WhatsApp च वापरणार की सिग्नल,टेलिग्रामवर जाणार?
WhatsApp ची नवीन पॉलिसी देत बसत नाही.कारण आतापर्यंत ती पाठ झाली असेल.काहीजणांना वाटतंय हे नवीन धोरण धोक्याचं आहे; काहीजण म्हणतायत आधीच नागवे झालो आहोत अजून काय नागवे करणार? वगैरे. याच अनुषंगाने आलेल्या दोन फेसबुक पोस्ट पहा.
------------------------------------------------
*#व्हॉट्सअपची_नवीन_पॉलिसी*
सोशल मीडिया जायंट असलेल्या व्हॉट्सअपने आपली नवीन टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करून करोडो वापरकर्त्यांना धक्का दिलाय. आम्ही सांगतो ते मान्य करा, अथवा अकाउंट डिलिट करू अशी गोड भाषेत धमकी दिल्याने वादळ उठले आहे. याशिवाय या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपला डेटा आता सुरक्षित असेल का अशी वापरकर्त्यांना चिंता वाटते आहे. कित्येकांनी व्हॉट्सअपला कायमचा राम राम ठोकून टेलिग्राम किंवा सिग्नल वर शिफ्ट होण्याची तयारी केली आहे. खरंच हे भीतीदायक चित्र आहे का? चला तर मग जाणून घेऊया…
*आधी आपण व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी नक्की काय आहे ते समजून घेऊ.*
आतापर्यंत आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो असा दावा करणाऱ्या व्हॉट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार वापरकर्त्यांचा डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करण्याचे ठरवले आहे. आता हा डेटा म्हणजे कोणता? तर आपले नाव, आपला नंबर, आपला डीपी, लोकेशन, आपले आर्थिक व्यवहार, एकमेकांना दिलेले पत्ते, शेअर केलेले व्हिडीओ, कॉन्टॅक्टस, आपली राजकीय मते, ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपची माहिती, त्या ग्रुपची मानसिकता, आपला आयपी एड्रेस… सगळंच!
*हा आपला पर्सनल डेटा मिळवून फेसबुक नक्की काय करणार?*
फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकत घेऊन या तिन्ही कंपन्यांना एकाच छताखाली आणलंय. या तिन्हीवरचा डेटा जमा करण्यासाठी डेटा सेंटर्स उभारली आहेत. या डेटाचा उपयोग टार्गेटेड ऍडव्हरटाइजिंग आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी केला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सअपवर कुणासोबत लॅपटॉपविषयी चर्चा कराल तर तुम्हाला फेसबुक लॅपटॉपच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करेल. व्हॉट्सअपने नुकतेच स्वतःचे UPI व्हॉट्सअप पेमेंट लाँच केले आहे. त्यावर होणाऱ्या व्यवहारावर सुद्धा बारीक नजर असेल.
जर तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक असाल तर निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला टारगेट करून प्रचार केला जाईल. अधिक विस्ताराने सांगायचं तर समजा मी 'अबक' पक्षाचा समर्थक आहे आणि माझ्या मतदारसंघातील 'अबक' पक्षाचा उमेदवार सोशल मीडियावर स्पॉन्सर्ड कॅम्पेन करत असेल तर फेसबुक त्याची जाहिरात आधी मला दाखवेल. मी त्याला सकारात्मक प्रतिसाद देईन. या माझ्यासारख्या अनेकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेदवाराची कॅम्पेन सफल होईल आणि फेसबुकलाही पैसा मिळेल. काही वेळा हे उलट पण होऊ शकतं. आपली राजकीय मते बदलण्यासाठी विरुद्ध बाजूच्या उमेदवाराच्या जाहिरातीचा भडिमार आपल्यावर केला जाऊ शकतो. जो पक्ष जास्त पैसा देईल, फेसबुक त्याचं! बरं, इथपर्यंत ठीक आहे, पण हा डेटा जर फेसबुक तिसऱ्याच कंपनीला विकत असेल तर ते जास्त भयानक असेल.
