गाण्यास पावसाच्या...
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
होतील बघ सुरंगी लाजून गाल हे
भेटीत पावसाच्या हाती मशाल दे!
भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी
स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे!
शिणतीलही जराश्या गजर्यातल्या कळ्या
तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे!
—सत्यजित
वाचने
15947
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
प्रतिक्रिया
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी
स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे!
वाह.. निव्वळ अप्रतिम थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
वा वा, खूप छान.
वाह! क्या बात है!
आवडली
भारी!!
सुंदर !
सुंदर !
आवडली रचना.
सं - दी - प
In reply to सुरेख! by चांदणे संदीप
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा... ह्या सांज गारवा अल्बमधल्या गाण्याची चाल याही रचनेला फिट्ट बसतेय.
मस्त वाटतेय गुणगुणायला. :)
सं - दी - प
होतील बघ सुरंगी लाजून गाल हे
भेटीत पावसाच्या हाती मशाल दे!
मस्त
क्या बात है. रचना एकदम खास, आवडली.
-दिलीप बिरुटे
चिंब भिजलो वाचून. व्वा!
आवडली
वर्षभराहून अधीक वेळ लेखन-विश्रांतीनंतर पोस्टलेलं हे नवखंच लेखन!
आपण सर्वानी भरपूर दाद दिली,त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
कुर्निसात !
In reply to कुर्निसात ! by अत्रुप्त आत्मा
मनःपूर्वक धन्यवाद!
वाह! ब-याच कालानंतर वाचायला मिळाली तुमची कविता!
In reply to वाह! ब-याच कालानंतर वाचायला by प्राची अश्विनी
धन्यवाद प्राची!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती