टेम्पुरा टोफू आणि नुडल

चौकस२१२ पाककृती
टेम्पुरा टोफू आणि नुडल साहित्य: टोफू ( पनीर सारखा दिसणारा परंतु दुधाचा नाही , यात अगदी लिबलिबीत पासून ते घट्ट कोरडा असे प्रकार मिळतात , या पाकृ साठी मध्यम किंवा कोरडा वापरावा) टेम्पुरा पिठी ( जपानी भज्यांचे आवरण , हे मैदा आणि मक्याच्या पिठी पासून बनवलेले असते त्यामुळे उपलब्ध नसल्यास हि दोन पीठे + मीठ + थोडी कालि मिरी घालूं घरी करता येते , भज्यांचे असे म्हणले परंतु याऐवजी नेहमीचे चण्याच्या डाळीचे पीठ वापरू नये ) कांदा, लसूण, हिरवी किंवा तांबडी ढोबळी मिरची, गाजर , लेटस , टोमॅटो , पातीचा कांदा तयार झटपट नुडल व त्याचे मसाले ( मी इनोडोनेशियन पद्धतीचे वापरले आहेत त्यात मसाल्यात स्वतःचे तेल, तांबडय मिरची चे सॉस आणि केचप मनीस नावाचे गोडसर आणि घट्ट सोया सॉस असते ) क्रुति - टोफू चे तुकडे करून त्या चे जे पाणी असते ते थोडे ठेवावे व हे टेम्पुरा पिठी मध्ये घोळवावे.. भज्यासारखे नाही तर तसे कोरडेच ठेवावे - टोफू तेलात सोनेरी होईपर्यंत तळावे आणि कोमट असताना त्यावर नुडल च्या पाकिटातील मसाले थोडे भुरभुरावे , चवीस मीठ - तेलात लसूण कांदा परतून इतर भाज्या ( टोमॅटो आणि लेटस सोडून ) परतून घेणे थोडे सोय सॉस घालावे - नुडल पाकिटातील कृती प्रमाणे करून घेणे ( पाहिजे असल्यास त्यावर एक तळलेले अंडे घालावे ) वाढणे : सर्व एकत्र करावं किंवा वेगवेगळे वाढावे सोबत एखादी मस्त शिराझ https://flic.kr/p/2jqVnSH https://flic.kr/p/2jqVpto https://flic.kr/p/2jqZweU https://flic.kr/p/2jqZt1e https://flic.kr/p/2jqZudj https://flic.kr/p/2jqZuMf https://flic.kr/p/2jqYb7F https://flic.kr/p/2jqZvMb

1 टिप्पण्या 3,659 दृश्ये

Comments