नवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण
चौडेश्वरी देवी
मुनेश्वर
साईबाबा
मोहक श्रीगणेश
नागदेवता
अजुन दोन मूर्त्या
ज्या हातांनी देवीची हि सुंदर रुपे साकारली त्यांना आदरांजली वाहली नाही तर ह्या धाग्यासोबात न्याय होनार नाही. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जपत, नऊ दिवस कल्पकतेची उदाहरणे ज्यांनी दाखवले ते मंदिराचे पुजारी.
हा लेख रोज संपादित करण्याची सोय केल्या बद्दल संपादक मंडाळाचे विशेष आभार. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा _/\_
नवमी
आज देवीच्या फोटोकडे वळण्याआधी इकडच्या छान प्रथेबद्द्ल थोडसं-लिंबाचे दिवे. लिंबु अर्धा कापुन त्यातला रस काढुन राहिलेली साल उलटी केली की त्याचा वाटिसाखा आकार बनतो. मग त्यात तुपाची वात घालुन पणती बनते. असे छोटे छोटे दिवे बनवून ते एका थाळीमध्ये ठेवून मग स्त्रिया देवीला ओवाळतात.नंतर ते मंदिराच्या परिसरात ठेवले जातात.
आता आजच्या आरासाबद्द्ल. आपण परमेश्वराचं दर्शन घेतो ते सहसा अर्धच.
जसं की देवीचं हे स्वरुप
किंवा देवाचं हे स्वरूप.
पण परमेश्वराचं पूर्णे स्वरुप बनतं पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाने आणि तेच स्वरुप पिलेकाम्मने धारण केले होते- अर्धनारीश्वर. स्री-पुरूष एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसुन ते एकमेकांना पुर्णेता देणारे नैसार्गाचे घटक आहेत. मिलनातही ते स्वत:चं अस्तित्व टिकवुन ठेवु शकतात - हा संदेश देणारं हे स्वरुप.
अर्धनारीश्वरसाठी गाभार्याला आज हिमालयाचं स्वरुप देण्यात आलं होत.
चौडेश्वरी देवींची आज दश्भुजा दुर्गा-परमेश्वरी स्वरुपात आरास झाली.
अष्टमी
अष्टमी निमित्त चौडेश्वरीने महिशासूरमर्दिनी रुप साकरले तर ते पिलेकम्माने महाकाली रुप धारण केले.
चौडेश्वरी आज सिंहारुढ आहे आणि तिच्या हातामध्ये त्रिशुल आहे. खाली एक कोहळा महिषासुर स्वरुपात ठेवला आहे.
महाकाली स्वरुपात असलेल्या पिलेकाम्माच्या गळ्यात कवट्यांची माळ आहे ( म्हणुन ह्या स्वरुपाला बहुदा कपालिनी सुद्धा म्हणतात. ) तिच्या एका हातामध्ये रक्तबीजाचं कापलेलं धड आहे. तसचं तिच्या हातामध्ये त्रिशुल सुद्धा आहे.
सप्तमी
सप्तमीनिमित्त पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी दोघींची सरस्वती स्वरुपात पूजा झाली.
पिलेकाम्माचा पोषाख आज भस्मापासुन बनला होता आणि तिने हातात वीणा धारण केली आहे.
चौडेश्वरी आज शुभ्रवस्त्र, श्वेत पद्मावर , हातामध्ये वीणा अशा स्वरुपात आहे. शेजारी वह्या-पुस्तकांची आरास करण्यात आली आहे. हंसाची प्रतिमासुद्धा त्यात आहे.
कमळाच्या पाकळीवर विसावलेले देवीचे चरण
हस्तमुद्रांचे काहि फोटो
षष्ठी
आज पिलेकाम्माची स्वरुपात तर चौडेश्वरीची हुआ करगा((द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली.
पिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होता
हुआ करगा म्हणजे फुलांचा मुकट परिधान केलेली द्रौपदी असं आज चौडेश्वरी देवीचं साकारण्यात आलं होत.
पंचमी
आज पंचमीनिम्मित्त पिलेकाम्माची पंचवर्णा स्वरुपात तर चौडेश्वरीची हसी करगा(द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली.
