असा भास होतो
आभास होतो कसा त्रास होतो
तू येत आहे असा भास होतो
स्मरतो गजरा केसात माळलेला
माझा कसा मोगरा श्वास होतो
डोळ्यात जादू तिच्या पेरलेली
जो पाहतो तो तिचा दास होतो
कळायचे मला ती न बोलताही
साथी कधी तोच मी खास होतो
असे कुणी का इतके आवडावे
जो जीवनाचा खरा ध्यास होतो
वाचने
2625
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
आभास होतो कसा त्रास होतो
तू येत आहे असा भास होतो
मस्त
स्मरतो गजरा केसात माळलेला
माझा कसा मोगरा श्वास होतो
इथे जरा बदल केला तर मीटर मध्ये फरक नाही पणा ऐकायला बरं वाटतं बघा
स्मरतो गजरा केसात माळलेला
मोगरा कसा माझा श्वास होतो
आणि ही ओळ मस्ता आहे.
कळायचे मला ती न बोलताही
साथी कधी तोच मी खास होतो
In reply to स्मरतो गजरा केसात माळलेला by सनईचौघडा
धन्यवाद योग्य बदल सुचवला आहे !
अप्रतिम!!
उत्तम प्रयत्न!
लिहीत रहा,लेखनात सफाई येत राहील.
>>>डोळ्यात जादू तिच्या पेरलेली
जो पाहतो तो तिचा दास होतो>>>हा छान झाला आहे.
आभास होतो कसा त्रास होतो