचे डे केअर नर्सरी तिथे आहे. छोट्या कंपनीसाठी, आयुर्वेदिक पंचकर्म, खाली दुकान वरती राहणे अशी गरज असलेल्या दुकानदारांसाठी वगैरे अत्यंत उपयुक्त आहे. डीपी रोड अजून झालेला नाही.
मी अल्पसंतुष्टी आहे.शिवाय आळशी आहे. रिस्क कमीत कमी घ्यावी असा कल. शारिरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे हे महत्वाच मानणारा. माझी मानसिकता खाली लिंकवर दिलेल्या मठ या लेखात आहे. शिवाय जुन्या मिपाकरांना माहित आहे.
बायको मात्र धडपडी workholic, Multitasker, उत्साही व भरपुर क्षमता असलेली आहे. तिचा जनसंपर्कही मोठा आहे. एक मिनिट शांत बसणे तिच्या स्वभावात नाही. घरांची खरेदी विक्रि भाड्याने देणे हा व्यवसाय. विशेषत: एनाराय लोकांसाठी तिचे उपयुक्तता मूल्य फार मोठे असल्याने सतत बिझी असते. आमच्या घरात कुटुंबप्रमुख तीच आहे.

http://www.misalpav.com/node/46420

२) रिअल इस्टेटच्या किमती भविष्यात किती वाढतील याचा अंदाज अनेकांचा चुकतो.अगदी बिल्डर लोकांचा देखील चुकतो. अन्यथा आमच्या गृहसंकुलात बिल्डरने स्वत:साठी अनेक फ्लॅट ठेवले असते. 2005 मधे बिल्डर कडे 25 लाखला 3 बीचके होते ते आज 2021 मधे 1.8 सीआर ला रिसेल मधे जातात.
दुसरा चर्चेत मुद्दा आला तो चांगला फायनान्शियल प्लॅनरचा जो ठरवायला अवघड आहे. इथे प्रश्न विश्वासार्हतेचा येतो. माझा एक सीएफए मित्र आहे त्याच्या कडे गुंतवणूक करत होतो पण नंतर त्याच्या धनदा इन्हेस्टमेंट प्रा लि. ची दिवाळे वाजले. त्यात अडकलेले पैसे गेलेच. मिळण्याची शक्यता फारच कमी. वेळोवेळी त्याने चांगले रिटन्स दिले होते. आता सरासरीमधे शून्य किंवा ऋण म्ह्णावे लागतील. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडेच कल आहे. एक फटका खाल्लाय आता नको. पुढच्या वीस पंचवीस वर्षांचे प्लॅनिंग हे देशाच्या आर्थिक धोरणावरच अवलंबून राहणार. माझा अर्थशास्त्राचा फार संबंध येत नाही. इन्कमटॅक्स पेयर असे लेबल लावून घ्यायची इच्छाही अपुरी राहीली. तिथपर्यंत पोचलोच नाही. बायको भरते टॅक्स. अल्पसंतुष्टत्वात मला आनंद व समाधान आहे. जो देगा उसका भला जो नही देगा उसकाभी भला! पेन्शन देतय मायबाप सरकार बिनचूक.तशी चिंता नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2021 - 4:15 pm | प्रकाश घाटपांडे

https://goo.gl/maps/dKGHQorYA7CvRmvY7
म्हणजे डेव्हलपिंग स्टेजचा अंदाज येईल.

nanaba's picture

11 Mar 2021 - 4:38 pm | nanaba

जर तुम्ही कधी वापरणारच नसाल, तर १.५ क्रोर चे रो हाऊस विकून बावधन वगैरे सारख्या एरिया मधे ३ बीएच के घ्या. ( उदा. https://www.magicbricks.com/propertyDetails/3-BHK-1255-Sq-ft-Multistorey...)

त्याचे भाडे येत राहिल - सेम अमाऊंट जी तुम्हाला आता मिळतेय.

वर जे पैसे येतील त्यातून काकुंच्या इच्छेनुसार फार्म हाऊस घ्या.

९० +२० = ११०. तरीही ४० लाख राहतील - ते डिविडंट येईल अशा एमेफ, डीबेंचर्स मधे टाकलेत तर महिना ३०-३५ हजार असेच मिळू शकतील.
जर २ बेडरूम चे घर घेतलेत तरी २० एक हजार भाडे येऊन, अजून पैसे एमेफ, डीबेंचर्स मधून मिळवू शकाल.

रहात्या घराकरता हा पर्याय नाही.
पण पडून राहिलेल्या घराला १.५ कोटी ला २४ हजार रिटर्न्स हा घाट्याचा व्यवहार आहे.

