१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
प्रतिक्रिया
कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.मग तुम्ही मिपावर "माझेच खरे , अन माझ्या एकट्याचाच अनुभव सत्य अन बाकीच्यांची भ्रांती " असे पटवुन द्यायला वादविवाद का बरें करत असता ?
In reply to कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. by प्रसाद गोडबोले
In reply to @ मार्कस ऑरेलियस : तुम्ही लेखातली साधना करुन पाहा by संजय क्षीरसागर
तुम्ही लेखातली साधना करुन पाहा आणि अनुभव घ्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळेल.समजा लेखातील साधना न करताच मला किंव्वा अन्य कोणालाही अन्य काही साधना करुन अनुभव आला असेल तर त्याला तुमची हरकत का ? मी म्हणतो तीच एक खरी साधना अन बाकीचे सर्व साधनामार्ग म्हणजे वैचारिक मैथुन असा तुमचा अट्टहास का ?
In reply to समजा by प्रसाद गोडबोले
In reply to कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. by प्रसाद गोडबोले
In reply to हम्म. by शा वि कु
In reply to @ शा वि कु : धिस इज इंटरेस्टींग ! by संजय क्षीरसागर
मनात चाललेला विचारांचा स्वैर संचार थांबतो. सर्वस्वी बेलगाम झालेली मेंटल अॅक्टीविटी आपल्या काह्यात येते.हे मात्र खरं आहे. विचार थांबले, कारण (माझ्या समजण्यानुसार) गोलक स्पर्श न होऊ देण्यावर लक्ष केंद्रित होतं. हे एकाग्र होण्यासाठी फायदेशीर आहे.
देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे.इथे खरा प्रॉब्लेम आहे. देह म्हणजे मी नाही असं काही वाटलं नाही. अर्थात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा साधनेचा भाग आहे, त्यामुळे लगेच अपेक्षा करणे फोलच.
लेखात न पटण्यासारखं काही नाही कारण ते वस्तुस्थितीचं वर्णन आहे.ओके. देहाबाहेरचे अस्तित्व हि मला वस्तुस्थिती वाटत नाही. असो. शेवटी अनुभवाचा प्रश्न असल्याने आत्तातरी फरक बुजवता येणार नाही.
In reply to ओके... by शा वि कु
हे मात्र खरं आहे. विचार थांबले, कारण (माझ्या समजण्यानुसार) गोलक स्पर्श न होऊ देण्यावर लक्ष केंद्रित होतं. हे एकाग्र होण्यासाठी फायदेशीर आहे.काहीही परिचय नसतांना, ओपन सोशल फोरमवर प्रकाशित झालेली एक सोपी साधना करुन, एका तिर्हाईत व्यक्तीचे विचार थांबले हे या लेखनाचं सर्वोच्च यश आहे ! आजपर्यंत एकाही व्यक्तीचे विचार थांबले नाहीत असं झालेलं नाही पण ते सर्व एकतर माझ्यासमोर होते किंवा परिचयाचे तरी होते. आणि गोलक एकमेकात गुंतवता क्षणी विचार थांबतात ही खरी कमाल आहे ! अध्यात्मिक जगतात आजतागायत कोणताही सिद्ध मनाची प्रक्रिया थांबवायला इतकी सोपी आणि तत्क्षणी प्रचिती येणारी देऊ शकलेला नाही. नाही तर गुरु करा, दिक्षा घ्या, इतकी वर्ष रगडा असा प्रकार केल्यावर, झक मारत काही तरी फायदा झाला म्हणावं लागतं नाही तर आपणच आपल्याला बावळट वाटायला लागतो ! ______________________________ गोलकांचं अवधान मनाला एकाग्र करत नाही, ते अत्यंत विस्मयकारक पद्धतीनं ब्रेन रिलॅक्स करतं त्यामुळे मेंटल अॅक्टीविटी थांबते. २.
