मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाहि बरे...

jenie · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अप्सारानी श्वापदाना भाळाणे नाही बरे.. माणसानी माणसाना टाळणे नाही बरे.. चुकवली जरी उत्तरे नशिबाने कधी.. वेदनानी वेदनाना जाळणे नाही बरे.. दाखावली 'करुणा' पारध्याने कधी.. हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे.. नाकारली जरी कवीता रसीकानी कधी.. अक्षरानी अक्षराना हेटाळणे नाही बरे.. ग्रिष्र्माच्या झेलुन ज्वाळा सावली झाले कधी.. श्रावणाच्या ऐनवेळीचे वागणे नाही बरे.. अज्ञाताच्या गर्दिला तु वाहतो श्रद्धांजली.. यादीत त्या नाव माझे गाळणे नाही बरे.. मेलो जरि असलो आम्ही कधी काळी .. असे सहज आम्हाला तुम्ही विसरणे नाही बरे.. स्वर्गाच्या ऐवजी नरकत गेलो आम्ही कधी .. नावाच्या अलीकडे 'स्व' लावणे नही बरे..

वाचने 2045 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रमोद देव Fri, 04/03/2009 - 12:23
मात्र टंकलेखनाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका टाळता आल्या तर पाहा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

jenie Fri, 04/03/2009 - 14:34
मी एक लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत केला होता, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते. आणि या पुढे टंकलेखनाचा सराव करेन.

अनिल हटेला Fri, 04/03/2009 - 17:46
"दाखावली 'करुणा' पारध्याने कधी.. हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे.." :-) कविता आवडली !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..