मुक्त विहारि's picture

11 Mar 2021 - 4:43 pm | मुक्त विहारि

पण,

मुळात, शेती ही दोघांनी करायची गोष्ट आहे...

https://misalpav.com/node/36564

ह्या लेखांत मी, 3 नंबरला, हेच सांगीतले आहे...

सुबोध खरे's picture

11 Mar 2021 - 7:11 pm | सुबोध खरे

पडून राहिलेल्या घराला १.५ कोटी ला २४ हजार रिटर्न्स हा घाट्याचा व्यवहार आहे.

यात आपण फक्त व्याजाचा/ भाड्याचा हिशेब धरला आहे.

जर हीच जागा ७ वर्षांनी ३ कोटी रुपयाची झाली तर तो भांडवली नफा सुद्धा व्यवहारात धरावा लागतो.

केवळ एकच भाग गृहीत धरणे चूक ठरेल

त्यांची दुसरी " रियल ईस्टेट" प्रोपर्टी रहाणार आहे, जीच्यात समांतर वाढ होईल. + फार्म हाऊसही आहे. (+ रहाते घर)
+ जर डिविडंट नको असेल तर एमएफ अधिक परतावा देऊ शकतात.

ते ५८ वर्षांचे आहेत. पेंशन आहे, जबाबदारी नाही..

१५ वर्षाने काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा आहे तो दिवस त्यांना मनाप्रमाणे जगता येईल ह्या पद्धतीन!

शाम भागवत's picture

6 Mar 2021 - 3:24 pm | शाम भागवत

उतार वयात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. (मला तुमचे निश्चित वय माहीत नाही)

तुमच्याकडे असलेले २० लाख गेल्यामुळे किंवा त्यावर मिळणार्‍या उत्पनावर पाणी सोडल्यामुळे तुमच्या राहणीमानात कोणतीही उलथापालथ होणार नसेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही.

निवृत्तीवेतनाशिवाय मिळणार्‍या उत्पनातून कर्जहप्ता सहज फेडता येईल इतकेच कर्ज घ्यावे. कारण आपण किती जगणार के आपल्यालाच माहित नसते. अन्यथा आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला त्रास होऊ शकतो.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2021 - 4:08 pm | प्रकाश घाटपांडे

मी आता निवृत्ती तथा ५८ वयाचा आहे. पण मी २००७ मधेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मुख्य मुद्दा हा आहे की आता हे २० लाख सोने, एफडी , नातेवाईकांकडून घेउन अशा प्रकारे उभे करावेत का? मला यात शुन्य रस साहे. किंवा मग ज्या घरापासून भाड्याचे उत्पन्न मिळते ते घर विकणे हा पर्याय राहतो

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 4:14 pm | मुक्त विहारि

काही गरज नाही

टर्मीनेटर's picture

6 Mar 2021 - 4:26 pm | टर्मीनेटर

मुख्य मुद्दा हा आहे की आता हे २० लाख सोने, एफडी , नातेवाईकांकडून घेउन अशा प्रकारे उभे करावेत का?

असे अजीबात करू नका असे माझे वैयक्तीक मत! परंतु हाती उपलब्ध असलेल्या रकमेतुन वर राजेश भाऊंनी म्हंटल्याप्रमाणे १० कींवा ५ गुंठे जमीन घेता येणे शक्य असल्यास तसा विचार नक्की करा. स्थावर मालमत्ताही होईल आणी हौस (काकुंची) पण पुर्ण होईल!

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 6:28 pm | मुक्त विहारि

जितक्या सहजतेने फ्लॅट विकल्या जातात, तितक्या सहजतेने, जागा विकली जात नाही...

त्यापेक्षा, सोने, हिरे लगेच विकल्या जाते...

जागेचे असे आहे ना... पहिली पिढी लागवड, दुसरी पिढी उपभोग आणि तिसरी पिढी विकून टाकते...

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2021 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे

बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.म्हणजे इनकम टॅक्स पेयर व्यावसायिक आहे. त्यामुळे अनेक संधी सतत खुणावत असतात. हौसे ला मोल नसले तरी कॉस्ट आहे व ती सोने मोडून, पीपीएफ काढून, एफडी मोडून, नातेवाईकांकडून उसने घेउन मोजावी का? हा कळीचा प्रश्न आहे.
तू सूर्यास्तांपर्यंत जेवढे चालशील तेवढी तुझी जमीन ही बोध कथा आठवते.

कानडाऊ योगेशु's picture

7 Mar 2021 - 3:02 pm | कानडाऊ योगेशु

बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.

