ठिपके
काव्यरस
शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,
पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
जरा थांबूया
मग बोलूया,
चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.
वाचने
6182
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
राजगडावरच्या मुक्कामी असा अनुभव बर्याच वेळा घेतला आहे.
पण तो शब्दात व्यक्त करण्याची हातोटी केवळ तुमच्या कडेच आहे.
पैजारबुवा,
मस्त!
क्या बात!
वाह..
बाकिबाबू आठवले!
कुठे निघाले?
In reply to कुठेशी ? by कंजूस
अनंतयात्रेला निघालोय. येताय?
चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.
वाह..
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
उत्कृष्ट. वर उल्लेख आल्याप्रमाणे बोरकर आठवले.
क्या बात..