इथे खरा प्रॉब्लेम आहे. देह म्हणजे मी नाही असं काही वाटलं नाही. अर्थात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा साधनेचा भाग आहे, त्यामुळे लगेच अपेक्षा करणे फोलच.येस ! तुम्ही शांत झालेल्या मेंटल अॅक्टीविटीची मजा घ्या. संपूर्ण देहाची जाणीव आणि सरते शेवटी स्केलेटन अँड फ्लेश हे अनुभव अत्यंत सघन झालेल्या शांततेत हमखास येणारच कारण तीच वस्तुस्थिती आहे ! व्यक्तीमत्व हा आपण निर्माण केलेला, इतरांनी सपोर्ट केलेला आणि समाजिक सोयीसाठी उपयुक्त असलेला प्रकार आहे. वास्तविकात तसं काहीही नाही. ३.
ओके. देहाबाहेरचे अस्तित्व हि मला वस्तुस्थिती वाटत नाही. असो. शेवटी अनुभवाचा प्रश्न असल्याने आत्तातरी फरक बुजवता येणार नाही.काही हरकत नाही. शून्यता हा तुमचा अनुभव झाल्यावर तो फरक आपोआप नाहीसा होईल.
In reply to @शा वि कु: तुमच्या प्रामाणिक प्रतिसादानं लेखाचा उद्देश सफल झालाय by संजय क्षीरसागर
In reply to @ शा वि कु : धिस इज इंटरेस्टींग ! by संजय क्षीरसागर
ध्यानमुद्रेत दोन गोलक एकमेकांपासून विलग असतांना तुमच्या मनात नक्की काय विचार यायला लागलेकाहीशा स्केप्टीकल मनाने हे करुन पाहिलं. मनातले जनरल विचार एकदम गायब झाल्याची अनपेक्षित आणि त्यामुळे आश्चर्यकारक जाणीव झाली खरी. पण लगेचच हे संक्षींच्या धाग्यावर जाऊन प्रतिसादात लिहूया असा विचार आला. मग हे असं का झालं याबद्दल तार्किक संगती लावणारे विचार आले. लक्ष हे दोन वर्तुळे टच न होऊ देण्यात लागल्याने हे झालं असं दिसतं. हीच स्थिती सुईत दोरा ओवणे किंवा अन्य काही मार्गाने साध्य होईल असा अंदाज केला. हे सर्व "विचार"च आहेत. (कपाळ बडवणारी स्माईली)
In reply to ध्यानमुद्रेत दोन गोलक by गवि
काहीशा स्केप्टीकल मनाने हे करुन पाहिलं. मनातले जनरल विचार एकदम गायब झाल्याची अनपेक्षित आणि त्यामुळे आश्चर्यकारक जाणीव झाली खरीएका विज्ञाननिष्ठ, निष्पक्ष आणि मान्यवर व्यक्तीनं स्केप्टीकली करुन मेथडनी रिझल्ट दिला यातच सगळं आलं ! २.
पण लगेचच हे संक्षींच्या धाग्यावर जाऊन प्रतिसादात लिहूया असा विचार आला. मग हे असं का झालं याबद्दल तार्किक संगती लावणारे विचार आले. लक्ष हे दोन वर्तुळे टच न होऊ देण्यात लागल्याने हे झालं असं दिसतं.तुम्ही निर्विचार स्थितीचा आनंद घ्या. आयुष्यात घडणारी ही अत्यंत अपूर्व घटना आहे. वर्षनुवर्ष साधना करुनही साधकांना अमन अवस्था साध्य होत नाही. ही अवस्था तुम्हाला वस्तुस्थितीप्रत आणते, जो या लेखाचा कोअर पार्ट आहे : आपल्याला देह नाही तर देहाची जाणीव आहे . गोलक जोपर्यंत टेकत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुसंगत विचार सुद्धा करु शकता याला युनिडायरेक्शनल थिंकींग म्हणतात. शास्त्रज्ञांचं मन याप्रकारे काम करतं, ते एकाच डिरेक्शननी दीर्घकाल विचार करत नेमक्या कन्क्लूजनपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे धाग्यावर जाऊन प्रतिसाद देण्याचा विचार हा वस्तुस्थितीशी सुसंगत विचार आहे पण त्याची घाई काय आहे ? जस्ट एंजॉय द सायलेंस, द स्टॉस्पेज ऑफ मेंटल अॅक्टीविटी. इट इज अ गोल्डन इवेंट ! ३.
