मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[कविता' २०२०] - देता निरोप तुजला

साहित्य संपादक · · स्पर्धा

देता निरोप तुजला




देता निरोप तुजला, स्मरले क्षणात काही.. सांगायचे तुला जे, विरले मनात काही.. तू घाव जे दिलेले, सारे भरून गेले. व्रण मात्र खोल त्याचे, उरले उरात काही.. मन थांबता जरासे, सुख सापडून गेले. जे शोधण्या उगा ते, फिरले दिशात दाही.. मिळते म्हणे प्रसिद्धी, सफलतेच्या कथांनी मम बर्बादीचे किस्से, फिरले जनात काही.. करण्या उजाड मजला, ढग संकटांचे आले. बरसून काही गेले, विरले नभात काही.. ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही, सोसावयास नाही, उरले जगात काही..


वाचने 8379 वाचनखूण प्रतिक्रिया 10

मनिष Tue, 05/19/2020 - 13:58
+१ फारंच सुरेख आहे ही !!
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही, सोसावयास नाही, उरले जगात काही..

प्रिती-राधा Tue, 05/19/2020 - 23:18
+1

In reply to by चांदणे संदीप

स्वच्छंद Mon, 05/25/2020 - 22:58
खरं सांगायचं तर काफिया कडे लक्ष देता देता याकडे लक्ष गेलेच नाही. तुम्ही सांगितल्यानंतर मला हे लक्षात आले. आता थोड आश्चर्य वाटतंय याचं. पण आपले प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वच्छंद

सत्यजित... Mon, 06/01/2020 - 21:35
काफिया पुन्हा-पुन्हा वापरण्यास काही हरकत नाही. >>>करण्या उजाड मजला, ढग संकटांचे आले. बरसून काही गेले, विरले नभात काही..>>> इथे मात्र दोनही ओळींत एक मात्रा अधिक आली आहे. >>सफलतेच्या >> लघू-गुरु क्रम बदलला गेल्याने लय अडखळली. >>फिरले दिशांत दाही >> रदीफ पाळल्या गेली नाही! खयाल कधी-कधी इतका मोहक वाटतो की निदान कसली सूट घेवून तरी,शेर लिहावाच! पण गझलेचा साज आणि बाज सांभाळणे ही देखिल आपली जबाबदारी असावी. >>सोसावयास नाही उरले जगात काही>> ही ओळ खासंच! पुलेशु!

तुषार काळभोर Sat, 05/23/2020 - 11:49
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही, सोसावयास नाही, उरले जगात काही..
असं काही नसतं. कल्पनेपलीकडील संकटे घडण्याची वाट बघत थांबलेली असतात.