मिपाच्यावरी पंगती रंगलेल्या...
लेखनविषय:
आमची प्रेरणा पिवळा डांबिस यांची पंगत -२
मिपाच्यावरी पंगती रंगलेल्या...
यलोनॉटि हा काढतो खूप खोड्या...
मिपाकर असे वाचुनि तृप्त झाले...
प्रतिसाद त्या देवुनि बोळविले...
(पंगतीत गप्प केलेला) केशवसुमार
वाचने
4030
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
येलोनॉटीने सर्व खोड्या कराव्या
केसुगुर्जीने त्यां गीतीं घोळव्याव्या !
"वा , वा " देता देता , नाकां पाणी गेले
मिपाकर असे , हास्य-पूरीं बुडाले !
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
:)
:)
अकस्मात पाहून या पंगतीला
मना थोर आनंदठेवा मिळाला
अहोरात्र येथे मजेने फिरावे
मना सज्जना पोट धरुनी हसावे!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
सुरापान थट्टा यलोनॉटि द्वारे
वदे का असा आज 'तात्यामुखी' रे
तया कारणे भाव शालामधूचे
जणू त्यास भासे विडंबीत साचे!
चतुरंग
अहो केशवसुमारराव,
त्या पंगतीत गप्प करतानाचे विडंबनही पूर्ण करा की ;)
हरीने पळविल्या, राधिकेच्या चोळ्या...
..........
In reply to छान.... by देवदत्त
हां, गुरुदेव!
होऊन जाऊ द्या!!!:)
तुम्हाला काय, चुटकीसरशी कराल!!
आमचा प्रतिसाद इथे पहा....
:)
बाकी मुसु, रंगा, क्रांती....
श्लोक जोरदार!!!!
:)
मूळ श्लोकाचे विडंबन आम्ही सादर करतोय -
हरीच्या घरी रेशमी वस्त्र चोळ्या...
हरी राखितो लाज ती वेळोवेळा....
जगत्बंधु हा पाहुनी सूख झाले...
पिडा टाळली दु:ख गंगे मिळाले!
चतुरंग
In reply to आमच्या गुर्जींच्या वतीने by चतुरंग
पिडा टाळली दु:ख गंगे मिळाले!
म्हणजे पिवळ्या डांबिसाला टाळून गंगेला मिळवले असे उभयार्थीसूचक आहे काय?
ह. घ्या.
(टवाळ)बेसनलाडू
In reply to पिडा टाळली by बेसनलाडू
म्हणजे पिवळ्या डांबिसाला टाळून गंगेला मिळवले असे उभयार्थीसूचक आहे काय?
नाय! पिवळ्या डांबिसाला टाळून चतुरंग गंगीला मिळायला गेले, असं म्हणायचंय त्यांना!!!!
:)
ओ चतुरंग,
मूळ श्लोकाचं विडंबन कुणीही करेल हो! आम्ही दिलेली पहिली ओळ तशीच ठेवून मग उरलेला श्लोक पूर्ण करून दाखवा!!!!
तुम्ही केलांत तर आम्हीही आमचं व्हर्शन इथे लिहू! प्रॉमिस!!!
:)
In reply to म्हणजे by पिवळा डांबिस
नाय! पिवळ्या डांबिसाला टाळून चतुरंग गंगीला मिळायला गेले, असं म्हणायचंय त्यांना!!!!हीच ती ड्यांबीस मात्रा जिथे काना डोळा करता येत नाही प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to म्हणजे by पिवळा डांबिस
'मना सज्जना भक्ति पंथेचि जावे' ह्या चालीत/वृत्तात आहे त्यामुळे त्याचे विडंबन त्याच चालीत/वृत्तात व्हायला हवे.
तुमची पहिली ओळ त्या चालीत/वृत्तात नाहीये त्यामुळे त्याला विडंबन म्हणता येणार नाही!
काय म्हणताय बोला! :)
चतुरंग
हा हा