ह्याचा अर्थ जागा घेण्याचा हा जो काही निर्णय आहे तो घाटपांडे काकुंच्या अखत्यारीतला आहे. जर तुम्हाला काकुंच्या निर्णयक्षमतेवर विश्वास असेल तर त्यांना निर्णय घेऊ द्यावा असे म्हणेन. कदाचित काकुंचीही तिच अपेक्षा असेल. कॅलक्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2021 - 4:15 pm | प्रकाश घाटपांडे

आमची पीपीएफ,एफडी, कौटुंबिक सोने अशी सुरक्षित व आपत्कालीन गुंतवणूक मोडून उत्साहाच्या भरात शेतजमीन घेणे हे तारतम्य गमावण्याचे लक्षण आहे असे मला वाटते. कुठल्याही भावनातिरेक हा तारतम्य गमावण्यास कारणीभुत ठरतो. मनोविकारांचा मागोवा- ले. डॉ श्रीकांत जोशी हे पुस्तक जरुर वाचावे.

त्या मालिका बघतात का?

सामान्यतः, टीव्ही वरील बातम्या आणि मालिका, बघणारी माणसे, आत्मकेन्द्रित, चिडखोर आणि भावनेच्या भरात निर्णय घेतात,
हे माझे निरीक्षण आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2021 - 3:29 pm | प्रकाश घाटपांडे

पण रिअल इस्टेट मधील वास्तव जग पहाते

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2021 - 1:21 pm | चौथा कोनाडा


बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.म्हणजे इनकम टॅक्स पेयर व्यावसायिक आहे.


कर्तुत्ववान महिला !
घाटपांडे काकुंना आंतरराष्ट्रिय महिलादिनाच्या विशेष हार्दिक शुभेच्छा !

कानडाऊ योगेशु's picture

6 Mar 2021 - 8:07 pm | कानडाऊ योगेशु

घाटपांडे काका आता पर्यंत तुम्ही तुमचे आयुष्य कसे व्यतित केले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा!
आयुष्याच्या उत्तरार्धात उगाच अमिताबच्चन बनण्याची गरज नाही असे वाटते.
बाकी तुम्हला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2021 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे

माझ्या अल्पसंतुष्टत्व मुळे,कमीत कमी रिस्क घेण्याची प्रवृत्ती मुळेच कुटुंबात या समस्या निर्माण झाल्या आहेत. वर्कहोलिक, कर्तुत्ववान, धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द असलेल्या लोकांना माझे जगण्याचे तत्वज्ञान हे डिप्रेसिव्ह वाटते. ये जीना भी कोई जीना है! इससे अच्छा मरना है टाईप. वर लिहिले आहेच

मराठी_माणूस's picture

7 Mar 2021 - 10:10 am | मराठी_माणूस

इतका प्रांजलपणा खुप कौतुकास्पद

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Mar 2021 - 10:07 am | अनिरुद्ध.वैद्य

रिस्क ला मॅनेज करता आले तर उत्तम ! किंबहुना रिस्क टाळणे हा ही रिस्क मॅनेजमेंटचा भाग आहेच.

वर्कहोलिक, कर्तुत्ववान, धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द
>>

ह्यातल्या रिस्क मॅनेज करुन जरुर करावे, पण टैम म्हत्वाचा! आपल्या वयात अश्या रिस्क टाळणेच उत्तम.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2021 - 12:06 am | श्रीगुरुजी

मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला, फारशी जोखीम न घेणारा आहे. आयुष्यात जी काही थोडीफार जोखीम घेतली ती विचारपूर्वक (calculated risk) घेतलेली जोखीम होती. अत्यल्प परतावा असलेल्या गोष्टीसाठी भरमसाट किंमत मोजणे मला मान्य नाही. नाव मोठं लक्षण खोटं अशी कीर्ति असलेल्या वस्तू, उपहारगृहे इ. कितीही नामवंत असली तरी मी ती टाळतो कारण नावाच्या बडेजावापेक्षा त्याची उपयुक्तता मी जास्त महत्त्वाची मानतो. अर्थात काही अपवादात्मक गोष्टींसाठी कितीही खर्च करण्याची माझी तयारी आहे व करतो. मी भविष्यासाठी पुरेशी तरतूद करूनच खूप लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2021 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे

श्रीगुरुजी माझ्यासारखेच तुम्ही दिसता

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2021 - 12:10 am | श्रीगुरुजी

मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला, फारशी जोखीम न घेणारा आहे. आयुष्यात जी काही थोडीफार जोखीम घेतली ती विचारपूर्वक (calculated risk) घेतलेली जोखीम होती. अत्यल्प परतावा असलेल्या गोष्टीसाठी भरमसाट किंमत मोजणे मला मान्य नाही. नाव मोठं लक्षण खोटं अशी कीर्ति असलेल्या वस्तू, उपहारगृहे इ. कितीही नामवंत असली तरी मी ती टाळतो कारण नावाच्या बडेजावापेक्षा त्याची उपयुक्तता मी जास्त महत्त्वाची मानतो. अर्थात काही अपवादात्मक गोष्टींसाठी कितीही खर्च करण्याची माझी तयारी आहे व करतो. मी भविष्यासाठी पुरेशी तरतूद करूनच खूप लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2021 - 12:37 pm | प्रकाश घाटपांडे

शाम भागवत, मला हा प्रश्न केवळ आर्थिक व्यवस्थापनाचा वाटत नसून तो मानसिक व्यवथापनाचा देखील आहे असे वाटते. किंबहूना तो त्याचा अधिक आहे असे वाटते.