हीच स्थिती सुईत दोरा ओवणे किंवा अन्य काही मार्गाने साध्य होईल असा अंदाज केला. हे सर्व "विचार"च आहेत.प्रश्न मन फोकस करण्याचा नाही, मेंटल अॅक्टीविटीचा ठहराव हा मुद्दा आहे. सुईत दोरा ओवणे, सखीची मिठी, समोर अचानक आलेलं वाहन.... कोणतीही गोष्ट मन थांबवते पण ती घटना क्षणिक असते; ते ध्यान नाही. ध्यानात तुम्ही स्वतःला हवा तितका वेळ निर्विचार अवस्थेत राहू शकता. पाठ टेकलेली, डोळे मिटलेले, मन थांबलेलं.... ही स्थिती तुम्हाला विदेहत्वाची जाणीव करुन देते आणि तो या पोस्टचा उद्देश आहे.
In reply to @ गवि : आता तर ध्यानप्रक्रिया निर्विवादपणे सिद्ध झाली ! by संजय क्षीरसागर
स्वतःला हवा तितका वेळ निर्विचार अवस्थेत राहू शकता.याबद्दल साशंक आहे. वर्तुळे विलग ठेवणे ही एक शारिरीक मानसिक कसरत आहे. ती फार काळ अथकपणे किंवा न कंटाळता टिकवता येईल किंवा कसे ते पाहावे लागेल.
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by गवि
In reply to ध्यानमुद्रेत दोन गोलक by गवि
हे सर्व "विचार"च आहेत. (राईट. हे सर्व मनाच्याच पातळीवर होतं. आपण निर्विचार झालोय हे देखील मनालाच कळतं. सांध्यांचे अॅक्चुअल कनेक्ट पॉईण्ट, पोटातले स्त्राव, शरीराच्या वेगवेगळ्या भागात नाड्यांचे ठोके.. हे सर्व 'जाणवतं'... पण शेवटी हे सर्व शारीरीक-मानसीक पातळीचीच अॅक्टीव्हिटी असते.
बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला.सिद्धार्थ गौतमाने २९ व्यावर्षी साधारण जीवनशैलीचा त्याग केला आणि त्याला ३५ व्या वर्षी बुद्धावस्था प्राप्त झाली. साधना ६ वर्षांची ती ८ समाधीअवस्थांपर्यंत जाण्याची. ८ समाधीअवस्था प्राप्त करूनही मनाचे विकार जात नाहीत असे का? ह्याचे उत्तर मिळविण्यासाठी ४९ दिवस सलग ध्यानात राहून सर्व प्रश्नांची मुळापासून उत्तरे मिळवली आणि बुद्ध झाला. वय वर्ष ३५ ते ८० असे एकूण ४५ वर्षांचे उरलेले बुद्धावस्थेतले आयुष्य त्याने त्याला प्राप्त झालेले ज्ञान सामान्य जनतेला शिकवण्यात व्यतीत केले.
गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाहीसिद्ध झालेल्यांची आकडेवारी प्रसिद्ध होणारी ईन्डेक्स अजुनतरी अस्तित्वात नाही, ती तशी अस्तित्वात आल्यावर ह्या विधानाला काहीतरी अर्थ असू शकेल; सद्यपरिस्थितीत नाही. कारण गेल्या अडीच हजार वर्षात बुद्धाची शिकवण अजूनही टिकून आहे आणि आजही तितकीच मूलभुत आणि परिणामकारक आहे!
एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत'यालाच बुद्ध शून्यता म्हणतो' असं एकीकडे म्हणताना बुद्धाने शिकवलेल्या विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे असं लिहीणं हा प्रचंड विरोधाभास आहे. असं होण्याचं कारण, कदाचित पायर्या-पायर्यांची भलतीच साधना विपश्यना म्हणून केली असावी कारण विपश्यनेत कसल्याही पायर्या नाहीत. अर्धवट माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतांनी गैरसमज आणि चुकीची माहिती पसरु नये म्हणून हा प्रतिसाद. - (विनयशील अभ्यासू) सोकाजी
In reply to हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या by सोत्रि
सिद्ध झालेल्यांची आकडेवारी प्रसिद्ध होणारी ईन्डेक्स अजुनतरी अस्तित्वात नाहीसत्य स्वयंउद्घोषक आहे त्यामुळे सिद्ध त्याच्या आकलनाची अभिव्यक्ती करतोच करतो. अशा व्यक्ती अध्यात्मिक क्षितीजावर तारा बनून चमकू लागतात, त्यांचा इंडेक्स ठेवावा लागत नाही. विपश्यना मार्गातलं बुद्धनंतर असं कुणीही दिसत नाही. ३.
बुद्धाने शिकवलेल्या विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे असं लिहीणं हा प्रचंड विरोधाभास आहे. असं होण्याचं कारण, कदाचित पायर्या-पायर्यांची भलतीच साधना विपश्यना म्हणून केली असावी कारण विपश्यनेत कसल्याही पायर्या नाहीत.बुद्धाबद्दल मला नितांत आदर आहे पण त्याची प्रणाली (विपश्यना) सत्याप्रत आणू शकत नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे.
विपश्यनेत कसल्याही पायर्या नाहीत ?काय बोल्ता ? मग हे कुणी लिहिलं आहे ? विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!
In reply to हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या by सोत्रि
एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहेबाप्रे,काहीही म्हणा पण हे वाक्य भयंकर रोचक आहे.
In reply to एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे by कानडाऊ योगेशु
In reply to एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे by कानडाऊ योगेशु
In reply to ह्याच्यावर ब्लॅक मिरर चा ब्लॅक म्युसीअम नावाचा एपिसोड आहे. by शा वि कु
In reply to ह्याच्यावर ब्लॅक मिरर चा ब्लॅक म्युसीअम नावाचा एपिसोड आहे. by शा वि कु
In reply to @ शा वि कु : ब्लॅक म्युसिअमच्या लिंकबद्दल प्रचंड धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला (जवळजवळ निरुपयोगी) लेख वाचून;...संपादक मंडळ / व्यवस्थापन - संजय क्षीरसागर या आइडीवर तात्काळ कायमची बंदी घालण्यात यावी अशी नम्र विनंती.
In reply to आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर by कांदा लिंबू
तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.हे असेच का करायचे ? नुसतेच बसले तर का चालणार नाही. दुसरे , बुध्दाला जो काही उलगडा झाला त्याला आधार काय ?
In reply to तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात by मराठी_माणूस
नुसतेच बसले तर का चालणार नाही.नुसतं बसायची ध्यान पद्धती झेन मार्गात आहे पण त्या प्रक्रियेत साधक वर्षानुवर्ष भींतीसमोर बसून राहतो आणि मग एक दिवस अचानक त्याची मेंटल अॅक्टीविटी थांबते. म्हणजे
डोक्यात अविरत चाललेली बडबड आणि मनाचं भींतीवर होणारं दृश्य प्रक्षेपण थांबत; साधकाला सर्वव्यापी शांततेचा अनुभव येतो. माझ्या मेथडमधे हेच काम एका क्षणात होतं ! २.
दुसरे , बुध्दाला जो काही उलगडा झाला त्याला आधार काय ?शून्यता हा बुद्धाचा अद्वितीय अनुभव आहे. लेखात सांगितलेली साधना तुम्हाला त्याची प्रचिती देईल आणि तोच पुरावा आहे.
In reply to संक्षी तुम्ही लिहिते रहा. by आनन्दा
वर्तुळे विलग ठेवणे ही एक शारिरीक मानसिक कसरत आहे. ती फार काळ अथकपणे किंवा न कंटाळता टिकवता येईल किंवा कसे ते पाहावे लागेल.चाफेकळी ( = तर्जनी ) चे अंगुलगोल विलग धरायला प्रयास पडतात. मधल्या बोटांचे गोल करून पाहिले तर त्यामानाने माझा बराच सायास कमी झाला. अशाच प्रकारे भान जागतं राहावं म्हणून जिभेचा शेंडा तोंडाच्या पोकळीत तरंगत ठेवायची क्लृप्ती सांगितली आहे. आ.न., -गा.पै.