*व्हॉट्सअप साठी टेलिग्राम/सिग्नल हा पर्याय आहे?*
हे तर जास्त रिस्की असणार आहे. व्हॉट्सअपचा डेटा सध्या फक्त मालक कंपनी असणाऱ्या फेसबुककडे जातोय. पण टेलिग्राम हे ओपन सोर्स ऍप असल्याने यावरचा डेटा कुठेही जाऊ शकतो. त्याचा कुणीही गैरवापर करू शकतो. टेलिग्राम ही मुळात रशियन कंपनी होती. तिने आपले बस्तान नंतर बर्लिनला हलवले, नंतर व्हाया इंग्लंड ती आता दुबईला स्थित आहे. टेलिग्रामचे सर्व्हर्स सध्या दुबईमध्ये आहेत. आणखी एक पर्याय सिग्नल या ऍपचा सांगितला जातो. या ऍपची निर्मिती ऍक्टन नावाच्या व्यक्तीने केली आहे. हा ऍक्टन म्हणजे व्हॉट्सअपचा सहसंस्थापक. फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतले तेव्हा हा राजीनामा देऊन बाहेर पडला होता. सिग्नल हे ऍप तुलनेने अत्यंत नवखे असल्याने त्यांच्या पॉलिसी कश्या असतील ते आज सांगता येणार नाही. थोडक्यात, व्हॉट्सअप सोडून दुसरीकडे जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे आहे.
*मग आता करायचं तरी काय?*
लक्षात घ्या, सध्याच्या युगात प्रायव्हेट असं काहीही राहिलेलं नाही. तुम्ही ज्या ज्या साईटवर जाता तिथे तिथे तुमचा डेटा गोळा केला जातो. तुम्ही जे जे ऍप वापरता तिथेही तुमचा डेटा गोळा केला जातो. जस्ट डायल, इंडियामार्ट यासारख्या साईटवर रजिस्टर करताय? त्यावर रजिस्टर केलेल्या प्रत्येकाचा डेटा मार्केट मध्ये उपलब्ध आहे. नौकरी डॉट कॉम वर रिझ्युम अपलोड करताय? त्या प्रत्येक कॅण्डीडेटचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ट्रु कॉलर वापरत असाल तर तुमच्या नंबरसकट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाचा नंबरचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे सगळे लपून डेटा गोळा करतात आणि विकतात. फरक एवढाच की, व्हॉट्सअप हे राजरोसपणे सांगून करत आहे. शक्यतो आपली अत्यंत वैयक्तिक माहिती व्हॉट्सअप चॅट मध्ये देणे टाळावे हाच सध्या तरी एकमेव उपाय. जर फारच भीती वाटत असेल तर इंटरनेटचा वापर पूर्णपणे बंद करणे हा शेवटचा पर्याय!
*अनुप कुलकर्णी*
*सोशल मिडिया मॅनेजर*
*स्मार्ट मिडिया सोल्युशन्स*
*#अनुपानंद*
----------------------------------------------
जोक मारून झालाय तर आता शिरेसली लिहीते. हे लिहीण्याची माझी टेक्निकल पात्रता शून्य आहे पण गेली सात वर्षं युकेत काम केल्यामुळे Data Protection Act 1998 आणि GDPR सारख्या डोकेखाऊ कायद्यांविषयी जवळून माहिती मिळाली. आमची ॲाफशोर (म्हणजे युके आणि EEU बाहेर कुठलंही लोकेशन, अगदी अमेरीका सुध्धा) ॲाफिसेस ही या दोन कायद्यांचं पालन करणारी असणं आमच्यावर बंधनकारक होतं आणि आहे त्यामुळे याविषयी वाचन, चर्चा आणि ग्राऊंड लेव्हलला काम केलेलं आहे
आता तुला काय कळतं यातलं हा प्रश्न बाजुला काढल्यावर मुळ मुद्दा!
