मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चेहरा

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चेहर्‍या मागे चेहरे दडलेला खरे-खोटे कुणास कळला? प्रत्येकाचा रंग वेगळा काळा, गोरा कुणी सावळा गोर्‍यात कधी काळा लपलेला काळ्यावरती गोरा फासलेला सावळ्याचाही रंग वेगळा प्रत्येक चेहर्‍याचा भाव वेगळा भाव-भावातही लपंडाव चालला दुसर्‍यच्या दु:खात सुख दडलेला सुखात दुसर्‍याच्या चेहरा पडलेला होवो प्रत्येक चेहरा समानतेचा पारदर्शी माणूसकीचा अन सुंदर, सज्जन निर्मळतेचा.

वाचने 4573 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सँडी गुरुवार, 04/02/2009 - 14:08
काळा, गोरा कुणी सावळा गोर्‍यात कधी काळा लपलेला काळ्यावरती गोरा फासलेला सावळ्याचाही रंग वेगळा दुसर्‍यच्या दु:खात सुख दडलेला सुखात दुसर्‍याच्या चेहरा पडलेला खुपच छान कविता! लिहित रहा. - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.

नरेश_ गुरुवार, 04/02/2009 - 14:13
होवो प्रत्येक चेहरा समानतेचा पारदर्शी माणूसकीचा अन सुंदर, सज्जन निर्मळतेचा. हे वाचून थेट पसायदान आठवले. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

सूहास गुरुवार, 04/02/2009 - 15:32
सुहास.. आमच्यात रेडवाईन गळ्याखाली जाईपर्यन्त कामे केली जात नाही

क्रान्ति गुरुवार, 04/02/2009 - 18:54
कविता सुरेखच आणि अंतिम पंक्ति तर खास! खरच पसायदान आठवल. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

मदनबाण Fri, 04/03/2009 - 04:44
ह्म्म.. छान. मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...

जागु Fri, 04/03/2009 - 11:09
सँडी, नरेश, सुहास्,अनामिक, क्रांती, प्राजू, मदनबाण तुमचे खुप खुप धन्यवाद.