In reply to अस्पर्शित अंगुलगोल by गामा पैलवान
In reply to अस्पर्शित अंगुलगोल by गामा पैलवान
In reply to गांपै, by आनन्दा
In reply to यावरुन बालपणीची एक कथा धूसर by गवि
In reply to यावरुन बालपणीची एक कथा धूसर by गवि
तेलाने काठोकाठ भरलेले भांडे घेऊन प्रदक्षिणा किंवा मार्गक्रमण करायला सांगितले असता (एकही थेंब सांडता कामा नये ), ते नेहमीचे (सततचे) नामोच्चारणही विसरतात, किंवा त्या वेळेपुरता त्यांना सगळ्याचा विसर पडतो.पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी अशीच अनंत लफडी करुन ठेवली आहेत. त्यामुळे इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स निर्माण होण्याशिवाय काहीही साध्य होत नाही, शिवाय साधक अध्यात्माकडे कायमची पाठ फिरवतो ते वेगळंच. मी वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दोन गोलक एकमेकांना स्पर्शू न देणं (आणि उरलेली तीनही बोटं सहजपणे सरळ राहणं) हे एक भान आहे, तो त्राटकासारखा एकाग्र होण्याचा प्रयास नाही. हे भान जागृती आणतं आणि ती जागृती निर्विचारता आणते. कार चालवतांना आपल्याला कारची संपूर्ण आऊटर साईड आणि आतल्या क्लच-ब्रेक-अॅक्सीलरेटरचं भान असतं अगदी तसं, एकदम सहज, निष्प्रयास !
In reply to @ गवि : ध्यान आणि काँसंट्रेशन यात नेमका हाच फरक आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी, एक जेन्युइन प्रश्न - by सोत्रि
In reply to @ सोत्रि . माझी ध्यानपद्धती तुम्हाला अनंत करेल ! by संजय क्षीरसागर
In reply to अहं... by सोत्रि
In reply to पुन्हा वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to अहं... by सोत्रि
आपल्याला संपूर्ण शरीराची एकसंघ जाणीव होतेशरीरांची संपूर्ण जाणीव होणं अशक्य आहे... काहि स्पर्षजन्य जाणिवा सोडुन उर्वरीत शरिराची जाणिव होत नाहि. लेखात वर्णन केलेल्या ध्यानसाधनेत रमणाण झालेया व्यक्तीचे केस/नखं कापा... त्याला काहिच जाणिव होणार नाहि.. कारण शरीराच्या त्या भागाची जाणिव तशीही होत नाहि.
आपल्याला संपूर्ण शरीराची एकसंघ जाणीव होतेअसं कितीही म्हटलं तरी साधा प्रश उरतो कि कुठल्या मेकॅनीझमने हि जाणिव होते? शरीराची अवयव सिस्टीम / नर्व्हस सिस्टीम सर्व प्रकारच्या जाणिवांचे आदान-प्रदान करत असते. आता त्या पलिकडे हि जाणिव 'आपल्या' पर्यंत न्यायची म्हणजे 'आपल्यात' शरीराव्यतिरिक्त काहि अन्य सिस्टीम असायला हवी.
ते एक रहस्य आहेम्हणुन वेळ मारुन नेता येते. पण ते खरं उत्तर नाहि. शरीराच्या 'आत' कुणीच नाहि म्हटल्यावर
उत्सर्गहि संकल्पनाच बाद होते. थोडक्यात काय, तर शारीरीक/मानसीक व्यायाम आणि त्याचे फायदे उपभोगताना ते
शारीरीक्/मानसीकआहेत हे प्रामाणीकपणे कबुल करुन पुढे जावं. त्या व्यायामाच्या परिणामकारतेला त्यामुळे काहि बाधा येत नाहि.