WA च्या नव्या डेटा पाॅलिसीचं भ्या वाटतंय? तर मग सांगते की या क्षणी तुमची अख्खी जन्मकुंडली, इतिहास, भूगोल हा इंटरनेट वर उपलब्ध आहे. डिप/डार्क वेबच्या अंधाऱ्या दुनियेत हा डेटा वाट पाहतोय ते कोणीतरी त्यावर बोली लावायची. हे डार्क वेब गुगल सर्चवर सापडत नाही. याला ॲक्सेस करायचे मार्ग वेगळे पण ते करायच्या भानगडीत पडू नका एवढंच सांगेन. पण आपण इतके गरीब आहोत की आपल्या डेटावर बोली लावायचे कष्ट कोणी घेत नाही
गेली आता भिती? सिंह दिसला की कुत्र्याची भिती कमी होते असं वाटलं म्हणून विचारतेय
या मानाने मार्कदादा झकरबर्ग तुमचा डाटा शिस्तीत, सांगुनसवरून घेऊन तो ‘स्टोर’ करताहेत. ह्यात आणि एका नाॅन एथिकल हॅकरने तो ‘हॅक’ करणं यात तेवढाच फरक आहे जेवढा करण जोहर आणि क्रिस्तोफर नोलन मधे आहे. झकरबर्ग काय करेल डेटाचं? तर तो तुम्हाला टारगेटेड ॲड्स दाखवेल म्हणजे काय तर तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही गोव्याला जायचा ग्रुप उघडला की तो गोवा टुरीजमच्या ॲड दाखवेल कारण त्या वायझेडला हे कुठं ठाऊक की तुम्ही नुसते प्लान करता, जात नै ते?
किंवा तो हो डेटा घेईल आणि इतर १०० मिलीयन लोकांबरोबर ॲड करेल आणि त्यातून एका ठरावीक डेमोग्राफिकचं राजकीय मत, गोष्टी विकण्या-विकत घेण्याचे पॅटर्न्स जमा करून मोठ्या कंपन्यांना विकेल. इसमे कंपनीयोंका घाटा, तेरा कुछ नही जाता
जेव्हा फेबु, गुगल सारख्या मोठ्या कंपन्या तुमचा डेटा जमा करतात तेव्हा त्या डेटाचं प्रोटेक्शन आणि सिक्युरीटीची मोठ्ठी जबाबदारी त्याच्यांवर असते आणि यासाठी त्यांची आयटी टिम दिवसरात्र कामही करत असते. हा डेटा एका एक्सेल शीट मधे मावणारा नसतो तर करोडो खर्च करून मोठ्या डेटासेंटर्समधे स्टोर असतो. ही हॅक होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात पण त्याची शक्यता कमी आहे. ह्याने मार्कभाऊ झकरबर्ग यांची रातोंकी नींद हराम व्हायला पाहिजे, तुमची नै. म्हणजे बघा. तुमचा पगार तुम्ही तुमच्या बेड खाली ठेवता का? नाही ना? बॅंकेत ठेवता ना? मग बॅंकेचा राखणदार तुम्ही निवडता का? की स्वत: जाता रोज कंदील घेऊन रात्री रखवाली करायला. ते बॅंकेचं काम आहे ना? तसंच यालाही डेटा बॅंकच समजा
अजून भ्या वाटतंय?
मग,
- learn online hygiene. कुठला डेटा सोशल मिडीया वर शेअर करायचा कुठला नाही ते शिका. घरचा ॲड्रेस, आई वडिलांचं नाव (हे बरेचदा सिक्रेट प्रश्न असतात), पॅन कार्ड, आधार कार्ड हे असे डिटेल्स टाळावेत
- जाहीरातींचा भडीमार झाला तर ती व्हाॅट्स ॲप सारखं absolutely amazing communication tool फ्रि मधे वापरायची किंमत समजा. जाहिरात दिसली की विकत घेतलं अशी तुमची अवस्था असेल तर data privacy is least of your problem dude
- राजकिय मतं - नो कमेंट्स. व्हाॅट्स ॲपचे लेख वाचून तुम्ही सारासार विचार करण्याची कुवत गमवत असाल तर data privacy is least if your problem dude
अजून भ्या वाटतंय?
मग एक वळकटी बांधा आणि हिमालयात रहायला जा
हुश्श दमले बै
© *हिमाली कोकाटे*
Sr. Project Manager, Capegemini UK
----------------------------------------------
सर्वात श्रीमंत एलॉनभाऊ म्हणतात सिग्नल वापरा. काहीजण म्हणतात टेलिग्राम वापरा.आज या दोन्ही अॅप्सची पॉलिसी वापरकर्त्यांची माहिती पेरेंट कंपनीला देणार नाही अशी असली तरी ती उद्या तशीच राहील याची खात्री काय?
वापरकर्त्यांची संख्या खूप कमी होऊन आपलंच नुकसान होईल हा विचार झकेरबर्गनी केला असेलच ना?
खरच नवी पॉलिसी कितपत धोकादायक आहे? WhatsApp वापरकर्त्यांना उबग आणेल का?
काय मत आहे तुमचं यावर?
