कॉम्रेड गोस्वामींचा शेवटचा पराक्रम.

डॅनी ओशन's picture
डॅनी ओशन in जनातलं, मनातलं
24 Jan 2021 - 11:48 am


कॉम्रेड गोस्वामींचा दुर्मिळ फोटो

“चे, अरे चे , कुठं तडमडतोयंस ?” अर्णब ओरडला.
“कुठे नाही पप्पा, इथेच आहे दिवाणखान्यात, दादूंचं पुस्तक बघत होतो.”
अर्णब ने टेबललॅम्प बंद केला, डोळे चोळले, आणि लॅप्टॉपची स्क्रिन आदळली.
सम्यब्रताने हळदीचे दूध ठेवलेले, त्याने उचलून घोट घोट घेत संपवून टाकले. घश्यासाठी चांगल असतं. हळद आणि थोडीशी साखर, दॅट्स द थिंग. हळूहळू ताणलेले स्नायू सैलावू लागले. रोज घसा दुखतो च्यामारी.
“चे, मला पण बघू कि, कुठलं पुस्तक आहे ?”
पॅसेज मधल्या दिव्याच्या सावलीत चे चं डोकं मोठं दिसत होतं. छोट्याश्या हातापायांवरचे भले थोरले डोके पाहून चे खुदकन हसला. अर्णब सुद्धा खळखळून हसला. (“हि सेड NDTV” वालं हास्य. त्यावेळेस का माहित का, खास परिवारासाठीचे हास्य साल्या बूर्झ्वा (Bourgeois) आडियन्सला ऐकायला मिळाले होते.)
चे आत आला. त्याच्या हातातले बाड बघून अर्णबच्या चेहेर्यावर्चे हसू रोडावले आणि त्याजागी एक गूढ्गंभीर स्मित आले.
“दास कॅपिटल व्हॉल्युम II ? चे महाशय, फारच लवकर सुरुवात केली तुम्ही !” अर्णब पुन्हा ‘हि सेड NDTV’ हसला.
“मी काय वाचलं नाही.” चे ने गंभीरपणे माहिती दिली. “मी फक्त यात्ल्या दाढीवाल्याचा फोटो बघत होतो.”
“छोटे गव्हेरा, अहो, डायरेक्ट इथून काय सुरुवात करताय ? चल, मी तुला मस्त पुस्तक देतो.”
कपाटात हवा तो बॉक्स सापड्ल्यावर हवे ते पुस्तक लगेच सापडले. रॉबिन हूड आणि त्याचे सवंगडी. लहानपणीच्या आठवणी अर्णबच्या मनात गर्दी करु लागल्या. पण चे आधीरपणे नाचत होता म्हणुन त्याने बालअर्णबलीला डोक्यातून काढुन टाकल्या.
“हे घे रे. एकदम बेष्ट पुस्तक आहे हे. मगाशी जे आजोबांचे पुस्तक होते ना, ते वाचायच्या आधी हे वाच. बघ चित्रं कशी छान आहेत ते...”
पिवळट जुनाट पाने उलटता उलटता त्याला टीनेजअर्णबची बरीच टिप्पणे दिसली. (“No man in merry England shall be my master” वर टीनेजअर्णबने मोठ्या मोठ्या अक्षरान्मध्ये “FCUK YEAAAAAAAAAAAAAAAAAH !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!” असे अर्धे पान भरुन खरडून ठेवले होते, ते सद्यअर्णबास इरिटेट झाले, पण त्या टिप्पणीमागच्या भावनांशी तो आजही सहमत होता.)

“ही गोष्ट किनै, रॉबिन हूड्ची आहे. तो शेरवूडच्या जंगलात राहात असतो. तो आणि त्याचे सवंगडी...”