In reply to अहं... by सोत्रि
In reply to @ सोत्रि : ध्यानानं तुम्ही निर्विचार झालात का ? by संजय क्षीरसागर
In reply to अहं... by सोत्रि
In reply to @ सोत्रि : मी पूर्वीच सविस्तर उत्तर दिलंय by संजय क्षीरसागर
In reply to गांपै, by आनन्दा
तुम्ही नामनुसंधान करा, नादानुसंधान करा, सोहम साधना करा.. अनेक श्रेष्ठ मार्ग आहेत.छ्यॅ , काही तरीच तुमचं =)))) संक्षींना इतर मार्ग मान्यच नाहीत हो, इतर सगळे मार्ग म्हणजे भ्रांती आहेत . इतर सगळे साधु संत सज्जन अन त्यांन्नी सांगितलेले साधना मार्ग हे सर्व व्यर्थ वायफळ आहे असे संक्षींचे मत आहे. इव्हन ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव नाही त्याही गोष्टी निरर्थक आहेत असे त्यांचे मत आहे. तुम्ही त्यांचे इतर लेखन काढुन वाचा म्हणजे तुम्हाला अजुन मजा येईल . =)))))
In reply to गांपै, by आनन्दा
In reply to अनुसंधान, विनय, इत्यादि by गामा पैलवान
डोक्यावरच्या टांगत्या शिळेस तोलून धरण्यास अनुसंधान म्हणतात हे नव्यानं लक्षांत आलं.याप्रकारच्या साधना सांगणारे आणि करायला लावणारे नाहक जीव धोक्यात घालतात, त्याचा शून्य उपयोग आहे. जैन धर्मातही असले भंपक प्रयोग चालतात आणि साधक देहाची वाट लावून घेतात. डोक्यावरची टांगती शिळा पडली तर कोण जवाबदार ? म्हणजे सत्याचा उलगडा राहिला बाजूल आणि ज्या बुद्धीनं विषय समजावून घ्यायचा तिच्यावर शिळा कोसळणार ! देहात कुणीही नाही हा अल्टीमेट उलगडा आहे तो तुम्हाला मृत्यूच्या भयापासून आणि व्यक्तिमत्त्वातून एकाचवेळी मुक्त करतो. म्हणजे तुम्ही मुक्त होताच पण आपण देहात आहोत आणि व्यक्ती आहोत या भ्रमांमुळे तो होत नव्हता. असल्या भंपक साधनांनी आध्यात्माची वाट लागली आहे, त्यामुळे लोक एकतर आध्यात्माकडे पाठ फिरवतात किंवा मग त्यांना प्रचंड इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स येतो. इक्झॅक्टली हाच मुद्दा माझ्या दुसर्या लेखात मांडला आहे, बघा!
In reply to अस्पर्शित अंगुलगोल by गामा पैलवान
In reply to @ गामा पैलवान : वेगळ्या मुद्रांनी नेमका उद्देश साध्य होणार नाही by संजय क्षीरसागर
In reply to @संक्षि:केल्यावर शरीर अगदी हलके होऊन वर वर जात असल्याचा भास झाला by चित्रगुप्त
In reply to धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! by टर्मीनेटर
In reply to धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! by टर्मीनेटर
तुम्ही सांगितलेली सोपी मुद्रा सहज कुतूहल म्हणून करून बघितली, आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर १००% नसली तरी बऱ्याच अंशी निर्विचार स्थितीची अनुभूती नक्कीच आली२.
