Skip to main content

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

लेखक रातराणी यांनी बुधवार, 24/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला. झाकण काढेन, अशी अख्खी झुकून मी कुकरची वाफ घ्यायला बघेन. तेवढंच स्टीम क्लिनिंग.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. पाणी टाकायला विसरल्याने झालेला बटाट्याचा कोळसा, आता कसे वडे करू? तू आता कुकर कसा घासायचा या चिंतेत असशील मी हसून पुन्हा मोबाईलमध्ये नवी रेसिपी बघायला सुरू करेन,आत्मविश्वासाने इझी, बिगीनर असे किवर्ड टाकेन बघेन सोपं काही सापडतंय का आणि मग... ..... पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, तेव्हा तुला अरबट चरबट खावंसं वाटेल ना, सिंकमधली भांडी आठवून तुझी भूक मरेल ना?????
लेखनविषय:

वाचने 14469
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

काही खर नाही बाबा.. त्या युट्युब रेसिप्यांनी तर जाम वैताग आणला आहे या लॉकडाउनच्या काळात. उध्दवा लवकर हाटेलं सुरु कर रे बाबा, लै लोकांचे दुवे मिळतील तुला पैजारबुवा,

सिंकमधली भांडी आठवून माझीच भूक मेली. ;) सं - दी - प

दंडवत स्वीकारा! (रच्याकने, पाणी न घालता कुकरला शिट्ट्या कशा होतील? आजकालच्या कुकरांचे काही सांगता येत नाही ब्वॉ!) ;-)

In reply to by एस

या लॉकडाउन मुळे स्वयंपाकातले बारकावे सगळ्यांना माहित झाले आहेत, युट्युब सुगरणींनो लिहितांना काळजी घ्या... घरी वाट्टेल ते मुकाट खात असलो तरी...इथे वाट्टेल ते लिहिलेले खपवून घेतले जाणार नाही.. पैजारबुवा,