प्रेरणास्थान: http://www.misalpav.com/node/47778
सदर धाग्यावरुन सुचल्याने आभार मानतो. आता मला माझ्याच एका प्रॉब्लेमबद्दल कोणी मदत करु शकेल का पहा.
सदर धाग्यात गायनकला चांगली नसणार्यांचे स्वानंदासाठी गायन याबद्दल लिहिले आहे.ही कला माझ्याकडेही आहे.म्हणजे मलाही गायनाची आवड आहे.गाणी गुणगुणायला आवडतात.याउप्पर शीळही चांगली घालतो.यासोबतच मला चित्रेदेखील चांगली काढता येतात.कागदापासून विविध वस्तू बनवतो. सिद्धहस्त लेखक नसलो आणि लेखनाला साहित्यिक दर्जा नसला तरी स्वानंदासाठी लिहितो.विविध भारतीय भाषा शिकतो.मराठी भाषा शिकायला कोणी परप्रांतीय इच्छुक असेल तर त्यांना मला जमेल तितकी शिकवतोसुद्धा. अवांतर वाचनाचीही बर्यापैकी आवड आहे.असे बरेच आहेत.छंदीफंदीच आहे. ; )
पण हे सर्व मला बंद करायचे आहे.कारण या गोष्टींपासून आर्थिक फायदा काडीचाही नाही.होण्याची शक्यताही दुरापास्त वाटते.तस्मात पदरमोड करुन बाळगलेले हे छंद/आवडी वेळ आणि पैसा दोन्हीसाठी मारक आहेत.ते बंद करुन रोजीरोटीच्या क्षेत्रातले (अभियांत्रिकी) काही शिकण्याला वेळ देता येईल जेणेकरुन नोकरीत पगारवाढ किंवा प्रमोशन होईल किंवा स्किलसेट निदान अपडेट तरी करता येईल.
वर उल्लेखलेल्या काही छंदांना/आवडींना बर्यापैकी लगाम घातला आहे. उदा.चित्रकला जवळजवळ ९०% बंद केली आहे. कधीतरी हुक्की आलीच तर कागदावर चारदोन रेघोट्या. कागद/पुठ्ठ्यांपासून वस्तू बनवणे हे पण बंद केले. विशेषत: अभ्या... या आयडीने याचे वास्तव दर्शवले.त्यामुळे तो ही बंद करायला मदत झाली.त्याबद्दल अभ्या यांचे आभार!
पण काही छंद अजून टिकून आहेत.तर ते कायमचे किंवा निदान दीर्घकाळ तरी कसे बंद करता येतील? मनातून पूर्णपणे उतरावेत यासाठी काय करता येईल?
हे असे अनावश्यक उपद्व्याप आपल्यापैकी देखील काहीजणांना असू शकतात.उदा. इतिहासविषयक लेखन किंवा कविता लेखन इत्यादी.(बहुतेक लिहित्या मिपाकरांना लेखनाची आवड असतेच.म्हणून तसे म्हटले आहे.) यातल्या काहीजणांना आपल्या लेखनाचे पुस्तक छापावे असेही वाटू शकते.पण मराठी पुस्तक प्रकाशन हा तोट्याचा धंदा आहे.त्याबद्दलचा हा माझाच विस्तृत प्रतिसाद.http://www.misalpav.com/comment/1083558#comment-1083558
अशा वेळखाऊ नि पैसेखाऊ/कंडूशमनार्थ उपद्व्यापांकडे तुम्ही कसे पाहता? ते कमी किंवा मनातून नाहीसे करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? काय उपाय केलेत? कसं नियंत्रण ठेवता?
मार्गदर्शकांचे आधीच आभार! _/\_
वर्गीकरण
वाचने
18365
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि मिपावरती पडीक राहुन पिंका
छान
जो पर्यंत लोकांनी स्वखुशीने
@साहना प्रतिसाद
In reply to जो पर्यंत लोकांनी स्वखुशीने by साहना
छंद आणि वेळ
@कंजूस
In reply to छंद आणि वेळ by कंजूस
पण या छंदाफंदापायी वेळ नि
In reply to @कंजूस by उपयोजक
हम्म
माईसाहेब
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्हाला मिसळ पाव पासून काय
In reply to माईसाहेब by उपयोजक
@ माईसाहेब कुरसूंदीकर : पर्फेक्ट !
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा :))
In reply to @ माईसाहेब कुरसूंदीकर : पर्फेक्ट ! by संजय क्षीरसागर
त्यापेक्षाही कमाल म्हणजे
In reply to हा हा हा :)) by उपयोजक
स्त्रीसंगाचा फक्त एकच उपयोग
In reply to त्यापेक्षाही कमाल म्हणजे by संजय क्षीरसागर
"बायकोवर होणार अफाट खर्च
In reply to स्त्रीसंगाचा फक्त एकच उपयोग by सुबोध खरे
अरे देवा
In reply to त्यापेक्षाही कमाल म्हणजे by संजय क्षीरसागर
तुमची न आलेली साईट
In reply to @ माईसाहेब कुरसूंदीकर : पर्फेक्ट ! by संजय क्षीरसागर
तो तुम्हाला पकला असेल
In reply to @ माईसाहेब कुरसूंदीकर : पर्फेक्ट ! by संजय क्षीरसागर
आम्ही बारा जणं होतो
In reply to तो तुम्हाला पकला असेल by ताजे प्रेत
ते विविध कायप्पा
विचार करायला भाग पाडणारा लेख
@सिरुसेरि यावरुन आठवले. फेसबुक
In reply to विचार करायला भाग पाडणारा लेख by सिरुसेरि
मग?
In reply to @सिरुसेरि यावरुन आठवले. फेसबुक by उपयोजक
हौशी श्रीमंतांनी आपल्या ईस्टेटी
बाप रे!
In reply to हौशी श्रीमंतांनी आपल्या ईस्टेटी by कंजूस
हीहीही.
In reply to बाप रे! by रानरेडा
पैसा व छंद ...दोन्ही ..
विक्टर फ्रान्क्ल चे पुस्तक वाचा.
@Jayant Naik
In reply to विक्टर फ्रान्क्ल चे पुस्तक वाचा. by Jayant Naik
क्या करू?
अत्यंत वास्तववादी प्रतिसाद
In reply to क्या करू? by हणमंतअण्णा शंक…
कुटुंबापासून लपवून
In reply to क्या करू? by हणमंतअण्णा शंक…
हणमंतअण्णा शंकर...
In reply to क्या करू? by हणमंतअण्णा शंक…