वर्गीकरण
वाचने
44571
वाचनखूण
प्रतिक्रिया
93
माझं मत.
In reply to माझं मत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्हॉट्सअॅपची काही क्रॅक्
In reply to व्हॉट्सअॅपची काही क्रॅक् by प्रचेतस
पॉलिसी झुगारु शकत नाही.
In reply to माझं मत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.बिरुटे सर
In reply to प्रा.डॉ.बिरुटे सर by उपयोजक
"जगजाहीर"? म्हंजी काय रे भाऊ?
माझाही टॅावेल टाकतो.
In reply to माझाही टॅावेल टाकतो. by कंजूस
कंजूस
मी काहीही न वाचता, policy
पुर्वी मुघल, ब्रिटिशांचे
In reply to पुर्वी मुघल, ब्रिटिशांचे by चौथा कोनाडा
चौथा कोनाडा
In reply to चौथा कोनाडा by उपयोजक
होऊ शकतो.
लबाडी
व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- If You Had My Love... :- Jennifer LopezIn reply to व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार by मदनबाण
व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Billa 2 - Madurai Ponnu Song Video | Yuvanshankar RajaIn reply to व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार. by मदनबाण
सहमत आहे...
कसली डोस्क्याची प्रायवसी ...?
शुल्क
In reply to शुल्क by सुजित पवार
शुल्क भरून सुद्धा माहिती
In reply to शुल्क भरून सुद्धा माहिती by चौथा कोनाडा
काय करु शकतो?
मी फेसबूक सोडून दिले आहे आणि....
माझ्यासरखे जे व्हाटसअप
In reply to माझ्यासरखे जे व्हाटसअप by अभिजीत अवलिया
तुम्ही असा की नसा !
In reply to माझ्यासरखे जे व्हाटसअप by अभिजीत अवलिया
अभिजीत अवलिया
वाटसप/टेलिग्रामसाठी एकच नंबर
आशयाशी सहमत
- व्हॉट्सअॅपमध्येही आपला फोन क्रमांक सार्वजनिक होणे खूप सहजपणे होते. या प्रकाराची (फोनवर इन्स्टन्ट मेसेंजर) मुहूर्तमेढ रोवणार्या ब्लॅकबेरी मेसेंजरमध्ये हे कधीच शक्य होत नाही.
- दुसरे म्हणजे भारतीय वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपचा केलेला अतिरेकी वापर (अनेकांसाठी इन्स्टंट मेसेजिंग ऐवजी इंटरनेट म्हणजे बहुतांशी व्हॉट्सअॅप). अमेरिकेत सुरुवात होऊनही अमेरिकन लोक याचा फारसा वापर करतानाही दिसत नाहीत.
सुदैवाने व्हॉट्सअॅपनेच तीन वर्षांपूर्वी ब्लॅकबेरी फोनवर चालणे बंद केले अन माझ्यासाठी सुंठीवाचून खोकला गेला ;-). व्हॉट्सअॅपचे इतर पर्याय म्हणून ब्लॅकबेरी मेसेंजर एन्टरप्राइझ सुचवतो.In reply to आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
अॅप वि ब्राऊझर
आधीपासून तिन्ही मेसेंजर्स चा
जाहिराती उत्पन्न
वर उल्लेख केलेल्या अॅप सारखे
In reply to वर उल्लेख केलेल्या अॅप सारखे by मराठी_माणूस
https://www.elyments.com/
In reply to वर उल्लेख केलेल्या अॅप सारखे by मराठी_माणूस
आहे तर !
In reply to वर उल्लेख केलेल्या अॅप सारखे by मराठी_माणूस
<em>मराठी_माणूस</em>
In reply to <em>मराठी_माणूस</em> by उपयोजक
धन्यवाद.
माझ्या मते whatsapp वापरावे
** सूचना **
In reply to ** सूचना ** by साहना
संपूर्ण सहमत
In reply to ** सूचना ** by साहना
सहमत...!
In reply to सहमत...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा
In reply to ** सूचना ** by साहना
हाहाहाहा
आमच्या एका गृपने, एक निर्णय घेतला आहे....
In reply to आमच्या एका गृपने, एक निर्णय घेतला आहे.... by मुक्त विहारि
शुभेच्छा.
In reply to आमच्या एका गृपने, एक निर्णय घेतला आहे.... by मुक्त विहारि
मुविकाका तो ही फार काही सेफ पर्याय नाही!