इतक्यात त्याला दिवाणखान्यातून “द नेशन वॉन्ट्स टू नो” आणि सुपरिचीत संगीत ऐकू आले. अर्णब चमकला. “चे, तू वाच हं इथच बसून. मी आलोच.”
“सम्या, नको ना.”
दिवाणखान्याच्या चौकटीतून तो म्हणाला.
“चे समोर तरी नको.”
सम्यब्रताने हसू दाबल्यामुळे ओघळलेले अश्रू पुसले आणि टिव्ही म्यूट केला.
“सॉरी सॉरी.”
“ एव्हढं काय आवडतं तुला काय माहीत.”
“अरे, असतात सगळ्यांचे क्वर्क. तु नाहीस का अधुनमधुन अ‍ॅटलास श्रग्ड वाचत ? ते पण याच्याइतकच कचरापट्टी आहे. जास्तच !”
“…”
“नाही, मला नाविका कुमार वैगेरे पण आवडतात, पण यू आर दी बेस्ट. द वे यू कम अप विथ सच अटर नॉन्सेंस, जस्ट अमेझिंग. दॅट सुशांत सिंघ स्टफ इज,… ओह. मच वॉव.”
“...”
यावर नेहमी अर्णब नाटकीपणे मुजरा करुन कौतुक स्विकारत असे, पण आज तो काहीच बोलला नाही.
“ अरे काय झालं ?”
“इट्स टाईम. उद्या माझ्या मिशनचा शेवट आहे. उद्या माझ्या पोलिसांच्या कॉन्टॅक्ट तर्फे माझे चॅटस लिक करवणार, पार्थो सोबतचे.”
सम्यब्रता सरसावून बसली. “इतक्यातच ? मला वाटलेलं तिथपर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ आहे !”
अर्णब मंद हसला. “ हो, अजून बराच वेळ होता.”
“मग ? झालं काय ?”
अर्णब काही वेळ शांत राहीला.
मग म्हणाला,
“ लोकांसमोर आपल्या कल्पनेत येणारा सगळ्यात भयंकर पत्रकार एक हिरो म्हणुन तयार करायचा. त्या पत्रकाराला दुष्टतेची सीमा परतपरत गाठायला लावायची. इतर वेळेस गोंडस दिसणार्या राइट ऑथोरीटॅरीयंच्या मनकी बात अगदी भेसूरपणे समोर ठेवायची. आणि त्या भयंकर पत्रकाराकडून इतका चिखल पसरवायचा, की ही व्यवस्थेची मशिनरी पूर्ण तुटेल, आणि आपल्या स्वप्नातले रिव्होल्युशन आपल्यासमोर साकार होईल, असा आपला हेतू होता..
पण आपण लोकांच्या येडपटपणाला समीकरणात घेतले नाही.
सम्या, टिव्हीवरच्या अर्णबच्या मर्यादा मला आता समजून आल्यात. ज्यांना डोकी आहेत ते त्याच्याकडे तुझ्याच नजरेने पाहतात. चार घटका करमणूक ! फार्फार झाले तर ट्विटर वर दंगा करायला लावेल, पण रिव्होल्युशन पर्यंत घेउन जाण्याची ताकद नाही आहे त्याच्याकडे !” तो टिव्ही कडे बोट दाखवत ओरडला.
तिनं मूकपणे मान हलवली.
“आणि बिनडोक लोकं ! या टिव्हीवरच्या गाढवाच्या खिंकाळण्यात हे हळूहळू सूर मिसळत आहेत ! या टिव्हीवरच्या माकडाच्या कढईत हळूहळू शिजत आहेत ! ह्या टिव्हीवरच्या वायझेडचे चाळे बघून टाळ्या वाजवत आहेत ! या येडपटाचा भर टिव्हीवरचा शाब्दीक डायरीया झेलत आहेत !
हे थांबायला हवं. “
सम्यब्रता काही बोलली नाही.
“ असो. त्यांना आपल्या लाडक्या गाढवाचे पतन पाहू दे, कदाचित ते पुढच्या वेळेस आपले दैवत सांभाळून निवडतील. आणि खरं सांगायचं तर, मला विट आलाय. मी लाल यज्ञकुंडात बरंच वाहीलय. माझी सगळी ऊमेदीची वर्षं स्वतःचे स्वरयंत्र खराब करण्यात घालवली. स्वतःचे व्यक्तिमत्व दाबून लोकप्रिय पण मद्दड, कर्कश्श,येडच्याप, विखारी, xxxx, @@@@, %%%, **** असं व्यक्तिमत्व तयार करण्यात घालविली, सर्वात कडी म्हणजे साला दिवसातून चार पाच वेळा गुजराती कवितांची भाषांतरं करायला लागत होती. सरतशेवटी हाती लागलं शून्य.”
काही वेळ थांबून, थोडा विचार करुन, अर्णबने खांदे उडवले.
“हा, अगदीच शून्य असं नाही, पैसे तसे बरेच कमावले, नाही ?”
सम्यब्रता ने हुंकार दिला. “कुड हॅव्ह बीन बेटर.”
अर्णब ही सेड NDTV हसला. “दॅट्स आल्वेस द केस ! आह ! हे टिव्हीवरचं भुसनळं गाडायचं या विचारानेच शाळा संपली, सुट्टी सुरु झाली असं वाटत आहे ! चे, ये रे, तुला आजोबांच्या पुस्तकातल्या भारी गंमती वाचून दाखवतो ! सम्या, त्या टिव्हीवरच्या गरीबांच्या किंगकॉन्गचे तोंड पण नको दिसूदे. सरळ बिबिसी लाव. Good riddance to bad bullshit."

- डॅनी ओशन.

बालकथाबालगीतविडंबनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2021 - 1:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास ! आवडलं. अजून भर घालून दुसरा भाग येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

24 Jan 2021 - 7:55 pm | आग्या१९९०

सर्वात कडी म्हणजे साला दिवसातून चार पाच वेळा गुजराती कवितांची भाषांतरं करायला लागत होती.
कवितेच्या वरती विचारलेला प्रश्न ( कोणी ते विचारू नका ) त्याचेही भाषांतर करायचा का?

डॅनी ओशन's picture

31 Jan 2021 - 8:12 pm | डॅनी ओशन

धन्यवाद