भडकमकर मास्तरांचा जालिंदरजींबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि आमच्या मनात खळबळ उडाली.
इतक्या थोर साहित्यिकाचे साहित्य आतापर्यंत न वाचल्याने मनात विषाद उत्पन्न झाला, त्यामुळे प्रतिक्रिया काय द्यावी हे समजेना.
तशीच उठून स्वयंपाकघरात गेले व वाटीभर हरभर्याची डाळ नीट धुवून भिजत टाकली.
पुन्हा मिपावर येऊन बघते तो पाषाणभेद यांनी 'लिहिते व्हा' ह्या जालिंदरजींच्या पुस्तकाबद्दल खरडवहीत विचारणा केली होती.
फारच अस्वस्थता आल्याने पायात सपाता अडकवून जवळच्याच पुस्तकाच्या दुकानात जालिंदरजींचे साहित्य शोधण्यास बाहेर पडले.
दुकानात पोचताच दोन सुकुमार ललनांनी स्वागत केले आणि काय हवे असे विचारले. 'जालिंदर जलालाबादी' हे नाव ऐकताच दोघींचे आधीच पांढरे असलेले चेहेरे आणखीनच पांढरे पडले!
'भाकरीच्या बदल्यात भाषण' हा संदर्भ आठवल्याने मी तडक पाककृती विभागाकडे वळले.
माझी पुस्तकांच्या शेल्फशी सुरु असलेली खुडबूड ऐकून साधारण २०० पौंड वजनाची विशाल महिला माझ्याजवळ येऊन विचारती झाली.
'जालिंदर जलालाबादी' हे नाव माझ्या तोंडून ऐकताच ती तिच्या मदतनिसांकडे वळली आणि शक्य तितक्या वेगाने चालत जाऊन तिने नेमक्या ठिकाणाहून
'जॅलिंडर जलॅलॅबॅडी' यांची पुस्तके ताबडतोब आणावयास सांगितली! मिनिटभरातच माझ्यापुढे चार पुस्तके आली - पहिले पुस्तक 'पेंग्विन्स व गोठलेले शब्द' हा कविता संग्रह,
दुसरे 'भाकरीच्या बदल्यात भाषण', तिसरे 'बुरुंडीतील खरबुजे' हे आफ्रिकेतले प्रवासवर्णन आणि चौथे 'चालते व्हा!'
शेवटच्या पुस्तकाचे नाव जणू काही मलाच उद्देशून लिहिले आहे असे वाटून हिरमुसून मी घरी आले.
जालिंदरजींचे साहित्य मिळाले नसले तरी मी कैरीच्या डाळीचे साहित्य गोळा करायला सुरुवात केली.
एव्हाना डाळ चांगलीच भिजली होती. डाळीचा उग्रपणा जाण्यासाठी ती स्वच्छ धुतली.
दोन हिरव्याकंच मिरच्या, पाव टी स्पून जिरे, अगदी छोटा आल्याचा तुकडा व मीठ असे एकत्र फूड प्रोसेसरमधे जाडसर वाटले.
बुरुंडीमधील काही सुगरणींनी सांगितल्यानुसार कैरी किसली. डाळीच्या वाटणात सव्वा टेबलस्पून कैरीचा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरती साखर घालून कालवले.
भरपूर तेलातली, भरीचा हिंग घालून केलेली आफ्रिकन रंगाची फोडणी गार होण्यासाठी ठेवली.
अजूनपर्यंत मनातला 'चालते व्हा' मुळे आलेला राग शांत झाला नव्हता, एवढ्यात नवरा घरी आला.
तो नुकताच एके ठिकाणी 'बुद्धीबळ कसे खेळू नये' ह्यावर एक भाषण देऊन आला होता. पहाते तो त्याच्या हातात भाकरी; त्यावरुन जालिंदरजींच्या साहित्यप्रसाराची कल्पना आली.
एक मोठी कैरी कुकरला उकडण्यास लावली. आतामात्र 'चालते व्हा' ची हकीकत नवर्याला एका दमात सांगून टाकली. त्याला ह्यात कुठलाही अपमान वाटाला नाही.
भारतातल्या लोकांना लेखनासाठी प्रोत्साहित करण्याकरता 'लिहिते व्हा' असे पुस्तक जलालाबादींनी लिहिले असून जाडजूड अमेरिकन बगलबच्चांना वाढते वजन नियंत्रित करा असा संदेश देण्यासाठी 'चालते व्हा!' हे पुस्तक लिहिले आहे असे नवर्याचे म्हणणे पडले. थंड झालेल्या डोक्याने तेवढीच थंड झालेली फोडणी डाळीवर ओतून नीट कालवले.