शाम भागवत's picture

11 Mar 2021 - 5:24 pm | शाम भागवत

तुम्ही मानसिक व्यवस्थापनाबद्दल बोलताय म्हणून लिहितोय.

"अमूक अमूक" अशी स्थिती असेल तरच मी सुखी, अन्यथा मी दु:खी अशी एक अट आपण स्वत:च स्वत:ला घालून घेतो. त्यातून मग हवे नको सुरू होते. मग मात्र आपले समाधान टिकणे न टिकणे हे परिस्थितीवर अवलंबून राहाते. शिवाय परिस्थिती सतत बदलत असते व तिच्यावर १००% टक्के नियंत्रण मिळवणे कोणालाच शक्य नसते.

अगदी वेगळ्या पध्दतीने बोलायचे झाल्यास,
"माझी बायको धडपड करते आहे. तिच्या पाठीमागे मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहीन. त्यातूनच मला आनंद मिळेल." अशी एखाद्याने स्वत:ला अट घालून घेतली असेल तर तो कितीही कष्ट झाले तरी बायकोला पाठींबा देईल आणि सुखी व समाधानी राहील. 😀

मला वाटते आपले समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकणे महत्वाचे. त्यासाठी कोणत्याही अटी नसल्या पाहिजेत. तो माणूस निर्भय असतो. सुखी व आनंदी असतो.
असो.
🙏

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2021 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

पहिला परिच्छेद व दुसरा यात मला विसंगती दिसते.
इथे आनंदाच्या कल्पनेत व्यावहारिक गोष्ट आलेली आहे. जवळपास ९० टक्के गुंतवणूक ही रिअल इस्टेट मधे आत्ताच आहे. १० टक्के फक्त एफडी पीपीएफ सोने अशा स्वरुपात आहे.
दुसरा मुद्दा येतो जगण्याचे तत्वज्ञान. आपापल्या जगण्याचे तत्वज्ञान अंगीकारायची मुभा असती तर गोष्ट वेगळी आहे. नाहीतरी तू अल्पसंतुष्टी आहेस तर तुला मिळणारे पेन्शन बास झाले बाकीच तुला काय करायचे आहे? असा मुद्दा उपस्थित होतो आहे तार्किक म्हणून तो योग्यही आहे.

Rajesh188's picture

6 Mar 2021 - 4:29 pm | Rajesh188

राहण्याचे ठिकाण आणि शेत जामीन ह्या मध्ये जास्तीतजास्त २ km वर अंतर नसावे.शक्यतो घराच्या जितक्या जवळ तितके चांगले.
लांब असलेल्या जमिनी वर लक्ष ठेवता येत नाही.आणि कोणी बघायला नाही असे लक्षात आले की चोरी किंवा बाकी नुकसान लोक करतात..
तिथे वेल्हे मध्ये तर तुम्ही जावून राहणार नाहीं ना.
मग नकोच तो उपत्याप.

Rajesh188's picture

7 Mar 2021 - 5:08 pm | Rajesh188

तुमचे ते कमलिनी कुटीर हे खरीव गावात आहे.
गावची लोकसंख्या फक्त २९२ आहे आणि फक्त ५८ कुटंब आहेत.
बस स्टँड खासगी आणि सरकारी दहा किलो मीटर वर आहे.
जवळ पास कोणतेच महत्वाचे पर्यटन स्थळ नाही.
गाव बहुतेक डोंगरात असावे पुण्या पासून५३ km वर आहे.
Zp ची शाळा सोडली तर गावात दुसरी कोणती च सुविधा नाही.
जमिनीच्या सिंचनासाठी पाण्या ची व्यवस्था नाही.
चांगली कनेक्टिव्हिटी नाह.
सिंचन व्यवस्था आणि उत्तम कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे शेती करणे महा मुश्किल आहे.
कमलीनी कुटीर सारखा उद्योग चालू करण्याचे स्वप्न असावे .
बाकी मी आता माझे ठाम मत सांगतो पैसे पडलेले असतील तरी त्या गावात गुंतवणूक करू नये..
त्या पेक्षा सासवड किंवा पुण्या शेजारी अनेक उत्तम गाव आहेत तिथे शेती बघावी.

