पहिली भेट
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवते तुला भेट आपली पहिली
पहिल्या भेटीतली गुपिते पहिली
हवे तर विचार त्या लाटांना
रोजच येतात त्या किनार्याच्या भेटीला
सुर्यही तुझी वाट पाहत रेंगाळला होता
तू आलेला पाहुन निर्धास्त मावळला होता
यायला तुला खुप उशिरच झाला होता
पण तुझ्या आगमनात अपराधी भावच नव्हता
माझा रागही मी तेंव्हा व्यक्त केला नव्हता
जवळून तुला न्याहाळण्याचा धिरही होत नव्हता
बसलो होतो आपण ज्या दगडावर, विचार त्याला
माझा थरथरता देह त्यानेच सावरला होता
विचार त्या घोंघावत्या वार्याला
तो ही सांगेल माझी ती ओशाळली स्थिती
जेंव्हा तू हात माझा धरलास बांगडी पाहण्यासाठी
दुरावा दुर करण्याचे तुझेही ते होते निमित्त
पण तुझ्यात हरवले होते तेंव्हा एकचित्त
ज्या अंधाराने आपली मने जुळवली
आजही हसतो तो माझ्याशी
तो रोजच आठवण करुन देतो
आपल्या पहिल्या भेटीची
वाचने
3260
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
पहिलीच भेट झाली
छान.
पहिल्या
पहिली भेट
सूर्याचें रेंगाळणे, .....
माझ्याही आठवणी जाग्या झाल्या...
धन्यवाद