'चालते व्हा' हे पुस्तक जर अमेरिकेत मुबलक संख्येने उपलब्ध आहे तर 'लिहिते व्हा' पाषाणभेद साहेबांना भारतात का मिळू नये? ह्यात गुजरात सरकारचा काही डाव असावा अशी आम्हाला शंका आली. एवढ्यात कुकरची तिसरी शिट्टी झाली व मी गॅस बंद केला. नवापूर रेल्वेस्थानकाच्या गुजरातकडल्या बाजूला पुस्तकांच्या स्टॉलवर 'लिहिते व्हा' हे पुस्तक मिळते व ते मराठी वाचता येणार्या गुजराती बांधवांनाच दिले जाते अशी माहिती समजली. एव्हाना उकडलेल्या कैरीचा गर हलकेच काढून मिक्सरच्या जारमध्ये घातला होता. फार सालाजवळचा आणि कोयीजवळचा गर घेतल्यास त्याची कडवट, तुरट चव पन्ह्यात उतरते म्हणून तो गर घेतला नव्हता. (ही टीप 'भाकरीच्या बदल्यात भाषण' ह्या पुस्तकात वाचली होती!).
माझ्या आवडीप्रमाणे एक वाटी गराला पाऊण वाटी गूळ व अर्धी वाटी साखर (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलेल) व पाव चमचा मीठ गरात घालून वर थोडे पाणी घातले.
मिक्सरमधे एकजीव घुसळून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे केशर अथवा वेलची पूड घालायची असते, मी केशर घातले. आता थंडगार पाणी ओतून हवे तेवढे पातळ करुन घेतले.
खमंग कैरीची डाळ व चवदार पन्हे यांचा नैवेद्य चैत्रगौरीला दाखवला आणि जलालाबादी 'क्षणभंगूर सिंगूर' हे महाकाव्य कधी बरं पूर्ण करतील ह्यावर विचार करत करत त्याचा आस्वाद घेतला! :)
रेवती

वाचने
18690
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा फोटू,
अरेच्या लगेच लेख वाचून प्रतिक्रिया आली सुद्धा!
In reply to जबरा फोटू, by विसोबा खेचर
झक्कास
In reply to अरेच्या लगेच लेख वाचून प्रतिक्रिया आली सुद्धा! by रेवती
खल्लास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो !
In reply to खल्लास by नंदन
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय
+१
In reply to अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय by भडकमकर मास्तर
(अवांतर) झटपट पन्हे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
व्वा. ताई
बाणा, तुझी
In reply to व्वा. ताई by मदनबाण
छान जमलाय बेत
जबरदस्त!!!
अशाच
In reply to जबरदस्त!!! by प्राजु
मस्त !
जालिंदरजीं
पाकृ आणि
मस्त ग
(विषय दिलेला नाही)
एक नंबर
वा...
मास्तर,
In reply to वा... by श्रावण मोडक
ला...
In reply to मास्तर, by भडकमकर मास्तर
गुरुजींना
In reply to ला... by श्रावण मोडक
अगदी
In reply to गुरुजींना by रेवती
जबर्या फोटो
अ प्र ति म
वॉव..
एक नंबर!!
होय
In reply to एक नंबर!! by शाल्मली
जय हो
हा लेख
वा .. फारच
आपल्या
In reply to वा .. फारच by लिखाळ
मस्तच.
खुशखुशीत लेखन
जय जालिंदर!
खुसखुशीत लेख
व्हर्च्यु
In reply to खुसखुशीत लेख by संदीप चित्रे
कधी? कुठे?
In reply to व्हर्च्यु by रेवती
यूट्यूबचा दुवा
सर्व
कैरीच्या डाळीची पाकृ शोधत
मस्त लिखाण अन पाकृ!
जोरदार
जालिंदर जलालाबादींचं साहित्य
In reply to जोरदार by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to जालिंदर जलालाबादींचं साहित्य by प्यारे१
श्यामसुंदर बांधव?
In reply to जालिंदर जलालाबादींचं साहित्य by प्यारे१
छान!
लीमाऊजेट, पैसाक्का,
कैरीची डाळ तोंपासू