सुबोध खरे's picture

10 Mar 2021 - 9:59 am | सुबोध खरे

हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे

आपली भीती अतिशय रास्त आहे

शेतजमीन भागीदारीने घेणे हि फार मोठी चूक ठरेल. कारण भागीदारीतील करार करणे त्यावर अंमल बजावणी करणे आणि उद्या आपली प्रकृती बिघड्ली तर त्याची उस्तवारी कोण करणार. त्यातून एखादा भागीदार डांबरट निघाला तर सुखाचा जीव दुःखात घालणे होईल.

मुळात अशा जमिनीत असंख्य हिस्सेदार असतात आणि ते काही काळाने उगवतात आणि खटले भरतात. प्रलंबित खटल्यात सर्वात जास्त कज्जे हे जमिनी संदर्भात आहेत हे लक्षात घ्या.

नातेवाइकांच्यात तर भागीदारी कधीच करू नये. कारण अवघड जागी दुखणं असतं.

आपल्याला लोक/ बायको घाबरट पळपुटा म्हणाले तरी चालेल पण हे विकतचं दुखणं अजिबात घेऊ नका.

आपल्या पत्नीला कोणीतरी शेंडी लावत आहे अशी शक्यता आहे, त्याचा शोध घ्या आणि मुळाशीच घाव घाला.

बायकोला २० लाख रुप्याच्या व्याजात ( ६% दराने १० हजार रुपये महिना) दर महिन्याला एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जाणे अगदी सहज परवडेल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Mar 2021 - 10:08 am | अनिरुद्ध.वैद्य

.

सौंदाळा's picture

25 Feb 2021 - 12:48 pm | सौंदाळा

मुविकाका आता ५ वर्षे झाली.
एक धागा शेतीबद्दलच्या अनुभवांचा पण येऊ देत. आनंद्/कष्ट, नफा/नुकसान, खरेदी/विक्री वगैरे सगळेच

मुक्त विहारि's picture

26 Feb 2021 - 12:13 pm | मुक्त विहारि

चांगले आणि वाईट, दोन्ही अनुभव आले आहेत

कंजूस's picture

25 Feb 2021 - 1:57 pm | कंजूस

विकणे सहकाराशिवाय अशक्य.

मुक्त विहारि's picture

26 Feb 2021 - 12:13 pm | मुक्त विहारि

आता सांघीक विक्री शिवाय पर्याय नाही...

अमर विश्वास's picture

26 Feb 2021 - 5:43 pm | अमर विश्वास

वरती काही प्रतिक्रिया बघितल्या ....
फार्म हाऊस पेक्षा पैसे FD त टाकावे वगैरे वगैरे ...

स्वतःचे फार्म हाऊस असणे हा आनंदाचा भाग असतो .... मी तो मुक्तपणे अनुभवाला आहे ...
मित्रांबरोबर FD certificate बघत बसायचे का ?

ज्याला शक्य आहे त्याने जरूर फार्महाउस घ्यावे ... अर्थात त्यासाठी आर्थिक तसेच मानसिक ताकद लागते

बाकी काय लिहू ...

अंगी नाही बळ दारी नाही आड .... त्याने फुलझाडं लावू नये

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2021 - 7:55 pm | कानडाऊ योगेशु

वाचलेल्या पैशातुन मित्रांसोबत एखादी बँकॉक ट्रीप करता येईल कि? (ह.घ्या)

अमर विश्वास's picture

26 Feb 2021 - 10:33 pm | अमर विश्वास

कमावलेल्या पैशातून नक्कीच करता येईल :P

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Feb 2021 - 8:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

कृपया प्रतिसाद नीट वाचा. फार्म हाउस घेउ नये असे म्हटलेले नाही. तुम्ही उपभोग घेणार असाल तर जरुर विकत घ्या, नपेक्षा डेड इन्वेस्ट्मेंट होईल हा मुद्दा आहे.

अमर विश्वास's picture

26 Feb 2021 - 10:39 pm | अमर विश्वास

पानशेतला फार्महाउस होते .... १५ लाखाला घेतले ... सात वर्ष भरपूर आनंद घेतला आणि ३० ला विकले ...
सात वर्षात दामदुप्पट ... FD पण देत नाही

योग्य ठिकाणी घेतलेले फार्महाउस ही पण एक इनेव्हस्टमेन्ट आहे ... नीट प्लॅन करा नक्की फायदा होईल

मुक्त विहारि's picture

26 Feb 2021 - 10:44 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

50,000 चे 50,00,000 ते पण 15-20 वर्षांत फक्त, शेतजमीनच देऊ शकते

हौसेला मोल नाही.आवड असेल तर व्यक्ती पैसे किती लागतील,फायदा होईल की नुकसान असला किरकोळ विचार करत नाही.
नाही तर कर्ज काढून कार घेणारे पेट्रोल चे दर वाढले म्हणून कार चा वापरच करत नाहीत.
आणि जे खरोखर हौसी आहेत ते असला हिशोब करत बसत नाहीत.
लग्नाची हौस आहे तर बायको वर किती पैसे खर्च होतील असा विचार करणाऱ्या लोकांनी ह्या भानगडीत पडूच नये.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Mar 2021 - 1:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

नीट उपभोग घेणार असाल तर त्या गोष्टीत हात घालावा--लग्न ही सुद्धा एक गुंतवणुकच आहे, आणि ती डोके जागेवर ठेवुन करावी आणि निभावावी लागते.