पिलेकाम्माचा पोषाखामध्ये आज पाच रंगछटांचा समावेश होता
दक्षिण भारतामध्ये द्रौपदी ही एक प्रमुख देवी आहे. बंगलोरचा तिच्या नावाने केला जाणारे करगा उत्सव खुप प्रसिद्ध आहे. आज चौडेश्वरीची हसी करगा स्वरुपात पूजा झाली. (हसी हा शब्द कोवळी, नाजुक, कच्ची, हिरवी अशा अर्थाने वापरला जातो तर करगा म्हणजे मुकुट. कदाचित कळ्यांच्या मुकुट असा अर्थ असेल . जो शंकु सारख्या आकाराचा तिच्या हातामध्ये दिसतो तो, ऊद्या तोच मुकुट तिच्या डोक्यावार ठेवला जाईल) . तिच्या एक हातामध्ये खंजीर सुद्धा आहे आहे.
चतुर्थि
चौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघीही आज अन्नपुर्णा स्वरूपात होत्या. पंरंपरेनुसार भिक्षुक स्वरुपात आलेल्या महादेवाला अन्नदान देनारी देवी असे तिचे स्वरुप दाखवन्यात येते. अन्नपुर्णा ही सर्व जिवांच पोषण करनारी देवता आहे.
चौडेश्वरीच्याआरासाची सुरुवात आज मंदिराच्या बाहेरुनच झाली. बाहेर छोटिशी भातशेती तयार केली होती आणि गाभार्याबाहेर भातकुटांची रास सुद्धा रचली होती .
देवीने आज लाल काठाचा पोपटी शालु परिधान केला आहे. तिच्या उजव्या हातमध्ये पळी आहे, डाव्या काखेमध्ये अक्षय पात्र आहे ज्यातुन सतत तांदळाचा प्रवाह वाहतो आहे. आणि डाव्या हातामध्ये अन्न आहे जे ती शेजारी स्थापित महादेवाला दान देनार आहे
पिलेकाम्माचा संपुर्ण पोषाख आज लाल आणि पिवळ्या गुलाबांच्या फुलांनी बनवण्यात आला आहे.
तृतिया
चौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघींनी आज सम्रुद्धि आणि ऐश्वर्याची देवता असनार्या महालक्ष्मीचं स्वरुप धारण केलं.
पिलेक्कामाचा गाभारा नोटांनी सजवला होता, तर तिचा पोषाख चमकीने बनवला होता.
चौडेश्वरीने आज निळा शालु परिधान केली असुन ती कमळाच्या फुलवार स्थानापन्न आहे . तिने अभय मुद्रा धारण केली असुन हातामधुन नाण्यांचा प्रवाह वाहतो आहे असा आभास निर्माण केला गेला आहे
द्वितिया:
चौडेश्वरीची राजराजेश्वरी स्वरुपात तर पिलेकाम्माची ब्रह्मचारीणी स्वरुपात पूजा झाली. राजराजेश्वरी हि संपुर्ण विश्वावर सत्ता चालवणारी देवी आहे तर ब्रह्मचारीणी सर्व ऐश्वर्याचा त्याग करुन महादेवाला वर स्वरुपात प्राप्त करुन घेण्यासाठी खडतर तप करणारे सती स्वरुप आहे. दोन्हि पार्वतीचीच रुप. पण हा विरोधाभास आयुष्याचा अविभाज्य अंग असनार्या सम्रुद्धी आणि कष्ट किंवा अडचणी ह्या सत्याची जाणीव करुन देतो. कठिण आणि हलाकिच्या परिस्थिती मध्ये प्रामाणिकपणे हिंमत न हारता कष्ट करत रहाणे तर सम्रुद्धीच्या काळात विनम्र, न्यायप्रिय आणि क्षमाशील रहाणे हे शक्तीचा परिचय देणारे गुण्धर्म आहेत, कदाचित हेच देवीची ही दोन्हि रुपं आपल्याला सांगत असतील.
ब्र्हमचारीणि स्वरुप खाऊच्या पानांच्या पोषाखाने साकरला गेलं आहे.
राजराजेश्वरी स्वरुप , लालसर रंगाचा शालु आणि दागिन्यांनी साकारण्यात आले आहे. डोक्यवार महादेवाप्रमाणे चंद्रकोर तर मागिल दोन हातांमध्ये विष्णुप्रमाणे शंख व चक्र आहे. त्रिदवांच्या सर्व शक्ती तिच्याकडे आहेत हे दाखवून देतात.
