शाण्णवशुन्य अंकसंख्या परिमाण (मुळ पानाचे छायाचित्र टाकले आहे)
लेखनप्रकार
खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा.
१०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००
मी सांगू का? वरील संख्या आहे - दशअनंत.
तुम्ही म्हणाल मला कशी कळली?
मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की कोटी पर्यंत मोजल्यानंतर पुढे किती पर्यंत मोजता येईल? याचे उत्तर कित्येकजण खर्व, निखर्व, अमाप अशी नांवे सांगायचे. पण यांची स्थिती (म्हणजे एकं, दहं प्रमाणे) विचारल्यास मात्र ती कोणालाही सांगता यायची नाही. पुराणातल्या किंवा इतिहासातल्या कथांमध्ये "त्याच्याकडे अपार संपत्ती होती" असे उल्लेख वाचलेले आठवतात. पण अशा जर मोजदाद पुर्वी करता यायची तर त्यांची स्थानासहीत पुर्ण माहिती कुठेच का सापडत नाही ही उत्सुकता संपत नव्हती. असाच एकदा गावात फिरत असताना एक कागद रस्त्यावर सापडला आणी त्यात ही सर्व माहिती सापडली. ती तुमच्या करीता या ब्लॉगच्या माध्यमातून आणली आहे.
प्रचलित इंग्रजी किंवा मराठी (की देवनागरी) पध्दतीनुसार अब्ज या संख्येपेक्षा जास्त मोजदाद करणारे एकक हवे असेल तर ते जोडून वापरावे लागते, म्हणजे ४००० कोटी (चार हजार कोटी) आणी इंग्रजीत मिलियन, बिलियन आहेतच की. पण जर अशी दोन किंवा जास्त एकके न जोडता मोजता येऊ शकणाऱ्या संपुर्ण एककांची यादी खाली आहे. ती काळजीपुर्वक नजरेखालून घाला. यातील काही एकके आपल्या कानांवरुन पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा यातून गेली असतील. पण त्यात काही तथ्यांश आहे असे मानले तर आपल्या पुर्वजांकडे नुसतीच संपत्ती नव्हती तर ती मोजता येऊ शकेल किंवा त्याची मोजदाद करता येउ शकेल अशी मोजणीची पध्दती व एककेही होती. हा वारसा जपायला हवा म्हणून माझा हे छोटा प्रयत्न आहे.
मुळात मी वर म्हटल्याप्रमाणे मला एका छोट्या पुस्तकातील पानावरील ही माहिती आहे. मी ह्या माहितीचे पुस्तक खुप शोधण्याचा प्रयत्न केला. कारण या पुस्तकात अजुनही बरीच रंजक माहिती असावी पण पुस्तकाचे नांव किंवा लेखकाचे नांव किंवा प्रकाशकाचे नांव काहीही मला मिळालेले नाही. कोणास माहिती असल्या अवश्य कळवा.
एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.
मोजा आणि इतरांनाही सांगा.

वाचने
11270
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
दुर्मिळ
व्वा.चांगल
माहिती आवडली !
चांगलि
खरोखर छान
In reply to खरोखर छान by पक्या
एकं
व्वा!
+१
खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद.
शाण्णव अंकसंख्या परिमाण
मिलिंद, तुम्हाला मिळालेले पान स्कॅन करुन इथे
In reply to मिलिंद, तुम्हाला मिळालेले पान स्कॅन करुन इथे by चतुरंग
मला मिळालेले पान स्कॅन
In reply to मला मिळालेले पान स्कॅन by मिलिंद
धन्यवाद मिलिंद!
In reply to धन्यवाद मिलिंद! by चतुरंग
मीपण असेच
कॉलेजमधे कँटीन च बील देताना
In reply to कॉलेजमधे कँटीन च बील देताना by एक
आडवा!!!
In reply to कॉलेजमधे कँटीन च बील देताना by एक
१० चा कितीवा घात
छान माहिति
खुपच
प्राचीन
वाचन खुण
रोचक
In reply to रोचक by सुनील
माहिती
काही आवडलेले..
अब्ज च्या
....ताल,
In reply to ....ताल, by विसोबा खेचर
आणि
मला आजच हे
:-)
copy -paste चालायचंच.
चांगलि माहिती...
छान लेख.
In reply to छान लेख. by पाषाणभेद
६-७वीत असताना चणेवाल्याकडून
छान अन