अमर विश्वास's picture

6 Mar 2021 - 6:09 pm | अमर विश्वास

हौस ही जास्तीच्या पैशांमधून करायची असते ...

जास्तीचा पैसा म्हणजे काय ?

१. रोजच्या खर्चाची सोय
२. liabilities कव्हर करायला लागणारा पैसा (यातच ऍसेट बनवण्यासाठी लागणारा पैसा पण आला )
३. आपत्कालीन निधी

ह्या तीन गोष्टी साध्य झाल्या कि उरलेला पैसा हा हौसेसाठी वापरायचा ...

तेंव्हा अशी किती रक्कम खरेच खर्च करू शकता ते बघा आणि शक्य असेल तर बिनधास्त पुढे जा ...

अनेकदा पुढील आयुष्याची तरतूद करायच्या नादात आज जगायचे राहून जाते ...

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2021 - 6:09 pm | श्रीगुरुजी

आमच्या खापरपणजोबा/पणजोबा/आजोबांची काही एकर जमीन होती म्हणे. १९४८ नंतर कुळाने ती धाक दाखवून बळकावली. परंतु सातबारा उताऱ्यावर आजोबांचे व त्यांच्या एका चुलतभावाचेच नाव होते. कालांतराने तिथे साखर कारखान्याची योजना येऊन आमची जमीन साखर कारखान्यासाठी राखीव झाली. साखर कारखान्याने जमिनीचे मूळ मालक शोधून त्यांना सभासद करून घेतले. त्यामुळे वडील व त्यांच्या चुलतभावाचे कुटुंब कागदोपत्री सभासद झाले. अनेक वर्षे कारखाना उभाच राहिला नाही. त्यामुळे शेवटी कारखान्यासाठी राखून ठेवलेली जमीन मूळ मालकांना परत दिली.

तोपर्यंत आमची अनेक चुलत घराणी वाढली होती. एकूण ७-८ वारस होते. त्यातील प्रत्येकाला १ ते ३ एकर जमीन मिळाली. काही वर्षांपूर्वी जमिनीवर नाव लावून घेण्यासाठी सर्व वारस प्रयत्न करीत असताना मी वडीलांना त्यात न पडण्याचा सल्ला दिला.

एक तर ती जमीन पुण्यापासून किमान १०० किमी दूर असलेल्या गावात आहे. वडील निवृत्त व काही आजार होते. जमिनीसाठी सतत तिथे जाणे खूप दगदगीचे होईल. ती जमीन अनेक दशके पडिक असल्याने लागवडीयोग्य नाही. मागील ३ पिढ्यांनी शहरात वास्तव्य केल्याने शेतीची शून्य माहिती आहे. वडिलांना निवृत्तीवेतन असल्याने पैशाची आवश्यकता नाही. नियमानुसार किमान १० वर्षे जमीन विकता येणार नाही. त्या ३ एकर जमिनीची किंंमत फारशी नसेल. परंतु जमीन मिळविणे व नंतर ती सांभाळणे यात प्रचंड दगदग आहे आणि आर्थिकदृष्ट्या त्याची गरज अजिबात नाही, हे वडिलांना पटले. जमिनीवर दावा करायलाच नको, म्हणजे पुढचे ताप होणार नाहीत हे सुद्धा पटले. परंतु इतर वारसांच्या प्रचंड आग्रहामुळे त्या गावात अनेक फेऱ्या मारून शेवटी जमीन मिळाली.

नंतर एक स्थानिक माणूस घरी आला. मी तुमची जमीन कसतो, दरवर्षी ठराविक उत्पन्न, धान्य वगैरे देईन असे आमिष दाखविले. ती जमीन पडिकच राहू दे असे मी वडिलांना सुचविले. परंतु भावाने त्या प्रस्तावात रस दाखविला. मी शहाणपण दाखवून मला त्या जमिनीत अजिबात रस नाही हे सांगून टाकले.

जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे अशा कारणांंखाली त्या माणसाने सर्वांकडून बरेच पैसे उकळले. दर महिन्यातून एकदा भाऊ त्या गावाला चक्कर मारतो. मागील ५-६ वर्षात भावाने त्या जमिनीत भरपूर पैसे घालविलेत, पण एक रूपया सुद्धा परत मिळालेला नाही.