प्रतिपदा :
काल दोन्ही देवींची कामाक्षी स्वरूपात पूजा झाली. महादेवाची तपश्चर्या खंडित केल्यामुळे , क्रोधीत महादेव कामदेवाला भस्म करून टाकतात. पण त्यानंतर पर्वतीवर मोहित होऊन ते वैराग्य त्यागतात. देवीचे ते सवरूप म्हणजे कामाक्षी. हि इच्छाशक्ती, सृजन आणि प्रीती ह्याची देवी मानली जाते. आणि कामदेवाची सारी चिन्हे देवीकडे आहेत. जसेकी त्याचे वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण . तिच्याबद्दल अजून एक गोष्ट वाचनात आली- भस्म झालेल्या कामदेवाच्या राखेपासून भांड नावाचा एक राक्षस बनतो. त्याच्या मृत्यूसाठी इंद्रदेव यज्ञ करतात आणि त्या यज्ञातून कामाक्षी प्रकट होते. हि घटना कांची इथे झाली असे मानली जाते. कांचिच्या कामाक्षी मंदिराशी जोडलेल्या अशा अनेक गोष्टी प्रचलित आहेत .
आधी पाहूया पिलेकम्माची आरास. देविचा पोशाख हळद आणि कुंकू ह्या दोन्हीच्या लेपाने बनवला आहे . अलंकारामध्ये पक्ष्याच्या आकाराचे दागिने आहेत
तर चौडेश्वरीला हिरवा शालू नेसवाला आहे , हातावर तसेच खांदयावर पोपट ठेवले आहेत.
सर्वाना नवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा In reply to देवीचे फोटो अगदी अप्रतिम आहेत by प्रसाद_१९८२
In reply to वा! by नूतन
... वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण .अशी सजावट म्हणजे फळे, फुले, पाने, भाज्या रोपटी, हळद, कुंकू इ. विविध नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट म्हणजे बंगळुरूची खासीयत आहे. ही सुंदरता खुप भारी वाटते बघायला ! मस्त हो पॉइंट ब्लँकजी ! रोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील ! || नवरात्र हार्दिक शुभेच्छा ||
In reply to व्वा, खुप सुंदर ! देवीचे फोटो by चौथा कोनाडा
In reply to दक्षिणेत फार कमी देवळात by अनिंद्य
In reply to देवळातले फोटो by कंजूस
In reply to देवळातले फोटो by कंजूस
In reply to बेंगळूरु by रोहित रामचंद्रय्या
In reply to सुंदर फोटो आणि माहिती by गोरगावलेकर
In reply to अप्रतिम!! by तुषार काळभोर
In reply to जुनी मंदिरे, गर्दीची by चौथा कोनाडा
In reply to हो. पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी by पॉइंट ब्लँक
In reply to पुजेतली मंदिरे by कंजूस
In reply to वाह! by जुइ
In reply to छान by Gk
In reply to सुरेख. by शा वि कु
In reply to वा...! फोटो एकदम सुरेख आलेत. by प्रचेतस
In reply to सुरेख चित्रमय नवरात्री लेख by चांदणे संदीप
पिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होताही लोण्याची कला भारी असते ! खरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते !
In reply to द्वितिया: तृतिया. चतुर्थी, by चौथा कोनाडा
In reply to अतिशय सुंदर by तुषार काळभोर
In reply to सुरेख! by तुषार काळभोर
In reply to रोजची वेगवेगळी सजावट खुपच आवडते आहे. by गोरगावलेकर
In reply to व्वा, अष्टमी निमित्त देवीचे by चौथा कोनाडा
In reply to जबरदस्त कल्पकता by तुषार काळभोर
In reply to ता क by तुषार काळभोर
In reply to फोटोसकट वर्णन लाजवाब !! by शेखरमोघे
In reply to +१ by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mahalakshmi Ashtakam I Uthara UnnikrishnanIn reply to सुंदर फोटो ! धागा उघडल्याचे by मदनबाण
In reply to सुंदर फोटो ! धागा उघडल्याचे by मदनबाण
In reply to सुंदर फोटो ! धागा उघडल्याचे by मदनबाण
देवीचे फोटो अगदी अप्रतिम आहेत