पुन्हा पानिपत!
भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.
या विषयावर आजपर्यंत अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. लढाईनंतर लगेच बखरी लिहिल्या गेल्या जाऊ लागल्या. आधुनिक काळात मराठी इतिहासाचे भीष्मपितामह वि का राजवाडे, शेजवलकर, फाटक, पगडी, पांडुरंग बलकवडे, विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी ही या विषयावर लिहिलेल्या साहित्यातील अगदी काही निवडक ढोबळ नावे. डॉ उदय कुलकर्णी यांनीही गेल्या काही वर्षात इंग्रजी आणि मराठीत पानिपताबद्दल लिहिले आहे, व्याख्यानांच्या द्वारे लोकांसमोर मांडले आहे. माझ्या मित्राच्या भाषेत सांगायचे तर "अगदी पिळून कोरड्या केलेल्या" अश्या या विषयावर मी का अजून एक पुस्तक प्रकाशित करतो आहे?
त्याचं कारण असं आहे की, कित्येक पुस्तकांमधून आपल्याला लेखक स्वतः मराठ्यांच्या बरोबर पानिपतमध्ये "लढताना" आढळतात. मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा प्रशंसनीय तर आहेच. आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना आपल्याला अभिमान वाटेल अश्या गोष्टी समोर ठेवायच्या असतात, त्यामुळे अशी पुस्तके लिहू अथवा वाचू नयेत असे माझे म्हणणे नाही. पण वस्तुनिष्ठ दृष्टीने या लढाईबाबत मराठी साधने काय सांगतात, एवढेच नव्हे तर शत्रूच्या बाजूची फारसी, दारी, पश्तो साधने काय सांगतात, या लढाईत भाग न घेतलेले इंग्रज, फ्रेंच आपल्याला काय सांगतात हे तपासून पाहिलं तर एक आजवर न उलगडलेलं विश्वच आपल्यासमोर अवतीर्ण होतं. त्या विश्वात रंग भरण्याचं काम करतात ती परदेशातील आणि भारतातील आजवर अप्रकाशित असलेली चित्रे. या विश्वानं मला मोहात पाडलं. वाचकांनाही या गतकाळातील स्मृतिचित्रांचा मोह पडेल अशी मला अशा आहे.
कित्येक दिवस, महिने, वर्षे, महिने अभ्यास केल्यावर इतक्या विस्तीर्ण विषयावर लिहिलेल्या अनेक पुस्तकांतील न उलगडलेल्या बाबी मला समजू लागल्या. त्या पक्क्या करण्यासाठी मी ज्या मूळ साधनांवरून हे ग्रंथ लिहिले आहेत ती मिळवण्याचा प्रयत्न केला. ही वाट खूप खडतर होती. त्यासाठी आवश्यक असणारे फारसी, दारी, पश्तो वाचनाचे ज्ञान, मोडी लिपी वाचन हे शिकताना मला अनेक लोकांची प्रचंड मदत झाली. श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि दिल्लीचे फारसी प्राध्यापक डॉ चंद्रशेखर यांच्या मदतीने अनेक वाटा खुल्या झाल्या. मूळ साधने घरबसल्या अभ्यासून पाहताना या पुस्तकाची कल्पना माझ्या मनात साकारत गेली. या पुस्तकासाठी मी जगभरातून अनेक तपशील मिळवले आहेत. नावंच सांगायची तर इंग्लंड, अमेरिकेतील साधने तर आहेतच, पण पॅरिस येथील फ्रेंच साधने, मध्य-पूर्वेतील कुवैत, अफगाण शाहनामा-पेशावर, पाकिस्तानातील लाहोर, खैबर-पख्तुनवा, भारतातील सागर, डीग, हैदराबाद, जोधपूर, जयपूर अश्या अनेक मराठी वाचकांना अपरिचित अश्या जगातून इतिहासाचे कण गोळा केलेले आहेत. या नवीन पुस्तकाच्या रूपाने मागच्या पंचवीस-तीस वर्षातील संशोधन आणि अनेक अप्रकाशित नवीन चित्रे, साधने अन माहिती वाचकांच्या समोर ठेवताना मला आनंद होत आहे.
मिसळपाव हे संकेतस्थळ माझ्यासाठी खास आहे, कारण इथे लिहिलेल्या माझ्या लेखनाला अनेक इतिहासप्रेमी वाचकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी खूप प्रोत्साहन दिले आहे. एवढेच नव्हे तर नुसतं पुस्तक लिहितो आहे हे समजताच काहींनी त्याच वेळी आपली प्रत राखून ठेवली आहे! आज पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु करताना मला आपल्या सर्वांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
पुस्तकाचे प्रकाशन २० डिसेंबर २०२० रोजी करण्याचं ठरवलं आहे. ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी आपले नाव इथे नोंदवावे.
https://panipat-signup.web.app/
दोन पर्याय उपलग्ध आहेत:
१) गूगल पे, अँपल पे अथवा क्रेडिट कार्ड इत्यादीद्वारे रुपये ७५०/- देऊन नोंदणी
किंवा
२) सध्या पैसे न देता फक्त नाव,पत्ता देउन नोंदणी करता येईल
- (पुणेरी स्वभावाला न अनुसरून!) कुठलीही काटकसर न करता उत्तम दर्जाच्या जाड कागदावर, ८०+ चित्रे सुबकपणे या जाड पुठ्ठयाच्या (hardcover) पुस्तकात छापली आहेत.