In reply to मुविकाका तो ही फार काही सेफ पर्याय नाही! by टर्मीनेटर
तसेच करायचे ठरवले आहे...
आप्ला डेटा कोणाच्या हातात पडतो त्यावर सगळे अवलंबून आहे/असेल.
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मुफ्त का चन्दन घिस मेरे नंदन
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मला एक कळत नाही ..
In reply to मला एक कळत नाही .. by चौकटराजा
थेंबे थेंबे तळे साचे....
In reply to थेंबे थेंबे तळे साचे.... by मुक्त विहारि
ती मानसिकता ..
In reply to ती मानसिकता .. by चौकटराजा
अजून एक उदाहरण देतो.....
In reply to अजून एक उदाहरण देतो..... by मुक्त विहारि
बरोबर
In reply to अजून एक उदाहरण देतो..... by मुक्त विहारि
फेसबुक ..
In reply to फेसबुक .. by चौकटराजा
यात पाउट, नवीन साडी,
In reply to मला एक कळत नाही .. by चौकटराजा
चौकटराजा
In reply to मला एक कळत नाही .. by चौकटराजा
मिपाकर 'श्रेकु' यांचा हा प्रतिसाद
आले स्पष्टीकरण
In reply to आले स्पष्टीकरण by उपयोजक
चला जायचं का वाट्सपवर परत मग ?
In reply to चला जायचं का वाट्सपवर परत मग ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही लिटमस टेस्ट पण असू शकते....
चौकट राजा
फेसबुक उपाध्यक्ष यांचे म्हणणे
In reply to फेसबुक उपाध्यक्ष यांचे म्हणणे by अनन्त अवधुत
आधीच्या प्रतिसादात पोस्ट नीट दिसत नाही
इंटरनेट वरती फक्त यु ट्युबच
In reply to इंटरनेट वरती फक्त यु ट्युबच by Bhakti
सहमत आहे
बर्याच विनोदी प्रतिक्रिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jenny from the Block (Official Music Video) :- Jennifer LopezIn reply to बर्याच विनोदी प्रतिक्रिया by मदनबाण
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to बर्याच विनोदी प्रतिक्रिया by मदनबाण
मुक्त विचार स्वातंत्र्याचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- [ Dance Dance (1987) ]हे कितपत खरे होईल?
In reply to हे कितपत खरे होईल? by उपयोजक
हे झाले तर ..
In reply to हे कितपत खरे होईल? by उपयोजक
वरील गोष्टी
मी व्हॉटसअॅप वापरायचे
In reply to मी व्हॉटसअॅप वापरायचे by धर्मराजमुटके
धर्मराजमुटके
In reply to मी व्हॉटसअॅप वापरायचे by धर्मराजमुटके
मस्त उदाहरण
In reply to मस्त उदाहरण by प्रकाश घाटपांडे
मी मानसशास्त्रज्ञ नाही तरीही निरीक्षण
मायक्रोसॉफ्ट काय झालं अॅप
ह्या जगात कोणच काही फुकट देत नाही
In reply to ह्या जगात कोणच काही फुकट देत नाही by Rajesh188
होय, बरोबर
In reply to होय, बरोबर by सतिश गावडे
डेटा विकणे नाही हो. डेटा वर
In reply to डेटा विकणे नाही हो. डेटा वर by पिनाक
बरं :)
कबुतरं वापरा, सगळ्यात बेष्ट :
In reply to कबुतरं वापरा, सगळ्यात बेष्ट : by टवाळ कार्टा
सहमत आहे
In reply to कबुतरं वापरा, सगळ्यात बेष्ट : by टवाळ कार्टा
बर्ड फ्लु
हे आताच घडत नाही
थोडी वर्षं थांबा ....
वा रे वा
In reply to वा रे वा by स्वलिखित
दुसरी पहिल्यापेक्षा जास्त पण
हे पण वाचून घ्यावे ;)
वाचनीय
In reply to वाचनीय by उपयोजक
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to वाचनीय by उपयोजक
मनात - अच्युत गोड्बोले यांचे पुस्तक वाचल्यानंतर
अखेर नमले!
या संबधी आणखी एक वृत्त. याचा
https://casparwre.de/blog
मोबाईल सतत जवळ असणेच पुरेसे/धोक्याचे आहे.