कविता पूर्ण करा...
सहज या दोन ओळी सुचल्या.. कोणाला ही कविता पूर्ण करावी वाटली तर जरूर करावी. कोणाला दुसरे कडवे सुचले तर लिहावे.
ही कविता पूर्ण करण्यांस मदत करावी.
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
- प्राजु
वाचने
6698
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
अश्रू पुसू पहातो तो कृष्ण हाळवा
जाणून घ्यावया ते गूज आतले
सांगे विभोर नयनी कंपित या स्वराने
नवे घेतले ते कॉन्टॅक्ट लेन्स खुपले !!
-- (वृत्त मात्रा न जाणणारा) लिखाळ.
In reply to अश्रू पुसू by लिखाळ
अश्रू पुसू पहातो तो कृष्णमेघ हळवा
जाणून घ्यावयाला मम गूज अंतरीचे
सांगे विभोर नयनी कंपित या स्वराने
नवनवीन घेतले ते कॉन्टॅक्ट लेन्स खुपले !!
In reply to रिपेर करून ..... by मुक्तसुनीत
कवितेचं काहीही होवो पण तुम्ही भेटलात की प्राजु तुम्हाला पिटणार हे नक्की !!! :)
In reply to रिपेर करून ..... by मुक्तसुनीत
:|
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to रिपेर करून ..... by मुक्तसुनीत
अश्रू पुसू पहातो तो कृष्णमेघ हळवा
जाणून घ्यावयाला मम गूज अंतरीचे
सांगे विभोर नयनी कंपित या स्वराने
डोळ्यात घातले ते नेत्रस्पर्शी भिंग खुपले !!
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
In reply to रिपेर करून ..... by मुक्तसुनीत
मुक्तराव आभारी आहे. आता लेन्स खुपत नाहिये :)
देवकाकांनी लेन्सला मराठी मुलावा चढवल्याने आता तिचे डोळे अभिमानाने चमकत वगैरे आहेत.
संदीपराव, प्राजूताई पिटणार हे नक्कीच बहुधा. आता जरा चांगल्या दोन ओळी सुचल्या तर बरे होईल :)
-- लिखाळ.
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
नयनांच्या तिरळेपणाचे
प्रदर्शन अवघड झाले....
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
नवे घेतले ते कॉन्टॅक्ट लेन्स खुपले
खुपले म्हणुन डोळे लाल लाल झाले..!!
वाटले आईस मा़झ्या, मा़झे डोळेच आले,
त्या मुळे त्याला भेटण्यास मना केले.!!
खेकडा तव खरडी येऊनी बसला
पाहुन त्याला मोर पळाला !!!
(टारगट मुलगा)
मदनबाण.....
मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
जालावरुन सभार...
प्राजु पिटेल अशा लोकांची यादी वाढतच चालली आहे.
तरी अजून चतुरंग, केसु, बेसनलाडू वगैरे मंडळी मैदानात यायची आहेत ;)
भर श्रावणात मजला खुपतो तुझा अबोला
मन विंधण्यास माझे, तुज हेच अस्त्र दिसले?
पुसता धरून हाता, रुसलीस का सखे तू?
विसरून राग लटका, कुणि गोड गोड हसले!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
In reply to एक वेगळा प्रयत्न by क्रान्ति
छान.. आवडले!
-अनामिक
In reply to एक वेगळा प्रयत्न by क्रान्ति
वा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
अश्रूंना सखे असे का गं बांध घातले
विरहाचे सुर मनी असे ते भिडले
धरिणी कंपिली, आकाश दुभंगले
पैलतीरी सखा, आर्त साद घाले
अनावर भाव, व्याकुळ मन झाले....
................................
कुणीतरी रिपेअर करा.....
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
जरि खिन्न कातळाला, ही पालवी फुटावी
तरिही सुक्या झर्याची, का अश्रुधार ओली.. ?
-- मिसळभोक्ता
In reply to क्या बात है ! by मिसळभोक्ता
सुरेख!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सहज प्रयत्न केला आहे. वृत्त, मात्रा, व्याकरण या सगळ्याची जाण तशी कमीच, तेव्हा काही सुधार करता आला तर जरुर करा.
