एक जिलबी आठवणींची
लेखनप्रकार
एक जिलबी आठवणींची
पुर्वी दुरदर्शन आणी इतर टीव्ही वाहिन्यांवर फिलिप्स टॉप टेन , सुपरहिट मुकाबला , एकसे बढकर एक असे गाण्यांचे कार्यक्रम असत . यांमधे त्या आठवड्यात गाजत असलेली दहा हिंदी चित्रपटगीते प्रसिद्धीच्या क्रमवारीवर सादर केली जात . कधी काही कारणाने यातला कुठला एपिसोड बघता आला नाही तरी फारसे बिघडत नसे .
कॉलेजच्या हॉस्टेलमधुन एखाद दुसरा फेरफटका मारला तरी वेगवेगळ्या रुम्समधुन ऐकु येत असलेल्या गाण्यांवरुन सध्याची टॉप टेन गाणी कुठली आहेत याचा अंदाज येत असे .
ए. आर. रहमानच्या संगीताचे मायाजाल तेव्हा हळुहळु जनमानसाची पकड घेत होते . रोजा , बॉम्बे , हमसे है मुकाबला अशा चित्रपटांतील एका मागुन एक गाजलेल्या गाण्यांमुळे हे मायाजाल पसरतच चालले होते . "सुरुवातीला दोन , तीनदा ऐकली तरी हि रहमानची गाणी काही समजतच नाहित " अशी तक्रार करणारा हळु हळु तीच गाणी परत परत ऐकत असे . एक वेळ तर अशी आली की या टॉप टेन गाण्यांच्या कार्यक्रमात ४ / ५ गाणी हि एकट्या ए. आर. रहमानची होती . यातली १/२ गाणी हि टॉप टेन लिस्टमधे बराच काळ स्थिरावली होती . १/२ गाणी हि नुकतीच येउन अधल्या मधल्या पायदानपे पोचली होती . तर एखादे नवीन गाणे हे या लिस्टमधे हळुच शेवटुन चंचुप्रवेश करु पाहात होते .
कॉलेजच्या हॉस्टेलमधुन फिरताना याचीच प्रचिती येत असे . एखाद्या रुममधुन सबमिशन पुर्ण झाल्याच्या आनंदात उजव्या हाताचा अंगठा उंचावुन नाचत नाचत "तनहा तनहा यहांपे जीना ये कोई बात है " च्या तालावर जल्लोष केला जात असे . कुठल्यातरी रुममधे आपल्या खास क्लासमेटसना आठवुन कुणीतरी व्याकुळ होउन गात असे - "कोई यहां रुपमती , कोई यहां भानुमती , तुही बता कौन मेरी दिलरुबा " . अशावेळी त्या गाण्यात आपला ठेवणीतला आवाज मिसळुन आपल्या मित्राला त्याचा रुममेट धीर देत गात असे - "जो है माधुरी यहां , वोही तेरी दिलरुबा ."
कुठल्यातरी रुममधे जीटी मारताना कोणी तरी तल्लीन होउन शिट्टीवर गाणं वाजवत असे - " सुन ले ओ जानम , मै हुं परम सिवम , तु है पार्वती , मिलना जनम जनम "
तर पलिकडच्याच रुममधे कोणीतरी वीर आपण घेतलेल्या शपथेची जाहीर कबुली देत असे - "प्यार कभी ना तोडेंगे , साथ कभी ना छोडेंगे , कौन हमे रोकेगा बोलो , कौन हमे जीतेगा बोलो , गोरी तुमने जबसे दिल जीता "
नंतर तर कॉलेजच्या गॅदरींगलाही ग्रुप डान्स बसवताना ए. आर . रहमानच उपयोगी पडत असे . अशा वेळी गच्चीवर एका कॉर्नरला एक ग्रुप "छय्या छय्या " गाण्यावर डान्स बसवत असे . या गाण्यातला रेल्वेचा धडाड धडाड साउंड इफेक्ट हा डान्समधुन दाखवण्यासाठी वेळप्रसंगी एकमेकांवर धडकुनही होत असे .
तर पलिकडच्या कॉर्नरला दुसरा ग्रुप "जिया जले जां जले " या गाण्यावर तयारी करत असे . या गाण्यातील "कुरुवारी किरये कुरुघीर कुरुघीर कुंची वरदी कुइल्लारी कुडुवरद्दी कोतड्दी किनिये .. मारयिन्ने " ( चु. भु. द्या. घ्या .) अशा समजायला अवघड पण ऐकायला गोड वाटत असलेल्या ओळींवर तलवारींचे हात बसवले जात . त्यासाठी कुठुनतरी तलवारी आणी धोतीही मिळवल्या जात . या डान्ससाठी कॉलेजमधील बिल्डर पोरांना खुप डिमांड असे .
कॉलेजचे दिवस एकतर टॉपर लोकं तरी गाजवतात नाहीतर टपोरी लोकं तरी . पण यावेळी मात्र कॉलेजचे दिवस ए. आर . रहमानने गाजवले .
-------------------------------------------------------- समाप्त ----------------------------------------------------
वाचने
6546
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
तुम्ही इंजिनीअरींग डिप्लोमा
मिलाओ हाथ, तुम्हीपण
इंजिनियरिंगला असताना घरीच
In reply to इंजिनियरिंगला असताना घरीच by सतिश गावडे
कुठल्याही मनोरंजन अँप मधे
यु ट्यूब वर '90s इंडी पॉप असं
ए. आर. रहमान यांना ६
आठवणींची गोड जिलबी आवडली
In reply to आठवणींची गोड जिलबी आवडली by टर्मीनेटर
टर्मीनेटर साहेब तुमची मेकॅनिकल ब्रँच का?
In reply to टर्मीनेटर साहेब तुमची मेकॅनिकल ब्रँच का? by वडगावकर
ऑलमोस्ट...
बाकी टपोरी आणी मेकॅनिकल
आठवणींची झकास जिलबी !