दिवाळी निमित्त तुम्ही सर्वांना दिलेली 'अनमोल भेट' आवडली शा वि कु आणि गवि साहेबांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेतया प्रशंसेबद्दल अगदी मनापासून आभार्स ! ______________________________________ अध्यात्मात रस नसणारी व्यक्ती या जगात नाही, कारण प्रत्येक जण आहे त्या परिस्थितीत फक्त एकच गोष्ट शोधतोयं, ती म्हणजे आनंद ! अनाहूतपणे प्रत्येक जण स्वतःलाच शोधतोयं कारण तुम्ही स्वयेच आनंद आहात ! चित्र काढतांना आनंद होतो असं सकृद्दर्शनी जरी वाटलं तरी तो स्वतः- स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे झालेला असतो. चित्र ही त्या आनंदाची अभिव्यक्ती असते. अध्यात्मात रस नसणार्या लोकांच्या बाबतीत दोन गोष्टी असतात, एक म्हणजे आपणच आनंद असू याची त्यांना कल्पना नसते आणि दुसरं म्हणजे आजपर्यंत जगातल्या सिद्धांनी अध्यात्म इतकं क्लिष्ट करुन ठेवलं आहे की त्या भानगडीत न पडलो तर बरं असं वाटतं ! माझ्या अध्यात्माचा रंग वेगळा आहे. तुम्ही सांगितलेलं ध्यान करुन पाहा, तुम्हाला नक्की प्रचिती येईल.
In reply to @ टर्मीनेटर : तुमच्या सहकार्यामुळे मला पोस्ट अपलोड करता आली by संजय क्षीरसागर
In reply to @ टर्मीनेटर : चला, तुम्हाला खटकणारं वाक्य by संजय क्षीरसागर
In reply to @संजय क्षीरसागर - चांगलीच खोड मोडली तुमची by संगणकनंद
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला (जवळजवळ निरुपयोगी) लेख वाचून;......
या शेरेबाजीबद्दल माफी मागणार का आता?ते कसले माफी मागतात! प्यूबिक रिंगपासून ते मेमरी स्ट्रिंग्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी गाडीला पाय लावून पळ काढला आहे. वर सोत्री यांनी देखील एक साधा binary प्रश्न विचारला आहे, पण हे सदगृहस्थ झुडपाच्या आजूबाजूला झोडपत आहेत.
In reply to धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! by टर्मीनेटर
In reply to @सोत्री, by शाम भागवत
In reply to गुंफण कशी? by हणमंतअण्णा शंक…
In reply to असे ! by संजय क्षीरसागर
४. गोलक एकमेकांना स्पर्शू देऊ नका.म्हणजे तर्जनी आणि अंगठ्यात काही मिलिमिटरचे अंतर ठेवायचे असेच ना ?
In reply to ४. गोलक एकमेकांना स्पर्शू देऊ by मराठी_माणूस
In reply to @ मराठी_माणूस : इतका सायास नाही तो ! by संजय क्षीरसागर
In reply to (पहिला फोटो पाहा) by मराठी_माणूस
In reply to दोन्ही हातांचा हा फोटो पण वरच्या प्रतिसादात दिलाय की ! by संजय क्षीरसागर
In reply to असे ! by संजय क्षीरसागर
In reply to पुन्हा गोंधळ by हणमंतअण्णा शंक…
In reply to तुम्हाला पाठवलेला फोटो पाहा by संजय क्षीरसागर
In reply to इमेज दिसत नाही by हणमंतअण्णा शंक…
In reply to असे ! by संजय क्षीरसागर
In reply to तरंगती शिळा आणि अनुसंधान by गामा पैलवान
In reply to तरंगती शिळा आणि अनुसंधान by गामा पैलवान
In reply to गापै, by आनन्दा
In reply to अरे वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर, मी यापूर्वी देखील by आनन्दा
In reply to I too would like to read by nanaba
In reply to या बाबतीतले माझे अनुभव आणि by आनन्दा
In reply to अरे वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले अतिद्रिंय शक्तीचे अनुभव असतील तर वाचक म्हणून वाचायला आवडतील ?हा बघा तुमचाच अत्यंत मार्मिक प्रतिसाद ! (तो वाचून सकाळची सुरुवात प्रसन्न झाली आणि इतरांनाही मजा यावी म्हणून इथे देतो) : मंत्र म्हटल्याने एटीएममधील पैसे कार्ड न टाकता पीन कोड न टाकता काढून दाखवता येतील का ? दोन हजार सोळा उजाडले तरी अशा गोष्टी वाचल्या की वाईट वाटते हो बाकी काही नाही
In reply to तरंगती शिळा आणि अनुसंधान by गामा पैलवान
कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.