**************************
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
ओठांवरी हास्याची खुलता कळी खुलेना
मम अंतरात आता वसंतही फुलेना
मज भेट घेण्या ये तू - वार्याच्या वेगाने
वाट पाहते सख्या मी - चातकाप्रमाणे
ऐकून साद माझी, तो मेघदूत आला
चाहूल तू येण्याची, हलके सांगून गेला
उघडता नील नयन, दृष्टीस तू पडावा
अन् ग्रिष्मात वळिवाचा पाऊस बरसावा
**************************
-अनामिक
In reply to सहज by अनामिक
ओठांवरी हास्याची खुलता कळी खुलेना
मम अंतरात आता वसंतही फुलेना
मस्तच..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या!
(कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले)
(ठार)बेसनलाडू
In reply to खंजीर by बेसनलाडू
मस्त बेला! :)
चतुरंग
In reply to खंजीर by बेसनलाडू
वाह!! बेला.. जबरदस्त शेर आहे.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
वाजे तरी कुणाचे पाउल कुणास ठावे?
नवजात प्रेमिकांचे हितगूज चाललेले!
चतुरंग
In reply to या गर्द by चतुरंग
खूपच सुंदर!!
चतुरंग... तुमच्या या ओळी वाचून आता ५-६ दिवसांत मधुशालाचा पुढचा भाग वाचायला मिळेल अशी आशा वाटू लागली आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
हा दाटून कंठ आला, मन हळवे हे झाले.....
का व्यक्त करताना व्यथा, दु:ख मज हसले...!
संजूबाबा
In reply to प्राजू ताई, माझाही प्रयत्न....... by sanjubaba
संजूबाबा.. लगे रहो!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले,
आठवले का दिस सोनेरी,गाभुळलेले
तुझ्या नि माझ्या हसर्या बागडण्याचे ?
In reply to या गर्द----------- by वैशाली हसमनीस
वैशालीताई.. आवडल्या ओळी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले,
रागे हळूच बघतो मुडपून ओठ थोडा,
इवलेसे हात त्याचे गालांवरून फिरले..
एकेक थेंब झरतो मोती जणू टपोरा
कैसे मनास रोधू, कोमेजतो फुलोरा
रुसला गं रामचंद्र हाकेस ओ मिळेना,
उचलून घेतले पण त्याची कळी खुलेना..
उगाच रागले मी, बाळा नको रडू रे..
तुझिया हसूत माझा आनंद साठलाहे!
राघव
In reply to एक प्रयत्न माझाही - by राघव
अप्रतिम
In reply to एक प्रयत्न माझाही - by राघव
तुमची प्रतिभा अफाट आहे...
उद्या रामनवमीच्या मुहूर्तावर हे काव्य म्हणजे... हॅट्स ऑफ!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
सोसवेना भार मेघांचा, पापणीतून दुभंगले
अश्रुंच्या पाझराने, पंख डोहात डुंबले.
हा माझा एक प्रयत्न-
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
केला असता अभ्यास, झाले नसते नापास
ऊरी माझ्या जळते, मित्र-मैत्रिण पुढे गेले..
जागु.. तुझाही प्रयत्न आवडला..
सर्वांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर प्रतिभेचे छाटून पंख बसले?
होती तळपती ती, वीज प्रतिभाशाली
का काव्यपीठ पाडता, अवसान ते गळाले?
कधी असो कृष्णलीला, वा प्रेमाची नव्हाळी
विषय नाही वर्ज्य कुठला, वाक्यावाक्याला टाळी!
शब्दप्रभू म्हणे कुणी, कुणी - काव्यविदुषी
कुबेरावर का भासावी, चणचण शब्दांची अशी?
`ती' म्हणे वाटले कधी, द्यावी संधी इतरांही
का कुण्या `हलकटा'ने, खावे शेण तिथेही?
In reply to भोगा आपल्या कर्माची फळं! by आपला अभिजित
झालं तर मग.. ;)
धन्यवाद म्हण मला.. तुझी सो कॉल्ड काव्यप्रतिभा जगी झाली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
तुझ्या आठवणीने,मन माझे विभोर झाले
कसे आडवु आसवांना,नयनि पुर बघ आले.,
त्या प्रेम पावसाने,अशी मी पुरती भिजले
नाहि मी विझले,आत आत जळत राहिले
घेतले होते रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या नाजुक बिलोरी यौवनि
अंग अंग गात्रांग,प्रीत रंगात नहाले
नेत्री आनंद आसवे,देहात चांदणे झळाळले
ऎकता अनंग कथा,सहन होईना मदन चाळे
त्या काम दाहात, शरीर नाजुक हे होरपाळले
तु रमता धुंद यौवनि. मी तुझीच रे झालें
नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें
आठवता हे सारे ,नयनी दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
अश्रू पुसू