जे शहरात राहतात व भविष्यात शहरातच राहणार आहेत त्यांनी गावाकडील शेती, फार्म हाऊस वगैरे भानगडीत पडून पैसे अडकवू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे.

ही कामे, जमीन भाड्याने घेणार्याने करायची असतात...

फक्त पक्की भिंत बांधण्याचा खर्च, मालकाने करायचा असतो.....

जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे.....

ह्याच साठी, किमान 25-30 वर्षांचा करार करायचा असतो ...

सध्या एके ठिकाणी, अशीच भाड्याने शेती करण्याचा विचार करत आहे...कायदेशीर बाबी आणि आर्थिक बाबतीत, मी आणि जमिनीचे मालक, ह्यात चर्चा सुरू आहे...

मी 99 वर्षांचा करार करायचा प्रयत्न करत आहे... कारण, जितका करार लांबेल तितका दोघांचाही फायदा होईल...

आमच्या भागात दोन तीन वर्षाच्या वर कोणी शेती कसायला देत नाही.आणि कधी शेता मधून बाहेर काढण्याचा हक्क मालक राखून ठेवतो.
तुम्हाला ३५ वर्ष भाड्याने शेती देणारा माणूस मिळाला आहे.
वाचावे ते नवल च.

वाळवंट ते बर्फ, सगळे नमुने भेटतात...

कधी शेता मधून बाहेर काढण्याचा हक्क मालक राखून ठेवतो..

ते पण आहेच, म्हणून तर, Long term agreement, करायचे असते...

शेती ही लग्नासारखी गोष्ट आहे, जितकी जास्त दिवस टिकेल तितकी फळत जाते...

दोन घडीच्या डावात, कुणालाच Long term benifits मिळत नाहीत...

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Mar 2021 - 11:04 am | राजेंद्र मेहेंदळे

मुविकाका
मला टेरेस फार्मिंग बद्दल काही माहिती हवी आहे. तुम्हाला व्य् नि करतो. कृपया मार्ग दर्शन करावे.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 11:51 am | मुक्त विहारि

कुठे राहतोस?

पुणे की नाशिक?

दोन्ही ठिकाणी, आपलेच मिपाकर मदत करतात...

त्याची काही करणे देत आहे
१), बाजारात कोणी किती दावे केले तरी शुद्ध बी वापरून बिलकुल रासायनिक खत ,कीटक नाशक न वापरता अतिशय उत्तम दर्जा चे अन्न धान्य उपलब्ध नाही.
२) आपण व्यवहारीक विचार न करता(health is wealth) स्वतःच्या शेत जमिनीत आपल्याला जसे शुध्द अन्न धान्य हवं तसे उत्पादन घेवू शकतं
३) पैसे कमविणे शेती मधून हा हेतू ठेवून नाही करायचं
४) शेती मधून लाखो रुपये कमविणे खूप लोक आहेत (सर्व शेतकरी गरीब हे विसरा)पण त्या साठी आवड आणि कष्ट करण्याची तयारी हवी.
घरात एसी मध्ये. बसून ते शक्य नाही.
५) शहरात ठरवून पद्धती चे जीवन जगणाऱ्या लोकांनी त्या नादाला लागू नये.
नी स्वतः कोणता ही हिशोब न ठेवता वर्ष भर पुरेल एवढे ज्वारी,बाजरी,शेंगदाणे,हरभरा, मूग,उडीद,चवळी,घेवडा, मिरची,भात अगदी नैसर्गिक रित्या पिकवतो आणि तेच वापरतो .
जीवन जगण्यासाठी आर्थिक गरज नोकरी आणि व्यवसाय मधून भागवली जाते.
शेती फक्त आरोग्य वर्धक आहार साठी.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 4:39 pm | मुक्त विहारि

योग्य मुद्दे

प्रकाश घाटपांडे's picture

12 Dec 2021 - 3:34 pm | प्रकाश घाटपांडे

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित

शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं.

एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव!

संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे

https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 4:51 pm | मुक्त विहारि

शेती कशासाठी करत आहात?