- पुस्तक जगभर कुठेही पाठवता येईल अशी सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे
- पुस्तकाची किंमत रुपये १५००/- आहे, पण २० डिसेंबरपर्यंत ते रुपये ७५०/- म्हणजे ५०% सवलतीत मिळेल
- पुस्तक दिलेल्या पत्त्यावर प्रकाशन झाल्यावर हणजे २० डिसेंबरनंतर पाठवले जाईल
- पुस्तक प्रकाशन झाल्यावर amazon किंवा दुकानातही मिळू शकेल, तशी व्यवस्था करणे चालू आहे
- नोंदणी करताना काही अडचण आल्यास panipat.rediscovered अँट gmail.com या पत्यावर किंवा इथे संपर्क करावा
धन्यवाद !
वाचन
32805
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by राज२००९
अनुक्रमणिका
In reply to अनुक्रमणिका by मनो
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by राज२००९
हो नक्कीच. USPS द्वारे
अभिनंदन मनो.
अभिनंदन!
अभिनंदन मनो.
अभिनंदन. अत्युत्तम..
व्वा!
अभिनंदन
In reply to अभिनंदन by खेडूत
सहमत. इंग्लीश मधे लिहण्यामागे
In reply to सहमत. इंग्लीश मधे लिहण्यामागे by मराठी_माणूस
जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ
In reply to जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ by मनो
मराठी आव्रुत्ती लवकरच यावी
पुस्तकाचे manuscript
अभिनंदन
नविन
In reply to नविन by प्रसाद_१९८२
माझ्याकडे आत्ता व्यवस्थित
अभिनंदन मनो.
अरे वा...
अभिनंदन,
आभिनंदन
वा !
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by पुष्करिणी
पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे
नोंदणी केली आहे.
In reply to नोंदणी केली आहे. by pspotdar
मी stripe checkout वापरतो आहे
In reply to मी stripe checkout वापरतो आहे by मनो
धन्यवाद
आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल
In reply to आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल by दुर्गविहारी
माझं दहावीपर्यंत शिक्षण हे
अभिनंदन. हा विषयच अद्भुत आहे.
In reply to अभिनंदन. हा विषयच अद्भुत आहे. by चित्रगुप्त
हो नक्कीच, तुमच्या अमेरिकेतील
In reply to हो नक्कीच, तुमच्या अमेरिकेतील by मनो
*पत्त्यावर :)
नोंदणी केली आहे
In reply to नोंदणी केली आहे by चित्रगुप्त
चित्रगुप्तकाका, मी सध्या
In reply to चित्रगुप्तकाका, मी सध्या by मनो
अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो.
In reply to अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो. by चित्रगुप्त
काका, तुमची सूचना अगदी योग्य
In reply to काका, तुमची सूचना अगदी योग्य by मनो
पानिपत सुद्धा काय जमिनीसाठी लढाई
अभिनंदन
अभिनंदन हो मनोबा !!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे
**(UPDATE 08 December 2020)**
अभिनन्दन
मनःपूर्वक अभिनंदन आणि
In reply to मनःपूर्वक अभिनंदन आणि by रुपी
धन्यवाद! ई-मेल पाठवतो. मी
मी नोंदणी केली आहे. परंतु आता
In reply to मी नोंदणी केली आहे. परंतु आता by जानु
जिथे नोंदणी केली तिथेच (https
अभिनन्दन
In reply to अभिनन्दन by बांवरे
हो अमेरिकेत नक्की पाठवू शकेन,
पुस्तक मिळाले
In reply to पुस्तक मिळाले by मित्रहो
धन्यवाद!
उत्तम.
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले
अमेरिकेत मागवण्यासाठी
In reply to अमेरिकेत मागवण्यासाठी by चित्रगुप्त
काका, मी पाठवतो. आजच अमेरिकेत
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक खुप
पुस्तक मिळाले
In reply to पुस्तक मिळाले by चांदणे संदीप
याचसाठी केला होता अट्टहास.
ग्रंथ मिळाला.
In reply to ग्रंथ मिळाला. by चित्रगुप्त
काका,
In reply to ग्रंथ मिळाला. by चित्रगुप्त
धन्यवाद. आपल्यासारख्या
In reply to धन्यवाद. आपल्यासारख्या by मनो
खास चित्रांसाठी नवीन धागा काढावा.
In reply to खास चित्रांसाठी नवीन धागा काढावा. by चित्रगुप्त
माझा एक अंदाज असा आहे की
पुस्तक मिळाले. कागद आणि
अभिनंदन....
बॅटल ऑफ पनिपत : रसग्रहणात्मक लेख
+१
बॅटल ऑफ पनिपत या इंग्लिश मधील ग्रंथाचा आजच्या दै लोकसत्ता म्हणजे दि. १६ जाने २०२१, शनिवार च्या अ़ंकात "बुकमार्क" या सदरात "‘पानिपता’चे चित्रचरित्र" या मथळ्याखाली ले. निखिल बेल्लारीकर यांचा रसग्रहणात्मक लेख प्रकशित झालेला आहे. https://epaper.loksatta.com/2960733/loksatta-pune/16-01-2021#clip/57753863/c33325ae-264f-4ecf-adac-5e4af33037f9/1595.5555555555557:1035.5583548461216 https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of-rediscovered-paintings-book-review-abn-97-2380669/In reply to बॅटल ऑफ पनिपत : रसग्रहणात्मक लेख by चौथा कोनाडा
नक्की वाचा. वाचायला विसरू
कालच पुस्तक आले. प्रथम दर्शनी