हे जाणून घेतले की त्रास कमी होतो

आग्या१९९०'s picture

12 Dec 2021 - 11:03 pm | आग्या१९९०

करेक्ट

प्रसाद गोडबोले's picture

12 Dec 2021 - 11:56 pm | प्रसाद गोडबोले

शेती कशासाठी करत आहात? हे जाणून घेतले की त्रास कमी होतो

अगदी १००% सत्य !
मुळात पोटापाण्यासाठी शेती करावी , तेही शहरातील मस्त ए.सी. मध्ये खाऊन पिऊन सुखी दर महिन्याला सॅलरी देणारी नोकरी सोडून करावी हे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे ! आमच्या सातार्‍यात एक म्हण आहे - अती शिक्षण भिकेचे लक्षण ! =))))

मुळात गावाकडे जाऊन दोन वेळच्या मीठभाकरीची चिंता करावी लागत असेल तर त्यापेक्षा शहरात बसुन, मोबाईल वर ऑर्डर देऊन, क्रेडिट कार्ड ने बिल भरुन, पिझ्झा बर्गरची ऑर्डर अजुन कशी आली नाही ह्याची चिंता करणे खुप सोप्पे आहे !

गावाकडे जायची इच्छा आहे पण तिथे गेल्यावर काहीही ... अक्षरशः का ही ही करायची ईच्छा नाहीये , बस्स नुसते पडून रहाणे ... मीठभाकरीची चिंता नाही की डोक्यावर छपराची चिंता नाही ... देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढभावो || असे काहीसे व्हायला हवे !

अर्थात त्यासाठी आधी शहरात राहुन पैशाची शेती करु गच्चम. कॉर्पोरेट पॉलिटिक्स् पाहुन, जातीय , विशेशः ब्राह्मणद्वेषाने भरलेले राजकारण पाहुन , कलेक्टर ऑफिस पासुन ते कोपर्‍याकोपर्‍यावरील आर.टी. ओ मध्ये भिनलेला भ्रष्टाचार पाहुन , शहरातील लोकांची स्वार्थी वृत्ती, अगदी भडजीपासुन ते भिकार्‍यापर्यंत , कामवाल्या बाई पासुन ते अगदी कोडर पर्यंत, सर्वांचीच स्वार्थी वृत्ती, विनाकारण चाललेला निरर्थक सव्यापसव्य पाहिला की उबग येतो, सगळं सोडून जावेसे वाटते, कोठेतरी एकांतात बसुन तुकोबांच्या सारखे नामस्मरणात तल्लीन होऊन जावेसे वाटते , अन नेमके तेव्हाच शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेलया पत्रातील काही वाक्ये आठवतात अन धीर धरुन आहे हे रुटीन चालु ठेवतो - "हे कार्य करावयाचे दिवस हायेती . वैराग्य तो उत्तरवयीं कराल तो थोडे. आज पराक्रम करुन आम्हांस तमासे दाखविणे !"

असो. तात्पर्य इतकेच की योग येईल तेव्हा गावाकडे जाईन हे निश्चित पण शेती बिती ची भानगड नाही हे ही काळ्या दगडावरची रेघ !

Bhakti's picture

13 Dec 2021 - 8:54 am | Bhakti

कोठेतरी एकांतात बसुन तुकोबांच्या सारखे नामस्मरणात तल्लीन होऊन जावेसे वाटते , अन नेमके तेव्हाच शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेलया पत्रातील काही वाक्ये आठवतात अन धीर धरुन आहे हे रुटीन चालु ठेवतो - "हे कार्य करावयाचे दिवस हायेती . वैराग्य तो उत्तरवयीं कराल तो थोडे. आज पराक्रम करुन आम्हांस तमासे दाखविणे !"
सहमत!
एकदा धोंडा पाडून घेतलेली भक्ती!

शेती पहावी करुन - श्रीनिवास पंडित हा मूळ लेख अनुभव मासिकातील आहे. तो समकालीन प्रकाशन चा. हे ऐकण्यासाठी स्नोवेल ऎप डाउनलोड करुन घ्यावे लागेल व त्याचे सदस्य व्हावे लागेल. पण स्नोवेल वर चांगली ऑडिओ बुक्स आहेत हा श्राव्य स्वरुपातील लेख मला आवडला. त्यात वेगवेगळे दृष्टीकोन घेतले आहेत.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 6:54 pm | मुक्त विहारि

आर्थिक, वेळ आणि कष्ट , वाया गेले तरी चालतील, ही मानसिक जडणघडण असेल तर आणि तरच, शेती हा पुर्णवेळ व्यवसाय म्हणून निवडला पाहिजे

प्रकाश घाटपांडे's picture

13 Dec 2021 - 7:14 pm | प्रकाश घाटपांडे

पंडितांचा लेख वाचलात / ऐकलात का?

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 7:17 pm | मुक्त विहारि

कारण, मला काय करायचे आहे? हे मला माहिती आहे ...

शिवाय, आता खूप काही माहिती नको आहे...

मी बरा आणि माझी हळद बरी

प्रकाश घाटपांडे's picture

14 Dec 2021 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

मी त्या दृष्टीने म्हणत नाही. मला फक्त तुम्ही प्रतिक्रिया ही लेख वाचून/ ऐकून दिली आहे का हे जाणुन घ्यायचे होते बाकी काही नाही.